कृत्रिम तलावांमधील ‘श्रीं’च्या विसर्जनाकडे भाविकांचा वाढता प्रतिसाद, ठाणे शहरात दीड दिवसांच्या 8979 गणेशमूर्तींचे विसर्जन

ठाणे महापालिका क्षेत्रातील दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन शनिवारी भक्तीमय वातावरणात पार पडले.  यावर्षी शहरातील दीड दिवसांच्या तब्बल 8 हजार 979 गणेशमूर्तींचे विसर्जन झाले.

कृत्रिम तलावांमधील 'श्रीं'च्या विसर्जनाकडे भाविकांचा वाढता प्रतिसाद, ठाणे शहरात दीड दिवसांच्या 8979 गणेशमूर्तींचे विसर्जन
कृत्रिम तलावांमधील 'श्रीं'च्या विसर्जनाकडे भाविकांचा वाढता प्रतिसाद

ठाणे :  ठाणे महापालिका क्षेत्रातील दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन शनिवारी भक्तीमय वातावरणात पार पडले.  यावर्षी शहरातील दीड दिवसांच्या तब्बल 8 हजार 979 गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. यापैकी पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाची संकल्पना राबवून राज्यात पर्यावरणभिमुख गणेशोत्सवाचा आदर्शपट घालून देणाऱ्या ठाणे महापालिकेच्या पर्यायी गणेश विसर्जन व्यवस्थेअंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम तलावांमध्ये गणेश विसर्जनाकडे भाविकांचा वाढता प्रतिसाद असल्याचे दिसून आले.

2952 नागरिकांचं ऑनलाईन टाईमस्लॉट बुकिंग

महापालिकेच्या गणेशमूर्ती स्वीकृत केंद्रामध्ये प्राप्त झालेल्या एकूण 21 गणेशमूर्तींचे तसेच 19 सार्वजिनक गणेशमूर्तींचे महापालिकेच्यावतीने विधीवत विसर्जन करण्यात आले. यामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जनाच्यावेळी गर्दी होवू नये यासाठी ठाणे महानगरपालिका क्षेत्रात गणेशमूर्ती विसर्जनासाठी डिजीठाणे प्रणाली मार्फत तयार करण्यात आलेल्या ऑनलाईन टाईमस्लॉट बुकिंग सुविधेंतर्गत 2952 नागरिकांनी बुकिंग करुन प्रत्यक्षस्थळी विसर्जन केले. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नागरिकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल महापौर नरेश गणपत आणि महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी सर्व गणेश भक्तांचे आभार व्यक्त केले आहेत.

महापालिकेकडून शहरात एकूण 11 कृत्रीम तलावांची व्यवस्था

ठाणे महानगरपालिकेच्या वतीने शहरात दीड दिवस, पाच दिवस, आणि सार्वजनिक गणेश विसर्जनासाठी पर्यायी गणेश विसर्जन व्यवस्था केली आहे. या व्यवस्थेतंर्गत रायलादेवी येथे दोन, आंबेघोसाळे, उपवन पालायदेवी, निळकंठ वुड्स टिकुजीनी वाडी-बाळकुम रेवाळे, खारेगाव आदी ठिकाणी एकूण 11 कृत्रीम तलावांची व्यवस्था महापालिकेने उपलब्ध करुन दिली आहे.

तसेच पारसिक रेती बंदर अणि कोलशेत बंदर याबरोबरच मिटबंदर, कळवा, गायमुख येथे विसर्जन महाघाट निर्माण केले आहेत. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मासुंदा तलाव येथील दत्तघाट येथेही पर्यायी विसर्जन व्यवस्था करण्यात आली आहे. त्याशिवाय मासुंदा तलावाच्या अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यालगत असलेल्या घाटावर ही गणेशमूर्ती स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

कोणत्या तलावात किती गणेश मुर्तींचे विसर्जन

यावर्षी महापलिकेने निर्माण केलेल्या या पर्यायी व्यवस्थेचा लाभ उठवित शहरामधील हजारो भाविकांनी आपल्या दीड दिवसांच्या गणपतीचे कृत्रीम तलावामध्ये वाजत गाजत विधिवत विसर्जन केले. यावर्षी खारेगाव तलाव येथे 552 घरगुती गणेशमूर्ती, मासुंदा तलाव तसेच अहिल्यादेवी तलाव येथे मिळून 1025 घरगुती गणेशमूर्ती, आंबेघोसाळे तलाव येथे 400 घरगुती गणेशमूर्ती, रेवाळे तलाव येथे 612 घरगुती गणेशमूर्ती आणि 5 सार्वजनिक गणेशमूर्ती, मुल्लाबाग येथे 466 घरगुती गणेशमूर्ती, खिडकाळी तलाव येथे 86 घरगुती गणेशमूर्ती, शंकर मंदिर तलाव येथे 62 घरगुती गणेशमूर्ती, उपवन तलाव येथे 1338 घरगुती गणेशमूर्ती, तसेच गणेशमूर्तींचे स्वीकृती केंद्रावरील मूर्तींचे महापालिकेच्या पर्यावरणपूरक व्यवस्थेअंतर्गत विधीवत विसर्जन करण्यात आले.

तर मीठबंदर घाट येथे 461 घरगुती गणेशमूर्ती, रायलादेवी तलाव घाट-1 येथे 340 घरगुती तर 6 सार्वजनिक गणेशमूर्तींचे, रायलादेवी तलाव घाट-2 येथे 917 घरगुती गणेशमूर्ती, कोलशेत घाट-1 व 2 येथे 679 घरगुती गणेशमूर्ती आणि 4 सार्वजनिक गणेशमूर्ती, दिवा विसर्जन घाट येथे 514 घरगुती गणेशमूर्ती, पारसिक घाट येथे 405 घरगुती गणेशमूर्ती, 5  सार्वजनिक गणेशमूर्ती, गायमुख घाट 1 व 2 मिळून 435 गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

हेही वाचा : गणपती बाप्पाचे विसर्जन करताना ठाणेकरांची ‘हरित शपथ’

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI