AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : आयुष्यात या 5 लोकांना कधीही शत्रू बनवू नका, चाणक्यांनी दिला मोलाचा सल्ला

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात या जगात असे काही लोक असतात, ज्यांच्याशी तुम्ही कधीही वैर घेऊ नका. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

Chanakya Niti : आयुष्यात या 5 लोकांना कधीही शत्रू बनवू नका, चाणक्यांनी दिला मोलाचा सल्ला
Chanakya Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 18, 2026 | 7:41 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील अनेकांना मार्गदर्शक ठरतात. चाणक्य आपल्या या ग्रंथामध्ये म्हणतात समाजात असे देखील काही लोक असतात, ज्यांच्याशी तुम्ही कधीही वैर घेतलं नाही पाहिजे. कारण पाण्यात राहून माशासोबत कधीही वैर करता येत नाही, त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी सावध राहिलं पाहिजे, मात्र त्यांना कधीही आपला शत्रू बनवू नका, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे. चला तर मग जाणून घेऊयात असे कोणते लोक आहेत? ज्याच्याशी कधीही वैर करू नये, तसेच त्यांच्याबद्दल चाणक्य यांनी नेमकं काय सांगितलं आहे.

तुमची गुपितं माहिती असलेले लोकं – चाणक्य म्हणतात ज्यांना तुमची सर्व गुपितं माहिती आहेत, अशी गुपितं जी जगासमोर आले तर तुमचं फार मोठं नुकसान होऊ शकतं, तर अशा लोकांपासून नेहमी सावध राहावं, अशा लोकांसोबत कधीही वैर करू नये, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

ज्ञानी लोक – चाणक्य म्हणतात जे लोक ज्ञानी असतात, ज्यांच्या नुसत्या सहवासामुळे देखील तुमच्या ज्ञानात भर पडते, अशा लोकांसोबत कधीही वैर करू नका, कारण यामुळे तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. तुम्ही एका चांगल्या ज्ञानी माणसाला मुकाल.

हितचिंतक – चाणक्य म्हणतात जे लोक तुमचे हितचिंतक आहेत. ज्यांची मनातून अशी इच्छा आहे, की तुमचं खरच चांगलं झालं पाहिजे. तुमचं कल्याण झालं पाहिजे, अशा लोकांसोबत कधीही वैर घेऊ नका. कारण अशा लोकांमुळेच तुमची आयुष्यात प्रगती होत असते.

शस्त्र असलेले लोक – चाणक्य म्हणतात ज्या लोकांकडे शस्त्र आहे, अशा लोकांसोबत देखील वैर करणं तुम्हाला खूप महागात पडू शकतं, कारण अशा लोकांसोबत वैर केलं तर तुमचा मृत्यू देखील होऊ शकतो, त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी जपूनच राहावं.

तुमच्यापेक्षा बलवान लोक – चाणक्य म्हणतात जे लोक तुमच्यापेक्षा शक्तशाली असतात, ज्यांच्याकडे तुमच्या पेक्षा ताकद तसेच पैसा अधिक असतो, अशा लोकांसोबत देखील कधीही वैर करू नये, असा सल्ला देखील चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये दिला आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
चार तास वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली; दीड वर्षांच्या मुलाचं जीवन
Raigad : चार तास वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली; दीड वर्षांच्या मुलाचं जीवन संपलं, रायगडमधील घटनेने हळहळ
फायनान्स कंपन्यांची खुलेआम गुंडागर्दी; 22 हजारांचा हफ्ता चुकला अन्....
Latur : फायनान्स कंपन्यांची खुलेआम गुंडागर्दी; 22 हजारांचा हफ्ता चुकला, वसुलीसाठी शेतकऱ्याला शिवीगाळ
सातारा जिल्हा बँकेत भाजपला बाजूला सारत राष्ट्रवादी-शिंदेसेनेची सत्ता!
Satara Bank Election : सातारा जिल्हा बँकेत भाजपला बाजूला सारत राष्ट्रवादी-शिंदेसेनेची सत्ता!
मन शांत ठेवलं की मार्ग निघतो... बाळासाहेबांच्या एका शिकवणीचा उद्धव....
Uddhav Thackeray : मन शांत ठेवलं की मार्ग निघतो... बाळासाहेबांच्या एका शिकवणीचा उद्धव ठाकरेंनी केला उल्लेख; नेमकं काय म्हणाले?
सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेत नवं समीकरण; काँग्रेसचे महेंद्र लाड....
Sangli Bank : सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेत नवं समीकरण; काँग्रेसचे महेंद्र लाड अध्यक्ष तर, तानाजी पाटील उपाध्यक्ष
मेळघाटच्या जंगलावर कुऱ्हाड पडणार? चिखलदर्‍यात 1500 मेगावॅटचा जलविद्युत
Melghat : मेळघाटच्या जंगलावर कुऱ्हाड पडणार? चिखलदर्‍यात 1500 मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प; 240 हेक्टर वनक्षेत्रावर संकट
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; लोणार सरोवराला जागतिक भूगर्भीय..
Lonar Lake : महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; लोणार सरोवराला जागतिक भूगर्भीय वारसा स्थळाचा दर्जा
सोनं एका दिवसात एवढ्या रुपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले....
Gold Silver Price Today : सोनं एका दिवसात एवढ्या रुपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले; जळगावच्या सराफ बाजारात मोठा दिलासा, पाहा आजचे भाव
शायना एनसी विधानभवनात दाखल; एकनाथ शिंदेंनी भेटीसाठी बोलावल्याची माहिती
Shaina NC : शायना एनसी विधानभवनात दाखल; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेटीसाठी बोलावल्याची माहिती, राजकीय चर्चांना उधाण
बाळासाहेबांचा फोटो अनावधानाने फाडला असेल तर...; शंभुराज देसाई नेमकं...
Shambhuraj Desai : बाळासाहेबांचा फोटो अनावधानाने फाडला असेल तर...; शंभुराज देसाई नेमकं काय म्हणाले?