ठाण्यात दिवाळीला गालबोट! जागोजागी आगीच्या घटना, जिल्हाधिकाऱ्यांकडून फटाक्यांबाबत सर्वात मोठा निर्णय

ठाण्यात दिवाळीला गालबोट लागल्याचे दिसून आलं. ठाण्यात फटाक्यांमुळे जागोजागी आगीच्या घटना घडल्या. त्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून रातोरात सर्वात मोठा निर्णय घेतला .

ठाण्यात दिवाळीला गालबोट! जागोजागी आगीच्या घटना, जिल्हाधिकाऱ्यांकडून फटाक्यांबाबत सर्वात मोठा निर्णय
thane news
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 09, 2026 | 7:46 AM

राज्यात दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या रात्री मोठ्या उत्साहात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. मुंबई आणि ठाण्यातील अनेक ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. ठाण्यातील विविध ठिकाणी आगीच्या घटना घडल्याचे दिसून आलं. काल रात्री आगीच्या घटना घडल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांची एकच धावाधाव झाली. कालच्या आगीच्या घटनेमुळे एकनाथ शिंदे यांनी स्वत: घटनास्थळी जाऊन दुर्घटनेचा आढावा घेतला. ठाणे जिल्ह्यातील वाढत्या आगीच्या घटनेवरून काल रात्रीच प्रशासन अलर्ट झालं. त्यानंतर ठाणे जिल्हा प्रशासनाने हवेत उडणाऱ्या फटाक्यांवर बंदी घातली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील कालच्या फटाक्यांमुळे लागलेल्या आगीच्या घटना वाढल्यामुळे प्रशासन अलर्ट झालं. या घटनेची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दखल घ्यावी लागली. आगीच्या घटनेनंतर ठाणे जिल्ह्यात हवेत उडणाऱ्या फटाक्यांवर बंदी घातली. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात रॉकेट आणि हवेत उडणारे तत्सम फटाके फोडण्यास जिल्हाधिकाऱ्यांकडून बंदी घालण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी आगीच्या 11 घटना घडल्यानंतर जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला.

Loading...

हवेत उडणाऱ्या फटक्यांवर बंदी 

रॉकेट आणि हवेत उडणाऱ्या फटाक्यांमुळे इमारतींना आग लागण्याच्या घटना समोर आल्यानंतर प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.  सार्वजनिक आणि खासगी जागा, इमारतींच्या गच्च्या, बाल्कनी, आवारे आणि निवासी भागांमध्ये बंदी लागू करण्यात आली आहे. आता 9 नोव्हेंबर 2026 रोजी मध्यरात्री 12 वाजून 1 मिनिटापासून 8 जानेवारी 2027 रोजी रात्री 11 वाजून 59 मिनिटांपर्यंत बंदी लागू राहणार आहे. ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडून फटक्यांबाबत आदेश जारी करण्यात आले आहेत.

ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ म्हणाले, ‘आजपासून ठाणे जिल्ह्यात हवेत उडणाऱ्या फटाक्यांवर बंदी लागू होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिकृत आदेश जारी करण्यात आले. ठाण्यात इमारतींना आग लागण्याच्या घटनांमध्ये रॉकेट आणि हवेत उडणाऱ्या फटाक्यांचा समावेश आहे. आगीच्या घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतला. बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर आणि दंडात्मक कारवाई होणार आहे’.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us