बाप्पा पावला! वसईत विसर्जन करताना साडेपाच तोळे सोन्याचे बाशिंग हरवले; 12 तासानंतर सापडले

दीड दिवसाच्या बाप्पाचे विसर्जन करताना येथील पाटील कुटुंबीयांचे साडेपाच तोळ्याचे सोन्याचे बाशिंग हरवले. त्यामुळे पाटील कुटुंब प्रचंड चिंतेत होतं. मात्र, त्यांची ही चिंता अवघ्या काही दिवसातच दूर झाली. (ganpati bappa immersion)

बाप्पा पावला! वसईत विसर्जन करताना साडेपाच तोळे सोन्याचे बाशिंग हरवले; 12 तासानंतर सापडले
gold crown

वसई: दीड दिवसाच्या बाप्पाचे विसर्जन करताना येथील पाटील कुटुंबीयांचे साडेपाच तोळ्याचे सोन्याचे बाशिंग हरवले. त्यामुळे पाटील कुटुंब प्रचंड चिंतेत होतं. मात्र, त्यांची ही चिंता अवघ्या काही दिवसातच दूर झाली. अवघ्या 12 तासातच पाटील कुटुंबीयांना बाशिंग सापडले आणि त्यांचा जीव भांड्यात पडला. बाप्पाच्या कृपेनेच हरवलेले बाशिंग सापडल्याची प्रतिक्रिया पाटील कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. (Vasai patil family immerses Ganesh idol with Rs 3-lakh gold crown)

वसईतील पाटील कुटुंबीयांनी घरात गणपती बसवला. मात्र, घरात सुतक पडल्याने पाच दिवसाच्या बाप्पाचे घाईघाईत दीड दिवसात विसर्जन करण्यात आले. यावेळी बाप्पाचे विसर्जन करत असताना साडेपाच तोळ्याचे सोन्याचे बाशिंगही पाण्यात विसर्जित झाले. तीन लाख रुपये किंमतीचं बाशिंग हरवल्याचे पाटील कुटुंबीयांच्या नंतर लक्षात आले. त्यामुळे त्यांनी शोधाशोध सुरू केली. पण बाशिंग काही सापडले नाही. मात्र, अधिक शोध घेतला असता अखेर 12 तासानंतर बाशिंग सापडले. त्यामुळे पाटील कुटुंबीयांना हायसं वाटलं. पण 12 तासानंतर विसर्जित झालेले सोन्याचे बाशिंग परत मिळाल्याने बाप्पा पावल्याचेच समाधान पाटील कुटुंबियांना मिळाले आहे.

वसई-ठाण्यात बाप्पाला भावपूर्ण निरोप

दरम्यान, वसई आणि ठाण्यात दीड दिवसाच्या गणपतीला भावपूर्ण निरोप देण्यात आला. बाप्पाची पूजा अर्चा केल्यानंतर बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. ठाण्यात तर मोठ्या प्रमाणावर गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने शहरात दीड दिवस, पाच दिवस, आणि सार्वजनिक गणेश विसर्जनासाठी पर्यायी गणेश विसर्जन व्यवस्था केली आहे. या व्यवस्थेतंर्गत रायलादेवी येथे दोन, आंबेघोसाळे, उपवन पालायदेवी, निळकंठ वुड्स टिकुजीनी वाडी-बाळकुम रेवाळे, खारेगाव आदी ठिकाणी एकूण 11 कृत्रीम तलावांची व्यवस्था महापालिकेने उपलब्ध करुन दिली आहे.

तसेच पारसिक रेती बंदर अणि कोलशेत बंदर याबरोबरच मिटबंदर, कळवा, गायमुख येथे विसर्जन महाघाट निर्माण केले आहेत. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मासुंदा तलाव येथील दत्तघाट येथेही पर्यायी विसर्जन व्यवस्था करण्यात आली आहे. त्याशिवाय मासुंदा तलावाच्या अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यालगत असलेल्या घाटावर ही गणेशमूर्ती स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

कोणत्या तलावात किती गणेश मुर्तींचे विसर्जन

यावर्षी महापलिकेने निर्माण केलेल्या या पर्यायी व्यवस्थेचा लाभ उठवत शहरामधील हजारो भाविकांनी आपल्या दीड दिवसांच्या गणपतीचे कृत्रीम तलावामध्ये वाजत गाजत विधिवत विसर्जन केले. यावर्षी खारेगाव तलाव येथे 552 घरगुती गणेशमूर्ती, मासुंदा तलाव तसेच अहिल्यादेवी तलाव येथे मिळून 1025 घरगुती गणेशमूर्ती, आंबेघोसाळे तलाव येथे 400 घरगुती गणेशमूर्ती, रेवाळे तलाव येथे 612 घरगुती गणेशमूर्ती आणि 5 सार्वजनिक गणेशमूर्ती, मुल्लाबाग येथे 466 घरगुती गणेशमूर्ती, खिडकाळी तलाव येथे 86 घरगुती गणेशमूर्ती, शंकर मंदिर तलाव येथे 62 घरगुती गणेशमूर्ती, उपवन तलाव येथे 1338 घरगुती गणेशमूर्ती, तसेच गणेशमूर्तींचे स्वीकृती केंद्रावरील मूर्तींचे महापालिकेच्या पर्यावरणपूरक व्यवस्थेअंतर्गत विधीवत विसर्जन करण्यात आलेले आहे.

तर मीठबंदर घाट येथे 461 घरगुती गणेशमूर्ती, रायलादेवी तलाव घाट-1 येथे 340 घरगुती तर 6 सार्वजनिक गणेशमूर्तींचे, रायलादेवी तलाव घाट-2 येथे 917 घरगुती गणेशमूर्ती, कोलशेत घाट-1 व 2 येथे 679 घरगुती गणेशमूर्ती आणि 4 सार्वजनिक गणेशमूर्ती, दिवा विसर्जन घाट येथे 514 घरगुती गणेशमूर्ती, पारसिक घाट येथे 405 घरगुती गणेशमूर्ती, 5 सार्वजनिक गणेशमूर्ती, गायमुख घाट 1 व 2 मिळून 435 गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आलेले आहे. (Vasai patil family immerses Ganesh idol with Rs 3-lakh gold crown)

 

संबंधित बातम्या:

कृत्रिम तलावांमधील ‘श्रीं’च्या विसर्जनाकडे भाविकांचा वाढता प्रतिसाद, ठाणे शहरात दीड दिवसांच्या 8979 गणेशमूर्तींचे विसर्जन

राबोडीतील इमारत दुर्घटनेचं खापर रहिवाश्यांवर; ठाणे महापालिका म्हणते, रहिवाश्यांकडून दुर्लक्ष

गणपती बाप्पाचे विसर्जन करताना ठाणेकरांची ‘हरित शपथ’

(Vasai patil family immerses Ganesh idol with Rs 3-lakh gold crown)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI