Water Supply : ठाणेकरांसाठी दिलासादायक बातमी, 1 ऑगस्टपासून मिळणार 50 एमएलडी अतिरिक्त पाण्याचा लाभ

ठाणे शहराचा वेगाने विस्तार झाल्यामुळे विस्तारित ठाणे शहराला पाणी पुरवठा करताना ठाणे महानगरपालिकेला मोठी कसरत करावी लागत होती. मात्र आता हे पाणी मिळाल्यामुळे त्यांना दिलासा देणे पालिकेला देखील शक्य होणार आहे.

Water Supply : ठाणेकरांसाठी दिलासादायक बातमी, 1 ऑगस्टपासून मिळणार 50 एमएलडी अतिरिक्त पाण्याचा लाभ
एकनाथ शिंदेImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 20, 2022 | 8:19 PM

ठाणे : ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. ठाणे शहरातील नागरिकांना 1 ऑगस्टपासून 50 एमएलडी अतिरिक्त पाणीपुरवठा (Water Supply) करण्यात येणार आहे. राज्याच्या जलसंपदा विभागाने याला मंजुरी दिली आहे. त्यामुळे विस्तारित ठाणे शहरातील नागरिकांना मोठा दिलासा (Relief) मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नुकतीच ठाणे जिल्ह्यातील पाणी प्रश्नावर आढावा घेण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहात बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत त्यांनी राज्याच्या जलसंपदा विभागाला ठाणे शहराला अतिरिक्त पाणीपुरवठा करण्याचे निर्देश दिले होते. यानुसार राज्याच्या जलसंपदा विभागाने अतिरिक्त 50 एमएलडी पाणी देण्याला मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे ठाणे शहराला मोठा दिलासा मिळाला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे जलसंपदा विभागाला निर्देश

ठाणे शहराचा वेगाने विस्तार झाल्यामुळे विस्तारित ठाणे शहराला पाणी पुरवठा करताना ठाणे महानगरपालिकेला मोठी कसरत करावी लागत होती. मात्र आता हे पाणी मिळाल्यामुळे त्यांना दिलासा देणे पालिकेला देखील शक्य होणार आहे. ठाणे शहराला दररोज 485 दशलक्ष मिलिलिटर एवढा पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र वाढत्या लोकसंख्येमुळे तो देखील अपुरा पडू लागला होता. मध्य वैतरणा जलाशयाची उंची वाढवण्यात आल्याने जास्त पाणी अडवणे शक्य आहे. त्यामुळे आता ठाणे शहराला 100 एमएलडी अतिरिक्त पाणीपुरवठा करण्यात यावा अशी मागणी ठाणे महानगरपालिकेने मुख्यमंत्र्यासोबत झालेल्या बैठकीत जलसंपदा विभागाकडे करण्यात आली होती. या मागणीला अनुसरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे पाणी तातडीने देण्याचे निर्देश जलसंपदा विभागाला दिले होते. त्यानुसार ठाणे शहराची तातडीची गरज भागवण्यासाठी जलसंपदा विभागाने 50 एमएलडी पाणी येत्या 1 ऑगस्टपासून ठाणे शहराला देण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पदग्रहण केल्यानंतर शहराला पहिली मोठी भेट मिळाली आहे. (Citizens of Thane will get 50 MLD additional water benefit from August 1)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.