AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्या जागेवरुन झाला होता वाद त्या जागेवर पोहचली क्राईम ब्रांच, घडामोडींना वेग

गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणी गुन्हे शाखा अलर्ट मोडवर आली आहे. गुन्हे शाखेकडून अत्यंत जलद गतीने तपास केला जातोय. गुन्हे शाखेतील वरिष्ठ अधिकारी आज द्वारली गावात दाखल झाले. त्यांनी संबंधित जागेची पाहणी केली. गुन्हे शाखेकडून जागेच्या कागदपत्रांचा शोध सुरु आहे.

ज्या जागेवरुन झाला होता वाद त्या जागेवर पोहचली क्राईम ब्रांच, घडामोडींना वेग
| Updated on: Feb 05, 2024 | 4:53 PM
Share

सुनील जाधव, Tv9 मराठी, कल्याण | 5 जानेवारी 2024 : भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात केलेल्या गोळीबार प्रकरणी आता पोलिसांच्या तपासाला वेग आला आहे. क्राईम ब्रांचचं एक पथक आज द्वारली गावात दाखल झालं. याच गावात असलेल्या जमिनीवरुन हा वाद निर्माण झाला. गुन्हे शाखेच्या पथकाने जागास्थळी जावून पाहणी केली. यावेळी त्यांनी जागेसंबंधित काही महत्त्वाची कागदपत्रे जमा करण्यास सुरुवात केली. जागा कुणाची आहे आणि नेमका वाद काय होता? याबाबतची माहिती घेण्याचं काम पथकाकडून करण्यात आलं. याच जागेवर 30 आणि 31 जानेवारीला गेट बांधण्याचं काम सुरु होतं. त्यावेळी स्थानिकांनी विरोध केला. विशेष म्हणजे याच जागेस्थळी आमदार गणपत गायकवाड आणि स्थानिक महिलांच्या संभाषणाचा देखील व्हिडीओ व्हायरल झालाय. या व्हिडीओत महिला संबंधित जागा आपल्या मालकीची असल्याचा दावा करत होत्या. या प्रकरणी आता क्राईम ब्रांचकडून जोरदार तपास केला जातोय.

क्राईम ब्रांचची टीम द्वारली गावातून जागेची पाहणी केल्यानंतर उल्हासगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात दाखल झाली. अप्पर पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, उल्हासनगर क्राईम युनिट 4 चे वरिष्ठ अधिकारी राजू सोनवणे, कल्याण क्राईम ब्रँच टीम, ठाणे क्राईम ब्रँचचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबार प्रकरणात फरार आरोपी यांचा शोध कशाप्रकारे करावा, यासाठी क्राईम ब्रँच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत आरोपींचा शोध घेण्यासाठी आणि व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या आरोपींची ओळख पटवून त्यांना पकडण्यासाठी सहा विशिष्ट टीम बनवली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

ठाणे गुन्हे शाखा पथकाने या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी आणि तक्रारदार चैनू जाधव यांची चौकशी सुरू केली आहे. उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्यात ही चौकशी सुरु आहे. अप्पर पोलीस आयुक्त पंजाबराव उगले स्वतः चैनू जाधव यांची चौकशी करत असल्याची माहिती समोर आली आहे.

जागामालकाचा नेमका दावा काय?

गोळीबाराच्या घटनेनंतर जागामालकाने माध्यमांसमोर सविस्तर भूमिका मांडली. त्यांनी नेमका व्यवहार काय झाला होता याबाबत माहिती दिली. “संबंधित जागा ही पावणे पाच एकर आहे. ही जागा 1996 मध्ये विकली होती. संबंधित जागा ही मूळ जागा मालकाने प्रमोद रांका यांना विकली होती. त्यांनी आमचा आजपर्यंत व्यवहार पूर्ण केलाच नाही. पैसे दिले नाही. नंतर पैसे देऊ, असं म्हणत आमचे पैसे रखडवले. त्यांनी अर्धेच पैसे दिले होते. दिवसेंदिवस वर्ष वाढत गेले. मग जागेला भाव वाढत नाही का? आमदार गणपत गायकवाड हे रांका शेठच्या माध्यमातून पार्टनर म्हणून पुढे आले. ते आमच्या शेतावर येऊन डायरेक्ट कम्पाउंड बांधायला लागले. त्यांनी एवढे वर्ष सातबारा रांका यांच्या नावावर केला नाही आणि आता लगेच झालं. म्हणजे राजकारणच आहे. त्यासाठी आम्ही दाद मागायला महेश गायकवाड यांच्याकडे गेलो. त्यांनी सांगितलं की, तुम्हाला न्याय मिळवून देतो किंवा सेटलमेंट करुन देतो. निपटून घेऊ. पण त्यांनी तसं काही केलं नाही. याउलट त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला”, अशी प्रतिक्रिया मूळ जमीन मालकाने दिली.

जागेचा स्पॉट महत्त्वाचा

कल्याण पूर्वेत मलंगगड डोंगराच्या दिशेने एक रस्ता जातो. या रस्त्याला मलंगगड रोड असंही म्हणतात. कल्याण पूर्वेत चक्की नाकाच्या पुढे सरळ हा रस्ता मलंगगडच्या दिशेला जातो. चक्की नाका आणि नेवाली नाका यांच्या मध्यभागी द्वारली गाव आहे. या परिसरात आता मोठमोठे बांधकामाचे प्रोजेक्ट्स आहेत. या परिसरात जमिनीचे भाव गगनाला पोहोचले आहेत. आजूबाजूच्या परिसरात टोलेजंग इमारती आता उभ्या राहत आहेत. मोठमोठ्या बांधकाम कंपन्यांनी परिसरात जागा घेतल्या आहेत. पुढच्या काळात इथे टोलेजंग इमारतींची मोठी वस्ती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही जागा महत्त्वाची आहे. या जागेची किंमत आजच्या तारखेला 24 कोटींच्या घरात आहे. त्यामुळे या जागेवरुन हा संघर्ष जास्त पेटलेला बघायला मिळाला.

गणपत गायकवाड यांना पोलीस कोठडी

गणपत गायकवाड यांनी बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या शहरप्रमुखावर गोळ्या झाडल्या. या प्रकरणी दोन जण जखमी आहे. गुन्हे शाखेकडून आता या प्रकरणी तपास सुरु आहे. गणपत गायकवाड यांना 11 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर जखमी असलेले महेश गायकवाड यांच्यावर काल शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी काय-काय अपडेट येतात ते पाहणं आता महत्त्वाचं आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.