AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात आई-वडिल गमावले, आयामुळे वाचवलेला बेबी मोशे आता काय करतोय? म्हणाला वडिलांप्रमाणे…

गॅव्ह्रिएल होल्ट्झबर्ग यांच्यानंतर चानोच गेक्टमन यांनी नरिमन हाऊसची जबाबदारी सांभाळली होती. त्यांच्यानंतर कोझलोव्स्की यांनी ही जबाबदारी स्वीकारली. जेरुसलेमचे रहिवासी असलेले कोझलोव्स्की २०१२ पासून नरिमन हाऊसमधील कामकाज पाहत आहेत.

26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात आई-वडिल गमावले, आयामुळे वाचवलेला बेबी मोशे आता काय करतोय? म्हणाला वडिलांप्रमाणे...
26 11 attack survival baby moshe today
| Updated on: Nov 26, 2026 | 1:36 PM
Share

२६ नोव्हेंबर २००८ रोजी पाकिस्तानचा अतिरेकी अजमल कसाब त्याच्या दहा साथीदारांनी मुंबईवर नृशंस हल्ला केला त्याला आज पूरी १८ वर्षे लोटली आहेत. हा हल्ला इतका भयानक होता की त्यात निष्पाप नागरिक तर ठार झालेच शिवाय पोलीस आणि सैन्य दलातील उमेदीचे अधिकाऱ्यांना गमवावे लागले. या हल्ल्यात सीएसएमटीची पुरातन इमारत, नरीमन पॉईटच्या हॉटेल ताज आणि हिल्टन टॉवर सह कुलाब्यातील ज्यू लोकांचे प्रार्थना स्थळ छाबड हाऊस देखील अतिरेक्यांच्या निशाण्यावर होते. या इस्रायली धार्मिक केंद्राचे ज्यूंचे धार्मिक नेते रब्बी कुटुंब अतिरेक्यांनी बेचिराख केले. या दाम्पत्याचा अवघ्या दोन वर्षांच्या मोशे होल्ट्झबर्गला आयाने वाचवले. हा पुढे जगभरात ‘बेबी मोशे’ म्हणून ओळखला गेला. सध्या बेबी मोशे काय करतोय…ते वाचा…

26 11 attack survival baby moshe

२००८ मध्ये मुंबईतील कुलाबा परिसरातील नरिमन हाऊसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातून इस्रायली धर्मस्थळ छाबड हाऊसमधील दोन वर्षांचा मुलगा बेबी मोशे अतिरेक्यांच्या गोळ्यांपासून आश्चर्यकारकरित्या वाचला. त्याला त्याच्या आयाने लपवून ठेवले होते. सध्या बेबी मोशे उर्फ मोशे होल्ट्झबर्ग २० वर्षांचा झाला आहे. त्याला आता त्यांच्या दिवंगत वडिलांप्रमाणेच ज्यूंचा धार्मिक गुरु म्हणजे रब्बी बनायचे आहे. अतिरेक्यांनी त्याच्या आई-वडिलांना ठार केले होते.

baby moshe

इस्रायली मोशे होल्ट्झबर्ग, ज्याला जगभरात ‘बेबी मोशे’ म्हणून ओळखले जाते,तो सध्या न्यूयॉर्कमध्ये रब्बी होण्यासाठी धार्मिक शिक्षण घेत आहे. त्याला त्याच्या वडिलांप्रमाणेच रब्बी बनण्याची इच्छा आहे. २६ नोव्हेंबर २००८ रोजी पाकिस्तानी अतिरेकी संघटना लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांनी मुंबईत अनेक महत्वाच्या ठिकाणी केलेल्या हल्ल्यात नरिमन हाऊसलाही लक्ष्य केले गेले होते. या ठिकाणाची जबाबदारी पाहाणारे रब्बी इस्रायल कोझलोव्स्की यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, दोनच आठवड्यांपूर्वी न्यूयॉर्कमध्ये झालेल्या रब्बींच्या एका परिषदेत माझी मोशेशी भेट झाली.

बेबी मोशे घेतोय धार्मिक प्रशिक्षण

“या परिषदेला जगभरातून चार ते पाच हजार रब्बी उपस्थित होते. त्यामध्ये छाबड हाऊसच्या बेबी मोशेचाही सहभाग होता कोझलोव्स्की यांनी सांगितले. त्यांनी त्यावेळी आपल्या मोबाईलमध्ये बेबी मोशे याचे एक छायाचित्र घेतले ते त्यांनी दाखवले. या छायाचित्रात पारंपरिक ज्यूंच्या धार्मिक वेशभूषेत मोशे इतर रब्बींसोबत प्रार्थनेला आलेला दिसत आहे. ज्यू धर्मातील आध्यात्मिक मार्गदर्शक गुरुला रब्बी म्हणतात. तो त्यांचा एक प्रकारचा धार्मिक शिक्षक आणि धार्मिक कायद्यांचा अभ्यासक मानला जातो.

हल्ल्यावेळी अवघ्या दोन वर्षांचा असलेला ‘बेबी मोशे’ आता २० वर्षांचा तरुण झालेला या छायाचित्रात दिसत आहे. २६/११ च्या हल्ल्यानंतर आपल्या पालकांना गमावल्याने असहायपणे रडणाऱ्या मोशेचे दृश्य जगभरात प्रसिद्ध झाले होते. त्याच्या या आक्रोशाने लाखो लोकांचे मन हेलावले होते. कोझलोव्स्की यांनी बुधवारी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, “मोशे सध्या न्यूयॉर्कमध्ये रब्बी होण्यासाठी धार्मिक शिक्षण घेत आहे. त्याला त्याच्या वडिलांप्रमाणेच रब्बी बनायचे आहे. आशा आहे की तो पुन्हा भारतात परत येईल आणि हीच आमची इच्छा आहे.”

आयाने वाचवले

मोशेचे वडील रब्बी गॅव्ह्रिएल होल्ट्झबर्ग आणि आई रिव्का होल्ट्झबर्ग यांची दहशतवाद्यांनी कुलाबा येथील छाबाड हाऊसमध्ये घुसून हत्या केली होती. हे केंद्र मुंबईतील ज्यू समुदायाच्या धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांचे एक केंद्र होते. त्यावेळी मोशेची काळजी घेणाऱ्या आया सँड्रा सॅम्युएल यांनी मोशेला लपवून इमारतीतून सुरक्षित बाहेर काढले आणि तेथून पळ काढला होता. त्यानंतर आई-वडिलांचे छत्र गमावलेला मोशे आपल्या आजी-आजोबांसोबत राहण्यासाठी इस्रायलला गेला. साल २०१८ मध्ये इस्रायलचे तत्कालीन पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यासह मोशे याने नरिमन हाऊसला भेट दिली होती.

स्मारकात रुपांतर होणार

सध्या कुलाबा येथील नरिमन हाऊसच्या ( छाबड ) इमारती तीन मजल्यांचे आणि तळमजल्याचे संग्रहालय आणि स्मारकात रूपांतर करण्यात येणार आहे. जेरुसलेमचे रहिवासी असलेले कोझलोव्स्की २०१२ पासून नरिमन हाऊसचे सध्या कामकाज पाहत आहेत.

Follow Us
शिवरायांच्या गडकिल्ल्यांसाठी सरकारचा पुढाकार; एकनाथ शिंदेंनी सांगितला
शिवरायांच्या गडकिल्ल्यांसाठी सरकारचा पुढाकार; एकनाथ शिंदेंनी सांगितला खास संकल्प
पुणे कोर्टाबाहेरील हल्ल्यावेळी हल्लेखोरांची घोषणाबाजी; मंदार किवळे....
Pune : शुभम दादा, तुझ्या खुनाचा बदला घेतला... पुणे कोर्टाबाहेरील हल्ल्यावेळी हल्लेखोरांची घोषणाबाजी; मंदार किवळेंच्या जबाबातून धक्कादायक माहिती समोर
शरद पवार पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय?
Sharad Pawar : शरद पवार पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय?
चार महिन्यांत पाचव्यांदा मुंबई महापालिकेला धमकीचा मेल; BMC मुख्यालयासह
BMC : चार महिन्यांत पाचव्यांदा मुंबई महापालिकेला धमकीचा मेल; BMC मुख्यालयासह अनेक ठिकाणांना बॉम्बने उडवण्याचा इशारा
मुंबईतील 235 धोकादायक पागडी इमारतींचा प्रश्न ऐरणीवर; आदित्य ठाकरेंचे..
मुंबईतील 235 धोकादायक पागडी इमारतींचा प्रश्न ऐरणीवर; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र!
दुकानाच्या पाटीवर बॉम्बेचा उल्लेख, मनसेचा आक्षेप; फोर्टमध्ये....
Mumbai : MNS : दुकानाच्या पाटीवर बॉम्बेचा उल्लेख, मनसेचा आक्षेप; फोर्टमध्ये कार्यकर्त्यांनी थेट लावले मुंबईचे पोस्टर
NDA मध्ये जाऊन सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होत असतील, तर स्वागत....
Sanjay Raut on Supriya Sule : NDA मध्ये जाऊन सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होत असतील, तर स्वागत, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
26/11 च्या हल्ल्याचा उल्लेख करत मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान....
Devendra Fadnavis : 26/11 च्या हल्ल्याचा उल्लेख करत मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले, मुंबई कधीही...
पुण्यातील गुन्ह्यांचा पाढाच वाचला; सुषमा अंधारेंचा पोलिसांना थेट सवाल
Sushma Andhare : बलात्कार, अपहरण, खून... पुण्यातील गुन्ह्यांचा पाढाच वाचला; सुषमा अंधारेंचा पोलिसांना थेट सवाल
राष्ट्रवादीत नेमकं काय शिजतंय? सुप्रिया सुळेंच्या बैठकीला रोहित पवार..
NCP : राष्ट्रवादीत नेमकं काय शिजतंय? सुप्रिया सुळेंच्या बैठकीला रोहित पवार उपस्थित; राजकीय चर्चांना उधाण