कोरोना काळात आर्थिक विवंचना, त्याने मालकिनीचा विश्वासघात करत डिजेचं साहित्य विकलं, पोलिसांकडून अटक

| Updated on: May 27, 2021 | 4:35 PM

लॉकडाऊनच्या काळात डेकोरेटर्सकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने चक्क चोरीचा मार्ग अवलंबला. त्यामुळे त्याला तुरुंगात जावं लागले (Kalyan Police arrested Man who theft DJ material of decorators).

कोरोना काळात आर्थिक विवंचना, त्याने मालकिनीचा विश्वासघात करत डिजेचं साहित्य विकलं, पोलिसांकडून अटक
कोरोना काळात आर्थिक विवंचना, त्याने मालकिनीचा विश्वासघात करत डिजेचं साहित्य विकलं, पोलिसांकडून अटक
Follow us on

कल्याण (ठाणे) : लॉकडाऊनमध्ये सर्व कामधंदे बंद झाले. पैसे आणायचे कुठून म्हणून डेकोरेटर्सकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने मालकाच्या डिजेचे सर्व सामान विकून टाकले. अखेर संदीप लोखंडे नावाच्या या तरुणाला कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी अटक केली आहे. आता त्याने नेमकं कुणाला साहित्य विकलं, याचा तपास पोलीस करत आहेत (Kalyan Police arrested Man who theft DJ material of decorators).

नेमकं प्रकरण काय?

करोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनच्या काळात अनेकांनी नोकऱ्या गमावल्या. मात्र, या कठीण काळात न डगमगता अनेक जण मिळेल ते काम करून कुटुंबाचा आर्थिक भार उचलत आहेत. दुसरीकडे काहींनी गैरमार्गाचा अवलंब केल्याचं धक्कादायक वास्तव समोर येत आहे. लॉकडाऊनच्या काळात डेकोरेटर्सकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने चक्क चोरीचा मार्ग अवलंबला. त्यामुळे त्याला तुरुंगात जावं लागले (Kalyan Police arrested Man who theft DJ material of decorators).

गोदामाची चावी आरोपीकडे असल्याने त्याने संधी साधली

कल्याण पश्चिम परिसरात राहणारे रश्मी प्रधान हे डेकोरेट आहेत. त्याच्या बरोबर संदीप लोखंडे हा त्यांची व्यावसायाची सर्व कामे संभाळत असे. मात्र गेल्या वर्षभरात कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे कामबंद असल्याने मालक रश्मी या घराबाहेर येऊ शकत नव्हत्या. तसेच सामानाची देखरेख संदीप करत असल्याने समानाच्या गोदामाची चावी संदीपकडे होती.

मालक पोलिसात गेल्यानंतर आरोपीला अटक

संदीपने याचाच फायदा घेत लॉकडाऊनमध्ये आर्थिक परिस्थिती खराब असल्याने गोदामामध्ये ठेवलेले दीड लाखाचे साहित्य विकले. मालक रश्मी हिला जेव्हा सामान विकल्याची माहिती मिळाली, तिने कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तक्रार घेत आरोपी संदीप लोखंडे याला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. पोलीस अधिकारी प्रकाश पाटील सध्या याप्रकरणी तपास करत आहेत.

हेही वाचा : आई-बाप की हैवान? कर्जबाजारी झाले म्हणून चिमुकल्याला विकण्याची तयारी, बाळाला विकत घेणारी महिला एजंट जेरबंद