Thane News: रुग्णालयाच्या जलवाहिनीवर बेकायदा कनेक्शन, पाणी नसल्याने 7 रुग्णांना घरी पाठवले

अपुरा पुरवठा होऊन पाणीसाठा संपल्याने सात रुग्णांचे डायलिसिस न करताच त्यांना घरी पाठविल्याची संतापजनक घटना घडली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामध्येच आरोग्यव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे चित्र पाहायला मिळत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

Thane News:  रुग्णालयाच्या जलवाहिनीवर बेकायदा कनेक्शन, पाणी नसल्याने 7 रुग्णांना घरी पाठवले
Thane News
| Updated on: Nov 26, 2026 | 1:39 PM

ठाण्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रुग्णालयाच्या स्वतंत्र जलवाहिनीवर अनधिकृत पाणी कनेक्शन घेतल्याने अपुरा पुरवठा होऊन पाणीसाठा संपल्याने सात रुग्णांचे डायलिसिस न करताच त्यांना घरी पाठविल्याची संतापजनक घटना घडली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामध्येच आरोग्यव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे चित्र पाहायला मिळत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

नेमकं काय घडलं?

Loading...

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  ठाणे महापालिका रुग्णालयाच्या जलवाहिनीवर बेकायदा कनेक्शन घेतल्याने अपुरा पाणी पुरवठा झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे, यामुळे सात रुग्णांना डायलिसीस न करताच घरी पाठवण्यात आले.  मुंब्रा येथील स्वातंत्र्यसैनिक हकीम अजमल खान रुग्णालयात हा  प्रकार घडला आहे.

मुंब्रा येथील कौसा भागातील ठाणे महापालिकेच्या स्वातंत्र्यसैनिक हकीम अजमल खान रुग्णालयात कमी पाणी पुरवठा होतो. टँकरने पाणीपुरवठा न झाल्याने सोमवारी संध्याकाळी पाणीसाठा संपला. येथे रुग्णांचे रोज तीन सत्रांत डायलिसिस केले जाते. प्रत्येक सत्रात रुग्णांसाठी ९०० लिटर पाणी लागते.

रुग्णालयाला पाणीपुरवठा करणाऱ्या वाहिनीमधून शुक्रवारपासून पाणीपुरवठा होत नव्हता. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाकडे टँकरची मागणी करण्यात आली. त्यांनीही टँकर देण्यास असमर्थता व्यक्त केली. परिणामी सोमवारी तिसऱ्या सत्रातील रुग्णांना डायलिसिस पूर्ण करण्याएवढ्या पाण्याचा साठा रुग्णालयात उपलब्ध नव्हता.

त्यामुळे तिसऱ्या सत्रातील सात रुग्णांचे डायलिसिस न करता त्यांना घरी पाठविण्यात आले. या प्रकाराने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.  दरम्यान, मुंब्रा रुग्णालयातने पाण्याच्या समस्येबाबत कळवले नाही. सोमवारच्या घटनेबाबत आम्हाला काहीही माहिती नाही. याबाबत सविस्तर चौकशी केली जाईल असं छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयत कळवा च्या अधिष्ठाता डॉ. स्वप्निल कदम यांनी सांगितले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us