Thane News: भाजप- शिवसेनेत रंगली श्रेयवादाची लढाई! महायुतीत जोरदार जुंपली; ठाण्यात काय घडतंय?

उल्हासनगरमध्ये मेट्रोपाठोपाठ आता शहाड ब्रिजच्या श्रेयवादावरून भाजपा आणि शिवसेनेत आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत. साडेतीनशे कोटींच्या प्रस्तावित शहाड ब्रिजसाठी भाजपानेच पाठपुरावा केल्याचा दावा आमदार कुमार आयलानी यांनी केला आहे

Thane News: भाजप- शिवसेनेत रंगली श्रेयवादाची लढाई! महायुतीत जोरदार जुंपली; ठाण्यात काय घडतंय?
| Updated on: Nov 06, 2026 | 8:23 PM

Thane News: ठाणे भिवंडी कल्याण या मेट्रो प्रकल्प पाच चे श्रेय हे फक्त आणि फक्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेच आहे.पण सर्वप्रथम मागणी केल्याचे श्रेय मी जरूर घेणार असे म्हणत न केलेला कामाचं खोटे बोलून क्रेडिट घेण्याची आपली सवय नाही अशी परखड प्रतिक्रिया माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी नाव न घेता खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व भिवंडीतील भाजपा आमदार महेश चौघुले यांना टोला लगावला होता. अशातच आता शहाड ब्रिजच्या श्रेयवादावरुनही भाजप शिवसेनेत राजकारण रंगले आहे.

भाजप- शिवसेनेत रंगली श्रेयवादाची लढाई! 

Loading...

समोर आलेल्या माहितीनुसार,  उल्हासनगरमध्ये मेट्रोपाठोपाठ आता शहाड ब्रिजच्या श्रेयवादावरून भाजपा आणि शिवसेनेत आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत. साडेतीनशे कोटींच्या प्रस्तावित शहाड ब्रिजसाठी भाजपानेच पाठपुरावा केल्याचा दावा आमदार कुमार आयलानी यांनी केला आहे. तर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांमुळेच ही कामं होत असल्याचं सांगत शिवसेनेने भाजपला प्रत्युत्तर दिले आहे. धनत्रयोदशीच्या कार्यक्रमात दोन्ही पक्षांतील नेत्यांनी एकमेकांवर टीकेचे बाण सोडलेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरसभेत उल्हासनगरकरांना मेट्रो देण्याचं आश्वासन दिलं होतं. याच भाषणाचा व्हिडिओ दाखवत भाजप आमदार कुमार आयलानी यांनी मेट्रो आणि शहाड ब्रिजसाठी भाजपानेच पाठपुरावा केल्याचा दावा केला आहे. तर केवळ कागदपत्रं दाखवून विकासकामं होत नाहीत, त्यासाठी पाठपुरावा करावा लागतो, असा टोला शिवसेनेने लगावला आहे.

खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांमुळेच ही कामं होत असल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला. भाजपाने स्वतः केलेल्या कामाचं श्रेय घ्यावं, दुसऱ्याने केलेल्या कामाचं श्रेय घेऊ नये, असं म्हणत शिवसेना नेते कमलेश निकम यांनी भाजप आमदारांवर निशाणा साधला. तर उल्हासनगरमध्ये भाजपा आणि शिवसेनेतील वादाला एका गटाचं कारण असल्याचा आरोप आमदार कुमार आयलानी यांनी केले आहे.

धनत्रयोदशीच्या निमित्ताने शिवसेनेकडून ‘श्रीमती ज्योती कलानी लाडकी विद्यार्थिनी योजने’चा शुभारंभ करण्यात आला. याच कार्यक्रमात मेट्रो आणि शहाड ब्रिजच्या श्रेयावरून दोन्ही पक्षांत आरोप-प्रत्यारोपांचे फटाके फुटलेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us