कुठं किती खर्च, यादीच वाचून दाखविली, फक्त 10 टक्के निधी कल्याणमध्ये, श्रीकांत शिंदे यांचा दावा

भविष्यात विकास होणाऱ्या भागासाठी हा निधी खर्च केला जाणार आहे, अशी माहिती श्रीकांत शिंदे यांनी दिली.

कुठं किती खर्च, यादीच वाचून दाखविली, फक्त 10 टक्के निधी कल्याणमध्ये, श्रीकांत शिंदे यांचा दावा
श्रीकांत शिंदे यांचा दावा
Image Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: Nov 04, 2022 | 8:24 PM

कल्याण : 11 हजार कोटी रुपयांचं गूढ काय यासाठी मी आपल्यासमोर आलोय, असं खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले. काही न्यूज चॅनल्सनी मुख्यमंत्री शिंदे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघात दिलेले असल्याच्या बातम्या चालविल्या. तिथल्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास केला असता, फॅक्ट चेक केलं असतं तर नेमका हा पैसा कुठं खर्च केला जाणार आहे, हे कळलं असतं. मुळात 11 हजार कोटी रुपये दिले आहेत. ते ठाणे जिल्ह्यातील एमएमआर रिजन असेल, कर्जत, अलिबाग, पेण या ठिकाणी येणाऱ्या काळात हे पैसे खर्च केले जाणार आहेत.

खोपरी पटनी पूल हा ठाणे लोकसभेमध्ये येतो. गायमुख ते ठाणे आणि भिवंडी हा जोडणारा पूल हा भिवंडी आणि ठाण्यामध्ये येतो. ठाणे कोस्टल रोड हा ठाणे लोकसभा मतदारसंघात येतो. पालघर रस्ता रुंदीकरण हा पालघर लोकसभा मतदारसंघात येतो. वाडा, वाशिम पाडगा हा भिवंडी लोकसभेमध्ये येतो. कल्याण ते मानखोली बापगाव हा भिवंडी लोकसभेमध्ये येतो.

11 हजार कोटींची तत्वता मंजुरी दिली आहे. मुंबई, ठाण्यात मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. परंतु, भिवंडी, पालघरमध्ये विकास झालेला नाही. भविष्यात विकास होणाऱ्या भागासाठी हा निधी खर्च केला जाणार आहे, अशी माहिती श्रीकांत शिंदे यांनी दिली.

अंबरनाथ, कर्जत, बदलापूरला लोकं जात आहेत. त्याठिकाणची दळणवळण व्यवस्था चांगली झाली पाहिजे. एमएमआरए रिजन आहे, त्या भागात विकास केला जाणार आहे. त्याठिकाणच्या विकासासाठी या योजना तयार झाल्या आहेत.

11 हजार कोटीमधील फक्त दहा टक्के भाग हा कल्याण लोकसभेमध्ये येतो. त्यामुळं मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे म्हणून असा आरोप करणं चुकीचं असल्याचं श्रीकांत शिंदे म्हणाले.