Local Train Incident : धक्कादायक, बोरिवली-डहाणू ट्रेनमध्ये तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न

Local Train Incident : लोकलमधील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बोरिवली-डहाणू मेमू ट्रेनमध्ये एका तरुणीसोबत नको ते कृत्य घडलं. गैरफायदा घेत एका अज्ञात व्यक्तीने हा प्रकार केला.

Local Train Incident :  धक्कादायक, बोरिवली-डहाणू ट्रेनमध्ये तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न
Train
| Updated on: Sep 04, 2026 | 8:27 AM

अलीकडे मुंबईत लोकल ट्रेनच्या प्रवासात प्रवाशांमध्ये आपसात हिंसाचार झाल्याच्या काही घटना घडल्या आहेत. यात हाणामारी, हल्ले, हत्या असे गंभीर गुन्हे आहेत. महिलांच्या डब्ब्यात होणाऱ्या हाणामारीचे व्हिडिओ तर सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता असाच एक गंभीर गुन्हा बोरिवली-डहाणू मेमू ट्रेनमध्ये घडला आहे. एका 20 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीवर प्राणघातक हल्ला करून तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. डहाणू रेल्वे स्थानकादरम्यान बुधवारी सकाळी ट्रेनमध्ये हा प्रकार घडला. महिला डब्ब्यातून ती तरुणी एकटीच प्रवास करत होती. त्याचा गैरफायदा घेत एका अज्ञात व्यक्तीने हा प्रकार केला.

मात्र, तरुणीने अत्यंत धाडसाने आणि प्रसंगावधान राखून परिस्थितीचा सामना केला. तिने आरोपीचा प्रतिकार केल्याने पुढील मोठा अनर्थ टळला. बुधवारी सकाळी सुमारे 5:17 च्या सुमारास बोरिवली-डहाणू मेमू ट्रेन डहाणूच्या दिशेने जात होती. या गाडीच्या महिला डब्यात संबंधित तरुणी एकटीच प्रवास करत होती. तरुणी एकटी असल्याचे पाहून एका व्यक्तीने अचानक तिचा गळा दाबून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वेगाने सुरू आहे. आरोपीची ओळख पटली आहे, असे लोहमार्ग पोलिस ठाण्याचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी सांगितले.

तिचा गळा दाबला

आरोपी महिला डब्ब्यात शिरला. त्यावेळी तरुणी एकटी होती. ट्रेन कुठे पोहोचलीय अशी आधी त्याने विचारणा केली. नंतर अचानक त्याने तरुणीवर हल्ला करुन तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. आरोपीने तिचा गळा दाबला. पण तरुणीने त्याचा प्रतिकार केला. तिने आरोपीच्या डोळ्यात बोटं टाकून त्याला मागे ढकलून दिलं. तरुणीचा आवाज आणि मदतीसाठी तिने आरडाओरडा केल्याने बाजूच्या डब्ब्यातील प्रवासी लगेच तिच्या मदतीसाठी पोहोचले. सहप्रवाशांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला. पण या झटपटीत आरोपीने तिथून पळ काढला. पण त्याची ओळख पटली आहे. या घटनेमुळे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दिवसाढवळ्या लोकलमध्ये एका तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न होणं ही खूप गंभीर बाब आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us