सावधान ! लहान मुलांना कोरोना होण्याचं प्रमाण वाढलं, नव्या आकडेवारीमुळे पालकांची चिंता वाढणार

| Updated on: Apr 01, 2021 | 11:32 PM

कोरोनाची दुसरी लाट ही लहान मुलांसाठी अधिक धोकादायक असल्याचं समोर आलं आहे. अंबरनाथ आणि बदलापुरात तसे आकडे समोर आले आहेत. (corona second wave children dangerous)

सावधान ! लहान मुलांना कोरोना होण्याचं प्रमाण वाढलं, नव्या आकडेवारीमुळे पालकांची चिंता वाढणार
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

ठाणे : कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे राज्यात दररोज हजारो कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. मृतांचे प्रमाणही हळूहळू वाढत आहे. रोज मोठ्या संख्येने रुग्ण वाढत असल्यामुळे राज्य शासनानेसुद्धा कोरोना प्रतिबंधात्मक नियामांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे ठरवले आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्गाविषयी एक नवी माहिती समोर येत आहे. कोरोनाची दुसरी लाट ही लहान मुलांसाठी अधिक धोकादायक असल्याचं समोर आलं आहे. अंबरनाथ आणि बदलापुरात तसे आकडे समोर आले आहेत. (number said Ambarnath Badlapur second wave of Corona becoming more dangerous to children)

कोरोनाची दुसरी लाट मुलांसाठी धोकादायक

कोरोनाची नव्याने आलेली लाट ही नव्या स्ट्रेनमुळे आल्याचे दावे केले जातायत. कारण या नव्या कोरोनामध्ये जुन्या कोरोनाच्या लक्षणांसोबतच काही नवीन लक्षणं सुद्धा दिसून येतायत. ताप, थकवा, अशक्तपणा, खोकला या जुन्या लक्षणांसोबतच अतिसार किंवा जुलाब, उलट्यासद्धा या नव्या कोरोनाची नवी लक्षणं आहेत. हीच लक्षणं लहान मुलांसाठी घातक ठरतायत. यापूर्वीही लहान मुलांना कोरोनाची लागण होत होती, मात्र लहान मुलांमध्ये अँटीबॉडीज तयार करण्याची क्षमता मोठ्यांपेक्षा असल्यामुळे ती लवकर बरी व्हायची. मात्र नव्या कोरोनाची जुलाब, उलट्या अशा प्रकारची लक्षणं ही लहान मुलासांठी धोकादायक असू शकतात असं आरोग्य तज्ज्ञांचं मत आहे.

अंबरनाथ, बदलापूरमध्ये मुलांना कोरोना होण्याचे प्रमाण जास्त

जुलाब, उलट्या अशा प्रकारची लक्षणं दिसू लागल्यामुळे लहान मुलांना डिहायड्रेशनची समस्या उद्भवत असून हा त्रास काही मुलांच्या जीवावरही बेतल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अंबरनाथ आणि बदलापूर शहरांमध्ये कोरोनाची लागण झालेल्या लहान मुलांची आकडेवारी टीव्ही 9 च्या हाती आली आहे. ही आकडेवारी धक्कादायक आहे. एकट्या बदलापूर शहरात मागील 3 महिन्यात 401 लहान मुलांना कोरोनाची लागण झालीये. यामध्ये शून्य ते पाच वयोगटातील 88, सहा ते दहा वयोगटातील 96, अकरा ते पंधरा वयोगटातील 113, तर सोळा ते वीस वयोगटातील 104 मुलांचा समावेश आहे. तर अंबरनाथमध्येसुद्धा मागील दोन महिन्यांत 215 मुलांना कोरोनाची लागण झालीये. यामध्ये शून्य ते पाच वयोगटातील 22, सहा ते दहा वयोगटातील 44, अकरा ते पंधरा वयोगटातील 62 आणि सोळा ते वीस वयोगटातील 87 मुलांना कोरोनाची लागण झाली.

मोठ्या व्यक्ती कोरोनाच्या प्रसारक

दुसऱ्या लाटेतल्या कोरोना विषाणूचा परिणाम मोठ्या व्यक्तींवर कमी होत असून या विषाणूची शिकार लहान मुलं जास्त प्रमाणात होत असल्याचे समोर आले आहे. मात्र, यावेळी कोरोना विषाणूचा परिणाम मोठ्यांवर होत नसला तरी ते कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात करु शकतात असं डॉक्टरांचं मत आहे.

दरम्यान, दुसऱ्या लाटेत कोरोना विषाणूची प्रसार क्षमता जास्त असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. लहान मुलांच्या बाबतीत मात्र प्रसार आणि परिणाम हे दोन्ही चिंताजनक असल्याचं डॉक्टर सांगतायत. मोठ्या व्यक्तींकडून कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असून यामुळेच कोरोनाची दुसरी लाट लहान मुलांसाठी जीवघेणी ठरत असल्याचेही डॉक्टरांनी सांगितलं आहे.

इतर बातम्या :

Corona Cases and Lockdown News LIVE : नाशिकमध्ये 3784 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, मृतांचा आकडा 2407 वर

Maharashtra Corona Update : कोरोनाचा विस्फोट! राज्यात तब्बल 43 हजार 183 नवे रुग्ण, 249 जणांचा मृत्य

(number said Ambarnath Badlapur second wave of Corona becoming more dangerous to children)