AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दीड दिवसाच्या बाप्पानंतर माहेरवाशीण गौराईला आज निरोप, ठाणे पालिका प्रशासन सज्ज

सोनपावलांनी घरी आलेल्या गौराईची पाच दिवस पूजाअर्चा करण्यात आली. या पाच दिवसात महिलांनी फुगडी घालून फेर धरला. घागरी फुंकल्या आणि सूपही उडवले... (gauri immersion)

दीड दिवसाच्या बाप्पानंतर माहेरवाशीण गौराईला आज निरोप, ठाणे पालिका प्रशासन सज्ज
gauri immersion
| Edited By: | Updated on: Sep 14, 2021 | 2:08 PM
Share

ठाणे: सोनपावलांनी घरी आलेल्या गौराईची पाच दिवस पूजाअर्चा करण्यात आली. या पाच दिवसात महिलांनी फुगडी घालून फेर धरला. घागरी फुंकल्या आणि सूपही उडवले… सासू-सूनांनी गौराई समोर गाणी म्हणत मनमोकळंही केलं. पाच दिवस चालेल्या या पारंपारिक पूजाअर्चेनंतर आज माहेरवाशीण गौराईला निरोप देण्याची वेळ आली आहे. आज दुपारनंतर या माहेरवाशीण गौराईंना जड अंतकरणाने निरोप दिला जाणार आहे. त्यासाठी ठाणे महापालिकाही सज्ज झाली आहे. (Farewell to Ganpati and Gauri in Thane)

दीड दिवसाच्या बाप्पाच्या नंतर आज 5 दिवसाच्या गौरींसोबत गणपतीचे देखील विसर्जन होणार आहे. माहेरवाशीण गौरीची पूजाअर्चा केल्या नंतर आज त्यांचे देखील विसर्जन होणार आहे. त्यासाठी महानगरपालिकेने 7 घाट, 13 कृत्रिम तलाव आणि 20 स्वीकृत केंद्र सज्ज ठेवले आहेत. दुपारनंतर विसर्जन ठिकाणी भक्तगण येणार असल्यामुळे या ठिकाणी बॅरेकेटिंग करत जागोजागी सूचना फलक लावले आहेत. प्रत्येक ठिकाणी स्वच्छता देखील राखली जात आहे.

अँटिजेन टेस्ट बंधनकारक

विसर्जन ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून भाविकांना घरातूनच गौरी, गणपतीची आरती करून विसर्जनस्थळी यावे, अशा सूचना पालिकेने दिल्या आहेत. तसेच विसर्जनस्थळी केवळ मोजक्याच लोकांना प्रवेश दिला जाणार आहे. शिवाय ज्यांना प्रवेश दिला जाणार त्यांची अँटिजेन टेस्ट केली जाणार आहे. त्यासाठी नागरिकांनी तपासणी करण्यास सहकार्य करावे, असे आव्हान महापौर नरेश म्हस्के आणि पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी केले आहे. ठाण्यातील मासुंदा तलावाच्या ठिकाणी कृत्रिम तलाव तयार करण्यात आला असून या ठिकाणी गौरी विसर्जनासाठीची हळूहळू भाविक येताना दिसत आहेत.

कोणत्या तलावात किती गणेश मुर्तींचे विसर्जन

यावर्षी महापलिकेने निर्माण केलेल्या या पर्यायी व्यवस्थेचा लाभ उठवत शहरामधील हजारो भाविकांनी आपल्या दीड दिवसांच्या गणपतीचे कृत्रीम तलावामध्ये वाजत गाजत विधिवत विसर्जन केले. यावर्षी खारेगाव तलाव येथे 552 घरगुती गणेशमूर्ती, मासुंदा तलाव तसेच अहिल्यादेवी तलाव येथे मिळून 1025 घरगुती गणेशमूर्ती, आंबेघोसाळे तलाव येथे 400 घरगुती गणेशमूर्ती, रेवाळे तलाव येथे 612 घरगुती गणेशमूर्ती आणि 5 सार्वजनिक गणेशमूर्ती, मुल्लाबाग येथे 466 घरगुती गणेशमूर्ती, खिडकाळी तलाव येथे 86 घरगुती गणेशमूर्ती, शंकर मंदिर तलाव येथे 62 घरगुती गणेशमूर्ती, उपवन तलाव येथे 1338 घरगुती गणेशमूर्ती, तसेच गणेशमूर्तींचे स्वीकृती केंद्रावरील मूर्तींचे महापालिकेच्या पर्यावरणपूरक व्यवस्थेअंतर्गत विधीवत विसर्जन करण्यात आलेले आहे.

तर मीठबंदर घाट येथे 461 घरगुती गणेशमूर्ती, रायलादेवी तलाव घाट-1 येथे 340 घरगुती तर 6 सार्वजनिक गणेशमूर्तींचे, रायलादेवी तलाव घाट-2 येथे 917 घरगुती गणेशमूर्ती, कोलशेत घाट-1 व 2 येथे 679 घरगुती गणेशमूर्ती आणि 4 सार्वजनिक गणेशमूर्ती, दिवा विसर्जन घाट येथे 514 घरगुती गणेशमूर्ती, पारसिक घाट येथे 405 घरगुती गणेशमूर्ती, 5 सार्वजनिक गणेशमूर्ती, गायमुख घाट 1 व 2 मिळून 435 गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आलेले आहे. (Farewell to Ganpati and Gauri in Thane)

संबंधित बातम्या:

बाप्पा पावला! वसईत विसर्जन करताना साडेपाच तोळे सोन्याचे बाशिंग हरवले; 12 तासानंतर सापडले

कृत्रिम तलावांमधील ‘श्रीं’च्या विसर्जनाकडे भाविकांचा वाढता प्रतिसाद, ठाणे शहरात दीड दिवसांच्या 8979 गणेशमूर्तींचे विसर्जन

राबोडीतील इमारत दुर्घटनेचं खापर रहिवाश्यांवर; ठाणे महापालिका म्हणते, रहिवाश्यांकडून दुर्लक्ष

(Farewell to Ganpati and Gauri in Thane)

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक