एकनाथ शिंदेंच्या बंगल्याबाहेर मध्यरात्री थरार; एस्कॉर्ट वाहनाला…पोलिसांची एकच धावाधाव

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंगल्याबाहेर मध्यरात्री थरार घडला. पोलिसांच्या एस्कॉर्ट वाहनाला आग लागली. यामुळे पोलिसांची एकच धावाधाव झाली.

एकनाथ शिंदेंच्या बंगल्याबाहेर मध्यरात्री थरार; एस्कॉर्ट वाहनाला...पोलिसांची एकच धावाधाव
eknath shinde house thane
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 07, 2026 | 7:29 AM

देशासहित राज्यातील विविध भागात दिवाळी उत्साह पाहायला मिळत आहे. लहानांपासून ज्येष्ठापर्यंतची मंडळी फटाके फोडून दिवाळी उत्सव साजरा करत आहेत. या दिवाळीत उपुमख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्याबाहेर मध्यरात्री थरार पाहायला मिळाला. शिंदेंच्या बंगल्याजवळ पोलीस एस्कॉर्ट वाहनाला आग लागल्याची घटना घडली. एस्कॉर्ट वाहनाला आग लागल्यानंतर एकच खळबळ उडाली. यामुळे पोलिसांची एकच धावाधाव झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्याजवळ पोलीस एस्कॉर्ट वाहनाला शुक्रवारी मध्यरात्री अचानक आग लागल्याची घटना घडली. ठाणे पश्चिम भागातील लुईसवाडी परिसरात ही घटना घडली. एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यासमोर पोलीस एस्कॉर्टच्या वाहनाला आग लागल्यानंतर पोलिसांची एकच धावाधाव झाली. वाहनातून धूर निघाल्यानंतर काही वेळातच आगीने पेट घेतला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने हालचाल केली. पोलिसांनी मध्यरात्री अग्निशमन दलाला पाचारण केलं. यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न केले. आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण स्पष्ट झालेले नाही. तर या घटनेत कोणत्याही प्रकारच्या जीवितहानीबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या वाहनाला आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोलीस अधिकारी देखील पोहोचले.

Loading...
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us