Kalyan Thief Arrest : कल्याण रेल्वे पोलिसांकडून वृद्ध दाम्पत्याचे दागिने चोरणाऱ्या आरोपीला बेड्या

Kalyan Thief Arrest : कल्याण रेल्वे पोलिसांकडून वृद्ध दाम्पत्याचे दागिने चोरणाऱ्या आरोपीला बेड्या
कल्याण रेल्वे पोलिसांकडून वृद्ध दाम्पत्याचे दागिने चोरणाऱ्या आरोपीला बेड्या
Image Credit source: TV9

डावरे दाम्पत्य नातेवाईकाच्या लग्नासाठी टिटवाळ्याहून नाशिकला निघालं होतं. टिटवाळ्याच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर सकाळी 6 वाजण्याच्या लोकलची वाट पाहत थांबलेल्या डावरे यांनी आपल्या बॅग कठड्यावर ठेवल्या होत्या. यावेळी चोरट्याने त्यांची दागिने असलेली पर्स चोरून पळ काढला होता. याप्रकरणी डावरे यांच्या तक्रारीवरून कल्याण रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला होता.

निनाद करमरकर

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

May 12, 2022 | 6:49 PM

कल्याण : टिटवाळा रेल्वे स्थानकात एका वृद्ध दाम्पत्याची दागिने (Jewellery) असलेली पर्स चोरल्याची घटना घडली होती. या चोरट्या (Thief)ला कल्याण रेल्वे गुन्हे शाखेनं 18 दिवसांनी बेड्या (Arrest) ठोकल्या असून त्याच्याकडून चोरीचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत. राजेश बबन घोडविंदे असं या चोरट्याचं नाव आहे. भगवत डावरे (74) आणि सत्यभामा डावरे (69) अशी या वृद्ध दाम्पत्याची नावे असून ते टिटवाळ्यात राहणारे आहेत. चोरी केल्यानंतर चोरट्याने तेथून पलायन केले. अनेक दिवस पोलिस या चोरट्याचा शोध घेत होते. अखेर पोलिसांनी वासिंदमधून चोरट्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

टिटवाळा स्थानकातून वृद्ध दाम्पत्याची बॅग चोरली

डावरे दाम्पत्य नातेवाईकाच्या लग्नासाठी टिटवाळ्याहून नाशिकला निघालं होतं. टिटवाळ्याच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर सकाळी 6 वाजण्याच्या लोकलची वाट पाहत थांबलेल्या डावरे यांनी आपल्या बॅग कठड्यावर ठेवल्या होत्या. यावेळी चोरट्याने त्यांची दागिने असलेली पर्स चोरून पळ काढला होता. याप्रकरणी डावरे यांच्या तक्रारीवरून कल्याण रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला होता. मात्र चोरटा सीसीटीव्हीत स्पष्टपणे दिसत नसल्यानं त्याला पकडण्याचं आव्हान पोलिसांसमोर होतं. अखेर गुप्त बातमीदाराच्या मदतीने सीसीटीव्हीत दिसणाऱ्या आरोपीचा माग काढत पोलिसांनी 18 दिवसांनी या चोरट्याला वासिंद रेल्वे स्थानकाजवळून ताब्यात घेतलं. राजेश बबन घोडविंदे असं या चोरट्याचं नाव असून त्यानं गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून 3 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

डोंबिवलीत सोनसाखळी चोराला अटक

डोंबिवलीत एका सोनसाखळी चोराला सोनसाखळी चोरून पळतानाच पोलिसांनी बेड्या ठोकल्या. बुधवारी रात्री डोंबिवली पश्चिमेच्या कोपर परिसरात हा प्रकार घडला. डोंबिवली पश्चिमेच्या कोपर परिसरात विनोद शर्मा हे बुधवारी रात्री 11 वाजता शतपावली करत होते. यावेळी एका चोरट्यानं त्यांच्या गळ्यातली सोनसाखळी चोरून पळ काढला. यावेळी विनोद शर्मा यांनी आरडाओरडा केला असता त्याच रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी आणि पोलीस व्हॅनमधील पोलिसांनी या चोरट्याला पकडलं.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें