AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kalyan Crime : गोणीत लपवला मृतदेह, व्हॉईस मेसेजमधून हत्येची कबुली; प्रियकराला संपवून ती फरार, कल्याण हादरलं !

कल्याण पूर्वेत लिव्ह-इन रिलेशनशिपमधील प्रियकराची धक्कादायक हत्या समोर आली आहे. महिलेने प्रियकराचा खून करून मृतदेह बाथरुममध्ये गोणीत लपवला. नळ सुरू ठेवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. घरमालकाला व्हॉईस मेसेजद्वारे खुनाची कबुली दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. आरोपी महिला कोलकात्याला पळून गेल्याची माहिती असून पोलीस तिचा शोध घेत आहेत.

Kalyan Crime : गोणीत लपवला मृतदेह, व्हॉईस मेसेजमधून हत्येची कबुली; प्रियकराला संपवून ती फरार, कल्याण हादरलं !
कल्याण क्राईम
| Updated on: Jul 20, 2026 | 3:31 PM
Share

कल्याण पूर्वेतील मलंग रोड परिसरातील नीलकंठ सोसायटीमध्ये घडलेल्या एका धक्कादायक हत्याकांडाने परिसरात खळबळ उडाली आहे. लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेने आपल्या प्रियकराची धारदार शस्त्राने हत्या केल्याचा आरोप असून, त्यानंतर मृतदेह गोणीत बांधून बाथरूममध्ये लपवून ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने बाथरूमचा नळ तब्बल 24 तास सुरू ठेवण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाला आणखी नाट्यमय वळण तेव्हा मिळालं, जेव्हा घरमालकाला आरोपी महिलेने व्हॉईस मेसेज पाठवून प्रियकराचा खून केल्याची कबुली दिली.

एवढंच नव्हे, तर बाथरूममध्ये ठेवलेल्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा मेसेजही तिने घरमालकाला केल्याचे सांगितले जात आहे. यामुळे प्रचंड खळबळ माजली. मानपाडा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत आरोपी महिलेच्या शोधासाठी विशेष पथके रवाना केली आहेत.

काय आहे प्रकरण ?

कल्याणच्या मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मलंग रोड परिसरातील नीलकंठ सोसायटीमध्ये घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. घर मालकाच्या माहितीनुसार, गेल्या अडीच महिन्या पासून फ्लॅट क्रमांक 104 मधून पाणी बाहेर पॅसेजमध्ये वाहत असल्याची तक्रार इमारतीतील रहिवाशांनी घरमालक अजय पाटील यांच्याकडे केली होती. यानंतर त्यांनी भाडेकरूंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रतिसाद मिळत नसल्याने संशय अधिक बळावला.दरम्यान, घरमालकाला आरोपी महिलेचा एक व्हॉईस मेसेज प्राप्त मिळाला. या मेसेजमध्ये प्रियकराचा खून केल्याचे सांगत मृतदेह बाथरूममध्ये असल्याची माहिती देण्यात आल्याचा दावा करण्यात आला.

मेसेज मिळताच फुटला घाम

हा मेसेज मिळताच घरमालकाच्या पायाखालची जमीनच सरकली. तो हादरलाच. मात्र त्याने कशीबशी हिंमत गोळा करत तातडीने मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत, पोलिसांना माहिती दिली.घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी फ्लॅटची पाहणी केली असता बाथरूममध्ये गोणीत बांधलेला मृतदेह आढळून आला. प्राथमिक तपासात मृताच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याचे समोर आले आहे. तसेच रक्ताचे डाग आणि इतर पुरावे नष्ट करण्यासाठी बाथरूमचा नळ सुरू ठेवण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. तपासादरम्यान आरोपी महिला कोलकात्याकडे फरार झाल्याची माहिती समोर आली असून, तिचा शोध घेण्यासाठी तीन विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्रेमसंबंधातील वाद, वैयक्तिक मतभेद किंवा अन्य कोणते कारण या गुन्ह्यामागे आहे का, याचा मानपाडा पोलीस विविध अंगांनी तपास करत आहेत. या थरारक घटनेमुळे कल्याण परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...