
कल्याणमध्ये वालधुनी नदी किनारी असलेल्या अशोक नगरमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. नदीच पाणी लोकांच्या घरांमध्ये शिरलं आहे. नागरिकांच मोठ नुकसान झालं आहे. भितीदायक ही दृश्य आहेत. या भागातील तरुण मुल मात्र पाण्यात पोहोचण्याचा आनंद घेत आहेत.

कल्याण शहाड येथील अंबिका नगर सोसायटीत कमरे इतकं पाणी साचलय. तळ मजल्यावर लोकांच्या घरात पाणी गेलं आहे. वालधुनी नदीची पाणी पातळी वाढल्याने नागरिकांच्या घरात पाणी गेलय. त्यामुळे नागरिकांच मोठं नुकसान झालं आहे.

उल्हास नदीची पाणी पातळी वाढली आहे. बदलापूरहून-कर्जतकडे जाणारा राज्य महामार्ग बंद झाला आहे. अंबरनाथ, बदलापूर परिसरात मुसळधार पाऊस होत आहे. हा महामार्ग पाण्याखाली गेला आहे. गुडघाभर पाणी इथे आहे.

बदलापूर-मुरबाडला जोडणारा रायते पुल पाण्याखाली गेला आहे. या पुलावरुन वाहतूक बंद झाली आहे. उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने हा पूल पाण्याखाली गेला आहे.

अंबरनाथमध्ये वालधुनी नदीचा प्रवाह वाढला आहे. पुलावरुन पाणी वाहू लागल्याने अंबरनाथच्या प्राचीन शिव मंदिराकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. अंबरनाथमधील शिवमंदिर पाण्याखाली गेलं आहे.