ठाकरे सरकारने पत्रकारांच्या लसीकरणासाठी सिंधुदुर्ग पॅटर्न लागू करावा, आमदार नितेश राणेंचा सल्ला

| Updated on: Jun 03, 2021 | 7:45 PM

तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पत्रकार लसीकरण पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात राबवावा, असेही त्यांनी सांगितले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचा जिल्हा असल्याचंही नितेश राणेंनी अधोरेखित केलंय. Thackeray government MLA Nitesh Rane

ठाकरे सरकारने पत्रकारांच्या लसीकरणासाठी सिंधुदुर्ग पॅटर्न लागू करावा, आमदार नितेश राणेंचा सल्ला
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नितेश राणे
Follow us on

विनायक वंजारे, टीव्ही 9 मराठी, सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग : ठाकरे सरकारने पत्रकारांच्या लसीकरणासाठी सिंधुदुर्ग पॅटर्नचा बोध घ्यावा, असा सल्ला भाजपा आमदार नितेश राणे ( MLA Nitesh Rane) यांनी दिलाय. तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पत्रकार लसीकरण पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात राबवावा, असेही त्यांनी सांगितले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचा जिल्हा असल्याचंही नितेश राणेंनी अधोरेखित केलंय. (Thackeray government should implement Sindhudurg pattern for vaccination of journalists, advises MLA Nitesh Rane)

प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर पत्रकारांना कालपासून सिंधुदुर्गात लसीकरण सुरू

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारितेला संपूर्ण जगतात एक वेगळे महत्त्व आहे. त्यामुळे आमच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संजना सावंत आणि उपाध्यक्ष राजन म्हापसेकर यांच्यासह सर्व सदस्यांनी आपली प्रबळ इच्छाशक्ती दाखवत एक संपूर्ण राज्याला आदर्श दाखवून दिला. प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर पत्रकारांना कालपासून लसीकरण सिंधुदुर्गात सुरू झाले. त्यामुळे ठाकरे सरकारने पत्रकारांच्या लसीकरणाबाबत बोध घ्यावा. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पत्रकार लसीकरण पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात राबवावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी सरकारकडे केलीय.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा पॅटर्न राज्यात लागू करावा

दरम्यान आमदार नितेश राणे यांनी उपजिल्हा रुग्णालयाला 15 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि वैद्यकीय साहित्य सुपूर्त केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत, कणकवली पंचायत समिती सभापती मनोज रावराणे यांच्यासह पंचायत समिती सदस्य कणकवली नगरसेवक आणि भाजप पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार नितेश राणे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संजना सावंत यांनी नियोजन करत येथील पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घेतले. हाच पॅटर्न राज्यातही राबवला जाऊ शकतो. मात्र त्यासाठी राज्य सरकारची मानसिकता असायला हवी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा पॅटर्न राज्यात लागू करावा, असेही ते यावेळी म्हणाले.

संबंधित बातम्या :

‘कोकणावर राजकारणासाठी जेवढं प्रेम केलं जाते, तेवढंच प्रेम अशा संकटाच्या काळातही केलं जावं’, फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला

मोदी संवेदनशील, पण मी विरोधी पक्षनेत्यासारखं वैफल्यग्रस्त नाही, उद्धव ठाकरेंचा जहरी वार

Thackeray government should implement Sindhudurg pattern for vaccination of journalists, advises MLA Nitesh Rane