प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या जागेवरील विस्तारीत ठाणे रेल्वे स्थानक बांधण्याच्या प्रकल्पाला मूर्त स्वरूप द्या : एकनाथ शिंदे

ठाणे शहराची वाढती लोकसंख्या आणि ठाणे रेल्वे स्थानकावरील गर्दीचा मोठा ताण आहे. हे लक्षात घेता प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या जागेवर विस्तारीत ठाणे रेल्वे स्थानक बांधणे काळाची गरज आहे.

प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या जागेवरील विस्तारीत ठाणे रेल्वे स्थानक बांधण्याच्या प्रकल्पाला मूर्त स्वरूप द्या : एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे, नगरविकास मंत्री
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Mar 26, 2021 | 1:05 AM

मुंबई : “ठाणे शहराची वाढती लोकसंख्या आणि ठाणे रेल्वे स्थानकावरील गर्दीचा मोठा ताण आहे. हे लक्षात घेता प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या जागेवर विस्तारीत ठाणे रेल्वे स्थानक बांधणे काळाची गरज आहे. या प्रकल्पाला मूर्त स्वरूप देण्यासाठी मुख्य सचिवांनी लोकहितासाठी उच्च न्यायालयामध्ये सहमती करार (कन्सेंट टर्म) दाखल करावा,” अशी सूचना नगरविकास मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. ते सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत बोलत होते. या बैठकीत मुख्य सचिव सीताराम कुंटे दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

एकनाथ शिंदे म्हणाले, “ठाणे रेल्वे स्थानक 150 वर्षांपूर्वीचे आहे. सध्या या स्थानकावरून दररोज सुमारे 12 लाख प्रवासी प्रवास करतात. गर्दीचा अतिरीक्त ताण लक्षात घेता ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरातील प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या अतिक्रमीत जागेवर विस्तारीत स्थानक उभारण्याचा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव गेल्या 5 ते 6 वर्षांपासून प्रलंबित आहे. खासदार राजन विचारे या कामासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहेत.”

“ठाणे ते मुलुंड दरम्यान हे नविन रेल्वे स्थानक रेल्वे मंत्रालयाने देखील मंजूर केले आहे. त्याचा स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत समावेश करण्यात आला आहे,” अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

‘मुख्य सचिवांनी लोकहितासाठी उच्च न्यायालयात कन्सेंट टर्म फाईल दाखल करावे’

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, “हा प्रकल्प व्यावसायिक वापरासाठी नाही. लोकहितासाठी करण्यात येणार आहे. कुठलीही खासगी संस्था त्याची अंमलबजावणी करणार नाही. ठाणे महापालिका मनोरुग्णालयाच्या बाधित होणाऱ्या 3 इमारतींचे बांधकाम करून देणार आहे. प्रकल्पाला विलंब होत असल्याने त्याच्या खर्चात देखील देखील वाढ होत असल्याचा मुद्दा लक्षात घ्यावा. या सर्व बाजू पाहता मुख्य सचिवांनी लोकहितासाठी उच्च न्यायालयात कन्सेंट टर्म फाईल दाखल करावे.”

हेही वाचा :

‘सांगलीत राष्ट्रवादीकडून ‘टप्प्यात कार्यक्रम’, आता जळगावात सेनेचा भगवा; भाजपाला ओहोटीचे दिवस’

जळगावातही ‘सांगली पॅटर्न’?, भाजपचे 27 बंडखोर नगरसेवक ठाण्यात; शिवसेनेचा महापौर होणार?

ठाणे जिल्हा बँक निवडणुकीसाठी महाविकास आघाडी मैदानात, शिंदे-आव्हाडांकडून उमेदवार जाहीर

व्हिडीओ पाहा :

Eknath Shinde direct chief secretary on new thane railway station construction

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें