AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra: स्वयंपाक घरात चुकूनही उलट्या ठेवू नका या वस्तू, आयुष्यात अडचणी वाढतील, वास्तुशास्त्र काय सांगतं?

हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला महत्त्वाचं स्थान आहे. वास्तुशास्त्रामध्ये तुमच्या दैनंदिन आयुष्यात येणाऱ्या समस्यांवर काही उपाय सांगण्यात आले आहेत. वास्तुशास्त्रानुसार अशा काही वस्तू असतात, ज्या कधीही तुमच्या स्वयंपाक घरात या उलट्या ठेवल्या नाही पाहिजेत, आज आपण त्याबद्दलच जाणून घेणार आहोत.

Vastu Shastra: स्वयंपाक घरात चुकूनही उलट्या ठेवू नका या वस्तू, आयुष्यात अडचणी वाढतील, वास्तुशास्त्र काय सांगतं?
vastushtraImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 18, 2026 | 7:48 PM
Share

हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला महत्त्वाचं स्थान आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार जेव्हा तुमच्या घराची रचना ही वास्तुशास्त्रानुसार असते, तेव्हा तुमच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी कमी होतात. तुमच्या घरात सतत सकारात्मक ऊर्जा राहते, परंतु जर तुमच्या घराची रचना ही वास्तुशास्त्राप्रमाणे नसते, अशा वेळी तुमच्या घरात सतत नकारात्मक ऊर्जेची निर्मिती होते, त्यामुळे सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होतो आणि तुमच्या आयुष्यात वेगवेगळ्या समस्या निर्माण होऊ शकतात. एवढंच नाही तर तुमच्या घरात कोणत्या वस्तू कोणत्या दिशेला ठेवल्या पाहिजेत? याची देखील माहिती वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आली आहे. वास्तुशास्त्रानुसार अशा काही वस्तू असतात, ज्या कधीही स्वयंपाक घरात उलट्या ठेवल्या नाही पाहिजेत. यामुळे तुमच्या घरात काहीही कारण नसताना गृहकलह वाढू शकतो, तसेच तुम्हाला आर्थिक अडचणी देखील येऊ शकतात, चला तर मग जाणून घेऊयात याबद्दल वास्तुशास्त्रामध्ये नेमकं काय सांगण्यात आलं आहे? त्याबद्दल.

कढई – वास्तुशास्त्रामध्ये कढईला राहु ग्रहाचं प्रतिक माण्यात आलं आहे. जेव्हा राहु तुमच्यावर प्रसन्न असतो, तेव्हा तुमचा अनेक संकटांमधून बचाव होतो. मात्र जर तुमच्या कुंडलीमध्ये राहु ग्रह नाराज असेल तर मग मात्र तुमच्या आयुष्यात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. जसं कर्ज वाढतं, एखादी अचानक मोठी आर्थिक समस्या निर्माण होते. हे सर्व टाळण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत. वास्तुशास्त्रामध्ये कढईला राहुचं प्रतिक माण्यात आलं आहे, त्यामुळे कधीही स्वयंपाक घरामध्ये कढई ही उलटी ठेवू नये, असा सल्ला वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे.

धारदार वस्तू – धारदार वस्तू जसं की चाकू, कात्री, किंवा या सारख्या इतर वस्तू या कधीही स्वयंपाक घरात उलट्या ठेवू नये. वास्तुशास्त्रानुसार या वस्तू जर तुम्ही उलट्या ठेवल्या तर घरात काहीही कारण नसताना गृहकलह वाढतो. अचानक कुटुंबातील इतर सदस्यांसोबत मतभेद निर्माण होतात. पती-पत्नीचं पटत नाही. त्यामुळे घरात कधीही चाकू किंवा इतर धारदार वस्तू या उलट्या ठेवू नये. असा सल्ला वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
चार तास वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली; दीड वर्षांच्या मुलाचं जीवन
Raigad : चार तास वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली; दीड वर्षांच्या मुलाचं जीवन संपलं, रायगडमधील घटनेने हळहळ
फायनान्स कंपन्यांची खुलेआम गुंडागर्दी; 22 हजारांचा हफ्ता चुकला अन्....
Latur : फायनान्स कंपन्यांची खुलेआम गुंडागर्दी; 22 हजारांचा हफ्ता चुकला, वसुलीसाठी शेतकऱ्याला शिवीगाळ
सातारा जिल्हा बँकेत भाजपला बाजूला सारत राष्ट्रवादी-शिंदेसेनेची सत्ता!
Satara Bank Election : सातारा जिल्हा बँकेत भाजपला बाजूला सारत राष्ट्रवादी-शिंदेसेनेची सत्ता!
मन शांत ठेवलं की मार्ग निघतो... बाळासाहेबांच्या एका शिकवणीचा उद्धव....
Uddhav Thackeray : मन शांत ठेवलं की मार्ग निघतो... बाळासाहेबांच्या एका शिकवणीचा उद्धव ठाकरेंनी केला उल्लेख; नेमकं काय म्हणाले?
सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेत नवं समीकरण; काँग्रेसचे महेंद्र लाड....
Sangli Bank : सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेत नवं समीकरण; काँग्रेसचे महेंद्र लाड अध्यक्ष तर, तानाजी पाटील उपाध्यक्ष
मेळघाटच्या जंगलावर कुऱ्हाड पडणार? चिखलदर्‍यात 1500 मेगावॅटचा जलविद्युत
Melghat : मेळघाटच्या जंगलावर कुऱ्हाड पडणार? चिखलदर्‍यात 1500 मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प; 240 हेक्टर वनक्षेत्रावर संकट
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; लोणार सरोवराला जागतिक भूगर्भीय..
Lonar Lake : महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; लोणार सरोवराला जागतिक भूगर्भीय वारसा स्थळाचा दर्जा
सोनं एका दिवसात एवढ्या रुपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले....
Gold Silver Price Today : सोनं एका दिवसात एवढ्या रुपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले; जळगावच्या सराफ बाजारात मोठा दिलासा, पाहा आजचे भाव
शायना एनसी विधानभवनात दाखल; एकनाथ शिंदेंनी भेटीसाठी बोलावल्याची माहिती
Shaina NC : शायना एनसी विधानभवनात दाखल; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेटीसाठी बोलावल्याची माहिती, राजकीय चर्चांना उधाण
बाळासाहेबांचा फोटो अनावधानाने फाडला असेल तर...; शंभुराज देसाई नेमकं...
Shambhuraj Desai : बाळासाहेबांचा फोटो अनावधानाने फाडला असेल तर...; शंभुराज देसाई नेमकं काय म्हणाले?