AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपा खासदाराचा पहाटे पहाटे भीषण अपघात, थोडक्यात बचावले हेमंत सावरा, एअर बॅग नसती तर…

भाजप खासदार हेमंत सावरा यांच्या गाडीला ठाण्यात घोडबंदर रोडवर शुक्रवारी सकाळी भीषण अपघात झाला. डंपरच्या धडकेने गाडीचे मोठे नुकसान झाले, मात्र एअरबॅगमुळे खासदार सावरा सुदैवाने बचावले, त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. चालकाला किरकोळ दुखापत झाली. नायगाव पोलीस घटनेचा तपास करत आहेत.

भाजपा खासदाराचा पहाटे पहाटे भीषण अपघात, थोडक्यात बचावले हेमंत सावरा, एअर बॅग नसती तर...
खासदार हेमंत सावरा यांचा अपघात
| Updated on: May 01, 2026 | 10:23 AM
Share

ठाणे जिल्ह्यात शुक्रवारची सकाळ धक्कादायक ठरली. भाजपचे पालघरचे खासदार डॉ. हेमंत विष्णू सावरा यांच्या गाडीचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. ही दुर्घटना आज सकाळच्या सुमारास घोडबंदर रोड येथे घडली. खासदार सावरा यांच्या गाडीला डंपरने जोरदार धडक दिली. या धडकेत गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने, डॉ. सावरा यांना कोणतीही दुखापत झालेली नसून ते सुखरूप असल्याचे समजते.

पण खासदार सावरा यांच्या गाडीच्या चालकाला मात्र किरकोळ दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवारी सकाळी हा अपघात आला, तेव्हा खासदार सावरा यांची गाडी मुंबईहून गुजरातच्या दिशेने जात होती. त्याचवेळी मुंबईच्या लेनवरून एक डंपर येत होता. त्याच डंपरचीखासदार सावरा यांच्या गाडीशी थेट धडक झाली. दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार टक्कर झाली.

एअरबॅग नसती तर झाला असता मोठा अनर्थ

सुदैवाने ही टक्कर झाली तेव्हा कारमधील एअरबॅग्ज तात्काळ उघडल्या गेल्या आणि मोठं नुकसान टळल. गाडीतील प्रवासी देखील सुरक्षित राहिले. या अपघाताची माहिती मिळताच, नायगाव पोलीस ठाण्यातील एक पथक घटनास्थळी दाखल झालं. आणि त्यांनी मदतकार्य सुरू केले. पोलिसांच्या सांगण्यानुसार, या प्रकरणाचा अद्याप तपास सुरू असून अपघाताच्या कारणाचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, अपघाताचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले असून, त्यामध्ये खासदार सावरा यांच्या गाडीची भीषण अवस्था दिसत आहे

अपघातानंतर काय म्हणाले सावरा ?

अपघातावेळी नेमकं काय घडलं, ते सावरा यांनी स्वत: सांगितलं. सावरा यांच्या म्हणण्यानुसार, ते महाराष्ट्र दिनाच्या एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी ठाण्याहून पालघरला जात होते. मात्र वर्सोवा खाडी पूल (भाईंदर खाडी पूल) ओलांडल्यानंतर लगेचच एका डंपर ट्रकने त्यांच्या वाहनाला धडक दिली. “डंपर चालकाला आमची गाडी दिसली नाही आणि त्याने आम्हाला धडक दिली.” असं ते म्हणाले. घटनेची माहिती मिळताच नायगाव पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.

Follow Us
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची..
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्त
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्तिवाद काय? वाचा महत्त्वाचे मुद्दे