Thane: ठाणे महापालिकेवर लक्ष्मी प्रसन्न! तिजोरीत पडली 300 कोटींची भर

| Updated on: Jul 21, 2022 | 7:09 AM

ठाणे, गेल्या वर्षीच्या तुलनेने या वर्षी नऊ टक्क्यांनी कर वसुली वाढल्यामुळे 700 कोटींचे टार्गेट पूर्ण करण्याचा निर्धार ठाणे महानगरपालिकेच्या (Thane Municipal Corporation) कर विभागाने (tax department) केला आहे. त्यामुळे करापोटी ठाणे महानगरपालिकेच्या तिजोरीत 300 कोटी रुपयांची भर पडली आहे. त्यासाठी प्रत्येक प्रभाग समितीअंतर्गत असलेला मालमत्ता कर विभाग दर शनिवारी खुला ठेवण्यात आला असून त्याला ठाणेकरांच्या […]

Thane: ठाणे महापालिकेवर लक्ष्मी प्रसन्न! तिजोरीत पडली 300 कोटींची भर
Follow us on

ठाणे, गेल्या वर्षीच्या तुलनेने या वर्षी नऊ टक्क्यांनी कर वसुली वाढल्यामुळे 700 कोटींचे टार्गेट पूर्ण करण्याचा निर्धार ठाणे महानगरपालिकेच्या (Thane Municipal Corporation) कर विभागाने (tax department) केला आहे. त्यामुळे करापोटी ठाणे महानगरपालिकेच्या तिजोरीत 300 कोटी रुपयांची भर पडली आहे. त्यासाठी प्रत्येक प्रभाग समितीअंतर्गत असलेला मालमत्ता कर विभाग दर शनिवारी खुला ठेवण्यात आला असून त्याला ठाणेकरांच्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. ऑफलाइनबरोबरच ऑनलाइन मालमत्ता कर (Online Tax) भरण्यासही परवानगी दिली असून नागरिकांनी ऑनलाइनला पसंती दिली आहे. महापालिका क्षेत्रातील जे करदाते पहिल्या सहामाहीबरोबरच दुसर्‍या सहामाहीचा सामान्य कर ‘एकत्रितरित्या महापालिकेकडे जमा करतील अशा करदात्यांना 15 जुलैपर्यंत 10 टक्के सवलत दिली होती. त्या सवलत योजनेस 15 जुलेपर्यंत प्रशासनाने मुदतवाढ दिली आहे. यावेळी सुट्टीच्या दिवशी मालमत्ता कर भरता यावा याकरिता शनिवार दिवसभर तर रविवार अर्धा दिवस प्रभाग स्तरावरील कर संकलन केंद्र कार्यान्वित ठेवले.

टार्गेट असलेल्या 700 कोटींमधील 300 कोटी म्हणजे 39 टक्के मालमत्ता करवसुली 15 जुलैपर्यंत पूर्ण झाली आहे. गतवर्षापेक्षा नऊ टक्के करवसुली यंदा अधिक आहे.  गतवर्षी आतापर्यंत 30 टक्‍के वसुली करण्यात आली होती, तर या वर्षी दिलेले टार्गेट पूर्ण करण्याचा निर्धार केला असून त्यानुसार बैठक घेऊन कर्मचाऱ्यांना टार्गेट पूर्ण करण्यास सांगण्यात आले असल्याची माहिती मालमत्ता कर विभागाच्या उपायुक्तांनी दिली.

31 मार्चची डेडलाइन

700 कोटी रूपयांच्या वसुलीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी 31 मार्च ही डेडलाईन आहे. त्यासाठी आम्ही आतापासूनच प्रयत्न करीत असल्याचे कर विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. ठाणेकरांनीही सहकार्य करावे असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

जुन्या विभाग कार्यालयांची करणार दुरुस्ती

कोपरी, नौपाडा, मुंब्रा, शिळ येथील कर विभाग कार्यालये जुन्या इमारतीमध्ये आहेत. अन्य कार्यालयांची दुरवस्था झाल्याने त्यांची दुरुस्ती करणे गरजे आहे. अतिशय बिकट अवस्थेत कर्मचारी काम करत आहेत. हे विभाग तातडीने दुरुस्त व्हावेत यासाठी वरिष्ठ स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत.