AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप? ठाकरेंचा आमदार मंत्री उदय सांमत यांच्या भेटीला, ऑपरेशन टायगर 3:0 सुरू?

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप होण्याची चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेदरम्यान ठाकरेंचा आमदार मंत्री उदय सांमत यांच्या भेटीला पोहोचला. यावरून ऑपरेशन टायगर 3:0 सुरू झाल्याची चर्चा सुरू झाली.

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप? ठाकरेंचा आमदार मंत्री उदय सांमत यांच्या भेटीला, ऑपरेशन टायगर 3:0 सुरू?
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 26, 2026 | 10:33 AM
Share

राज्यात पुन्हा एकदा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिंदे गटाच्या नेत्यांकडून राज्यात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर होणार असल्याचा दावा केला जात आहे. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शरद पवार गटाचे आमदार अभिजीत पाटील यांच्या घरी पोहोचले होते. त्यानंतर ठाकरे गटाचे बाबाजी काळे यांनी मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

एकनाथ शिंदे यांची शिवसेना पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात मोठा डाव टाकण्याची चर्चा आहे. शिंदे गटाच्या नेत्यांनी ऑपरेशन टायगरवरून विधान केल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.  शिंदे गट हा ठाकरे आणि शरद पवारांचे आमदार फोडण्याच्या तयारीत आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या राजकीय चर्चेदरम्यान ठाकरे गटाचे आमदार बाबाजी काळे यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली.  खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे आमदार बाबाजी काळे यांनी शिवसेना नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. उदय सामंत आणि बाबाजी काळे यांच्यात राजकिय चर्चा झाल्याची वरिष्ठ सूत्रांची माहिती दिली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

रायगडमध्ये सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद वाढली 

दरम्यान, दुसरीकडे महायुतीतील पक्षातही फोडाफोडी सुरू आहे.  रायगड जिल्ह्यातील खोपोली शहरात मागील आठवड्यात सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संवाद मेळावा संपन्न झालाय. या मेळाव्यात  शिंदे गट आणि भाजपतील सुमारे १०० कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केलाय. यावेळी  खासदार सुनील तटकरे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तसेच पक्षात नव्याने प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत करून त्यांना पक्षसंघटना मजबूत करण्याचे आवाहन केले. या पक्षप्रवेशामुळे खोपोलीसह कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Follow Us
500 कोटींच्या व्यवहाराची ऑडिओ क्लिप SIT कडे सुपूर्द; जरांगेंचा खुलासा
Manoj Jarange : 500 कोटींच्या व्यवहाराची ऑडिओ क्लिप SIT कडे सुपूर्द; मनोज जरांगे पाटलांचा मोठा खुलासा, म्हणाले...
पुण्याचं पालकत्व तुम्हीच घ्या; सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Supriya Sule : पुण्याचं पालकत्व तुम्हीच घ्या; सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
भारतासह 14 व्यापारी भागीदार देशांवर अमेरिका पुन्हा टॅरिफ लावणार?
Donald Trump : भारतासह 14 व्यापारी भागीदार देशांवर अमेरिका पुन्हा टॅरिफ लावणार?
शरद पवारांंची NCP NDA सोबत गेल्यानंतर रोहित पवारांची रणनीती काय?
Rohit Pawar : शरद पवारांंची NCP NDA सोबत गेल्यानंतर रोहित पवारांची रणनीती काय?
गोकुळमधील केस लढायला 90 लाख दिले, शेतकऱ्यांना किती पैसे दिले? दीपकेंचा
Abhijeet Dipke : गोकुळमधील केस लढायला 90 लाख दिले, शेतकऱ्यांना किती पैसे दिले? दीपकेंचा सवाल
पुर्णेकर प्रकरण पुन्हा चर्चेत, 2 डिसेंबरपूर्वी तपासाची सद्यस्थिती....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पुर्णेकर प्रकरण पुन्हा चर्चेत, 2 डिसेंबरपूर्वी तपासाची सद्यस्थिती स्पष्ट करा; हायकोर्टाचे आदेश
दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी सरकारचा निर्णय काय? VIDEO बघाच
Maharashtra Drought : दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी सरकारचा निर्णय काय? VIDEO बघाच
माटुंग्यात ज्वेलर्सवर अंदाधुंद गोळीबार! 5 ते 6 राऊंड फायरिंगने परिसरात
माटुंग्यात ज्वेलर्सवर अंदाधुंद गोळीबार! 5 ते 6 राऊंड फायरिंगने परिसरात खळबळ
पुण्यात कोर्टाबाहेर मंदार किवळेंवर गोळीबार अन् कोयत्याने वार; दौंड...
पुण्यात कोर्टाबाहेर मंदार किवळेंवर गोळीबार अन् कोयत्याने वार; दौंडमधून 5 आरोपी जेरबंद!
डोंबिवलीत रिक्षाचालकांची मनमानी? कोणतीही परवानगी न घेता 5 रुपयांची...
डोंबिवलीत रिक्षाचालकांची मनमानी? कोणतीही परवानगी न घेता 5 रुपयांची भाडेवाढ, प्रवासी संतप्त!