AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यातील कोर्टाबाहेरील हल्ला प्रकरणात योगेश कदम यांनी सांगितले सर्वच काही, आरोपींना..

पुण्यात काल धक्कादायक घटना घडली. या घटनेने खळबळ उडाली. चक्क पुणे कोर्टाबाहेर आरोपीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. अगोदर गोळीबार करण्यात आला, त्यानंतर कोयत्याने सपासप वार करण्यात आली.

पुण्यातील कोर्टाबाहेरील हल्ला प्रकरणात योगेश कदम यांनी सांगितले सर्वच काही, आरोपींना..
Yogesh Kadam
| Updated on: Nov 26, 2026 | 10:28 AM
Share

पुण्यात भर दिवसा धक्कादायक घटना घडली. पुणे कोर्टाबाहेर एका हत्या प्रकरणातील आरोपीवप गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून हल्ला करण्यात आला. भर दुपारी ही घटना घडली. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ पुढे आल्याने एकच खळबळ उडाली. पुण्यात कायदा सुव्यवस्था उरली का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. चार दिवसांपूर्वीच हा आरोपी जामिनावर बाहेर आला होता. तो कोर्टात गेला असता त्याच्यावर गेट क्रमांक चारच्या बाहेर जीवघेणा हल्ला करण्यात आला. न्याय देवतेच्या दारात हा प्रकार उडल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. सहा हल्लेखोरांनी मिळून हल्ला चढवला. सुरूवातीला गोळीबार करण्यात आला. मात्र, तो निशाणा चुकला. त्यानंतर हल्लेखोरांनी थेट सपासप कोयत्याने वार केले. या प्रकारानंतर पुणे कोर्टाबाहेर भीतीचे वातावरण बघायला मिळाले. या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली. आज त्यांना कोर्टात हजर केले जाईल.

20 एप्रिल 2025 मध्ये कात्रजमध्ये शुभम चव्हाण याची हत्या मंदार किवळे याने केली होती. तो या हत्या प्रकरणात चार दिवसांपूर्वीच जेलमधून बाहेर आला. मंदार बाहेर आल्यानंतर शुभमच्या भावाने हा कट रचून मंदारवर हल्ला केला. ससून रूग्णालयात मंदार किवळे याच्यावर उपचार सुरू आहेत. पुण्यात असे प्रकार घडत असल्याने कायदा सुवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला.

त्यातच या प्रकरणावर गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी मोठे विधान केले. योगेश कदम यांनी म्हटले की, हा ज्यावेळी ही घटना घडली, त्यानंतर मी ही मुले कुठून आली होती, यापूर्वीचे त्यांच्यावर काही गुन्हे आहेत का? याबाबतची सर्व माहिती मी काल मागून घेतली. या प्रकरणाला आम्ही अतिशय गांर्भियाने घेतले आहे. सर्व आरोपींना ताब्यात घेतले आहे. पुणे किंवा इतर शहरात आपण बघितले असेल की, एक दहशत पसरवण्यासाठी असे प्रकार केले जात आहेत.

अशांवर कठोर कारवाईचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. इथे कुठलीही दया मया न दाखवता अशा प्रकारावर कडक कारवाई करा. पुणे पोलिस आयुक्तांनी मागील काही दिवसांमध्ये अनेक मकोकाच्या कारवाया केल्या आहेत. पोलिसांचा धाक काय असतो, हे दाखवून द्या, असे निर्देश पोलिसांना आम्ही दिले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची चाैकशी सुरू आहे.

Follow Us
पुण्याचं पालकत्व तुम्हीच घ्या; सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Supriya Sule : पुण्याचं पालकत्व तुम्हीच घ्या; सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
भारतासह 14 व्यापारी भागीदार देशांवर अमेरिका पुन्हा टॅरिफ लावणार?
Donald Trump : भारतासह 14 व्यापारी भागीदार देशांवर अमेरिका पुन्हा टॅरिफ लावणार?
शरद पवारांंची NCP NDA सोबत गेल्यानंतर रोहित पवारांची रणनीती काय?
Rohit Pawar : शरद पवारांंची NCP NDA सोबत गेल्यानंतर रोहित पवारांची रणनीती काय?
गोकुळमधील केस लढायला 90 लाख दिले, शेतकऱ्यांना किती पैसे दिले? दीपकेंचा
Abhijeet Dipke : गोकुळमधील केस लढायला 90 लाख दिले, शेतकऱ्यांना किती पैसे दिले? दीपकेंचा सवाल
पुर्णेकर प्रकरण पुन्हा चर्चेत, 2 डिसेंबरपूर्वी तपासाची सद्यस्थिती....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पुर्णेकर प्रकरण पुन्हा चर्चेत, 2 डिसेंबरपूर्वी तपासाची सद्यस्थिती स्पष्ट करा; हायकोर्टाचे आदेश
दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी सरकारचा निर्णय काय? VIDEO बघाच
Maharashtra Drought : दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी सरकारचा निर्णय काय? VIDEO बघाच
माटुंग्यात ज्वेलर्सवर अंदाधुंद गोळीबार! 5 ते 6 राऊंड फायरिंगने परिसरात
माटुंग्यात ज्वेलर्सवर अंदाधुंद गोळीबार! 5 ते 6 राऊंड फायरिंगने परिसरात खळबळ
पुण्यात कोर्टाबाहेर मंदार किवळेंवर गोळीबार अन् कोयत्याने वार; दौंड...
पुण्यात कोर्टाबाहेर मंदार किवळेंवर गोळीबार अन् कोयत्याने वार; दौंडमधून 5 आरोपी जेरबंद!
डोंबिवलीत रिक्षाचालकांची मनमानी? कोणतीही परवानगी न घेता 5 रुपयांची...
डोंबिवलीत रिक्षाचालकांची मनमानी? कोणतीही परवानगी न घेता 5 रुपयांची भाडेवाढ, प्रवासी संतप्त!
शक्तीपीठ प्रकल्पाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध; नेवरीत आंदोलन
शक्तीपीठ प्रकल्पाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध; नेवरीत आंदोलन, अनेकांना पोलिसांनी घेतले ताब्यात