एकनाथ शिंदेंनी किल्ले रायगडावरून विरोधकांवर तोफ डागली; म्हणाले, संविधान धोक्यात म्हणणाऱ्यांचं…;
एकनाथ शिंदेंनी किल्ले रायगडावरून विरोधकांवर तोफ डागली आहे. यावेळी त्यांनी संविधान धोक्यात म्हणणाऱ्यांवरही जोरदार हल्लाबोल केला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रायगडच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याला एकनाथ शिंदे यांच्यासहित शिवसेनेचे आमदार, खासदार देखील उपस्थित आहेत. संविधान दिनाच्या मुद्द्यावरून एकनाथ शिंदे यांच्यावर विरोधकांवर जोरदार टीका केली. संविधान धोक्यात म्हणऱ्यांचं अस्तित्व धोक्यात आलं आहे, अशा शब्दात शिंदेंनी टीका केली. देशातील 140 कोटी जनता सुज्ञ असल्याचेही त्यांनी म्हटलं.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताची घटना लिहिली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 मध्ये संविधान दिन जाहीर केला. तेव्हापासून संविधान दिनानिमित्त अनेक कार्यक्रम घेतले जातात. आज देखील रायगडावर संविधान दिनाचं औचित्य साधून बाळासाहेब ठाकरे गड किल्ले स्वच्छता अभियान राबवलं जात आहे. या अभियानांअंतर्गत हजारो कार्यकर्ते येतात. ते स्वत:हून साफसफाई करतात. हे सगळं हे प्रदुषणमुक्त करण्यासाठी आहे. संविधान दिनाचं औचित्य साधून हा कार्यक्रम हाती घेतला. पर्यावरण विभागने हा कार्यक्रमाने हाती घेतला. हे अभियान लोक चळवळ बनेल. सगळ्यांना संविधान दिनाच्या शुभेच्छा देतो’.
विरोधकांवर टीका करताना एकनाथ शिंदे म्हणाले, ‘संविधान धोक्यात म्हणणाऱ्यांना संविधन कधी आठवला नाही. हा दिन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केला. संविधानाला अनेक वर्ष झाली. विरोधकांना संविधान दिन कधी आठवलाच नाही. देशभरा सामाजिक उपक्रम सुरू आहे. संविधान धोक्यात म्हणणाऱ्यांचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. त्यामुळे संविधान धोक्यात असल्याचे म्हणत आहे. 140 कोटी जनता सुज्ञ आहे. बाबासाहेबांचं संविधान हे चंद्र-सूर्य असेपर्यंत कायम राहणार. संविधानावरच देश चालत आहे. घटना बाबासाहेबांनी लिहिली. त्यांनी जगभरातील घटनेचा अभ्यास करून लिहिली. आपलं संविधान उत्तम आहे. न्याय हा गोरगरिबांना मिळाला पाहिजे. न्याय शोषितांना मिळाला पाहिजे. ही बाबासाहेबांची घटना आहे. त्यांचा आदर्श हाच आहे. शेवटच्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे’. एकनाथ शिंदे यांनी यावेळी रायगडच्या महाडमधील चवदार तळ्यावरही भाष्य केलं. सरकार महाडच्या चवदार तळ्याचे सुशोभीकरण करत असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
