Thane: एकनाथ शिंदेच्या ठाणेकरांना आता मोठा दणका, पालिकेच्या निर्णयामुळे लोकांचे हाल होणार, नव्या कराचा बोजा बसणार
Thane News: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील रहिवाशांच्या चिंतेत वाढ होणार आहे. आता महानगरपालिकेच्या एका निर्णयामुळे रहिवाशांना खूप मोठा त्रास होणार असून त्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे.

Thane Municipal Corporation: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील रहिवाशांना आता मोठा दणका बसला आहे. ठाणे महापालिकेच्या महासभेत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे आता ठाणेकरांच्या खिशाला मात्र मोठी कात्री बसणार आहे. ठाणे महापालिकेने मालमत्ता करासह इतर विविध करांमध्ये प्रचंड वाढ केली आहे. ज्यामुळे सामान्य नागरिक आणि घर खरेदीदारांवर आता अतिरिक्त आर्थिक बोजा वाढणार आहे.
निवासी मालमत्तांच्या करात 12 टक्के वाढ केली आहे, तर बिगर निवासी (व्यावसायिक) मालमत्तांच्या करात 20 टक्के वाढ करण्यात आली आहे. घर किंवा मालमत्ता हस्तांतरण करताना जे शुल्क दिले जातात त्यात तब्बल तिप्पट वाढ करण्यात आली आहे. हस्तांतरण शुल्क आणि मालमत्ता करातील वाढीमुळे आता ठाण्यात घर खरेदी-विक्री करताना नागरिकांना विचार करावा लागणर आहे, कारण लाखो रुपयांचा अतिरिक्त कर भरावा लागणार आहे. वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि बेशिस्त पार्किंगला आळा घालण्यासाठी पालिकेने आता एक मोठा निर्णय घेतला आहे. घोडबंदर भागातील रहिवाशांवर पार्किंग कर लादण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे पालिकेकडून स्पष्ट शब्दात स्पष्टीकरण देण्यात आले आहे पण तरीही स्थानिक रहिवाशांमधून या निर्णयावर नाराजी व्यक्त होत आहे.
पार्किंग शुल्काचे दर दोन तासांसाठी
- दुचाकी: 10 रुपये
- तीन चाकी: 10 रुपये
- चारचाकी: 15 रुपये
- बस व ट्रक: 80 रुपये
करवाढीच्या या प्रस्तावाला शिवसेना नगरसेवक राम रेपाळे यांचे पूर्ण समर्थन असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लावणाऱ्या या प्रस्तावाला विरोधकांनीही पाठिंबा दर्शवल्याचे दिसत आहे कारण कोणीच याचा विरोध न केल्यामुळे, हा प्रस्ताव सहज मंजूर झाला.
सध्याच्या महागाईच्या काळात महापालिकेने घेतलेल्या या निर्णयामुळे ठाणेकरांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. मूलभूत सुविधांची भीषण अवस्था आहे तरीही दुसरीकडे पालिकेकडून कररूपाने सामान्य जनतेची लूट सर्रास सुरु आहे असा आरोप जनतेनी केला आहे. मालमत्ता कर, पार्किंग कर आणि हस्तांतरण शुल्कातील या अवाजव वाढीमुळे ठाण्यातील रिअल इस्टेट क्षेत्रावरही याचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us