AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्हाला मंत्रालयात नोकरी लावतो, महिला भाळली अन् मग…; ठाण्यात धक्कादायक प्रकार उघड

मंत्रालयात उच्च पदावर ओळख असल्याचे सांगून मुंबईतील एका महिलेची आणि तिच्या नातेवाईकांची ४६ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली परिसरात हा गुन्हा दाखल झाला असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

तुम्हाला मंत्रालयात नोकरी लावतो, महिला भाळली अन् मग...; ठाण्यात धक्कादायक प्रकार उघड
mantralaya
| Updated on: Apr 24, 2026 | 11:47 AM
Share

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणुकीचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. त्यातच आता मंत्रालयातील उच्च पदावरील अधिकाऱ्यांशी ओळख आहे, असा बनाव करून एका भामट्याने मुंबईतील एका महिलेसह तिच्या नातेवाईकांची तब्बल ४६ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ठाणे जिल्ह्यात ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा कसून शोध सुरू आहे.

नेमकी घटना काय?

नाशिक येथील रहिवासी असलेल्या एका आरोपीने आपण मंत्रालयात मोठ्या पदावर कार्यरत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने मुंबईच्या भांडुप परिसरात राहणाऱ्या एका ४५ वर्षीय महिलेला विश्वासात घेतले. यानतंर ती महिला आणि तिच्या परिचितांना सरकारी विभागात कायमस्वरूपी नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन त्याने दिले होते. यानंतर आरोपीने पीडितांचा विश्वास संपादन करण्यासाठी चक्क बनावट सरकारी कागदपत्रे तयार केली. त्यावर खोट्या सह्या आणि शिक्के मारून ती खरी असल्याचे भासवले.

त्या दोघांचा विश्वास बसल्यानंतर आरोपीने वेळोवेळी पैशांची मागणी केली. त्याने या महिलेकडून ३५ लाख २५ हजार रुपये घेतले. तर तिच्या ओळखीच्या दुसऱ्या एका व्यक्तीकडून १४ लाख रुपये उकळले. ही सर्व रक्कम डोंबिवलीतील एका कार्यालयात स्वीकारण्यात आली होती. हा फसवणुकीचा प्रकार जून २०२४ ते सप्टेंबर २०२५ या काळात सुरू होता. त्याने दिलेली मुदत संपल्यानंतरही कोणालाही नोकरी मिळाली नाही आणि आरोपीने टाळाटाळ सुरू केली, तेव्हा पीडितांना संशय आला. त्यांनी पैशांचा तगादा लावल्यावर आरोपीने केवळ ३.२५ लाख रुपये परत केले. मात्र उर्वरित रक्कम देण्यास नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित महिलेने पोलिसांत धाव घेतली.

कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका

पीडित महिलेच्या तक्रारीवरून २० एप्रिल रोजी डोंबिवली परिसरात संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध फसवणूक, बनावटगिरी आणि विश्वासघात या कलमांखाली गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. सध्या हे आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेनंतर कोणत्याही व्यक्तीच्या भूलथापांना बळी पडू नका. सरकारी नोकरी ही केवळ अधिकृत परीक्षा आणि निवड प्रक्रियेद्वारेच मिळते. कोणालाही पैसे देऊन नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करू नका आणि संशयास्पद व्यवहार आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Follow Us
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप