Thane Cylinder Blast Video : सलग 8 ते 10 सिलिंडरचा जबर स्फोट! ठाण्याच्या वागळे इस्टेट परिसरात अग्नितांडव

सुदैवाने झालेल्या आगीमध्ये कुठल्याही जीवितहानी झालेली नाही. मात्र या आगीमुळे वागळे परिसरात दोन तास लोकांच्या लाईट कापण्यात आल्या त्यामुळे परिसरात लोक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून गर्दी केली होती.

Thane Cylinder Blast Video : सलग 8 ते 10 सिलिंडरचा जबर स्फोट! ठाण्याच्या वागळे इस्टेट परिसरात अग्नितांडव
सिलेंडरचे स्फोट झाले
Image Credit source: twitter
| Edited By: | Updated on: May 29, 2022 | 10:06 AM

ठाणे – ठाणेच्या (Thane) वागळे इस्टेट (Wagle Estate) मध्ये असलेल्या अंबिका नगर 2 मध्ये रात्री 10 च्या सुमारास एका वेल्डिंग कंपनीमध्ये मोठी आग लागली.आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 6 गाड्या, वागळे पोलिस स्टेशनचे (Police) कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी घटनास्थळावर तात्काळ दाखल झाले. आगीची तीव्रता लक्षात आल्यानंतर त्यांनी तब्बल एक-दीड तासांमध्ये आगीवर नियंत्रण मिळविले आहेत. सध्या फायर कुलिंगचे काम सुरू आहे. तसेच स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान आग नेमकी कशामुळे लागली याचा शोध घेत आहेत.

नेमकं काय झालं

ज्यावेळेस या वेल्डिंग कंपनीमध्ये आग लागली. त्यावेळी त्या कंपनीमध्ये वेल्डिंग साठी कंपनीमध्ये एलपीजी गॅस सिलेंडर मोठा प्रमाणात असल्यामुळे 8 ते 10 सिलेंडर जोर जोरात स्फोट झाला. या स्फोटमुळे वागळे परिसर मध्य रात्री हादरून गेला. अचानक झालेल्या स्फोटामुळे वागळे इस्टेट घाबरून गेलं. सुरूवातीला नेमकं काय सुरू आहे, कुणालाच समजलं नाही. लोकं सैरावैरा इकडे तिकडे धावत होती अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.

लाईट गेल्यामुळे लोकं एकदम भयभीत झाली होती

सुदैवाने झालेल्या आगीमध्ये कुठल्याही जीवितहानी झालेली नाही. मात्र या आगीमुळे वागळे परिसरात दोन तास लोकांच्या लाईट कापण्यात आल्या त्यामुळे परिसरात लोक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून गर्दी केली होती. आग कशामुळे लागली याची तपास स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान करत आहेत. लाईट गेल्यामुळे लोकं एकदम भयभीत झाली होती.

त्यामुळे लोकांनी रस्त्यावर उतरून गर्दी केली होती. वेळीचं आगीवर नियंत्रण मिळवल्याने मी अपघात टळला आहे.