
कालच मुंबईसह 29 महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यात मुंबईसह शेजारच्या ठाण्यातील आणि कल्याण-डोंबिवलीमधील निवडणूक प्रतिष्ठेची होती. यात मुंबईत काही प्रमाणात ठाकरेंना आपला गड राखण्यात यश आलं. पण ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीत एकनाथ शिंदे यांनी आपला बालेकिल्ला अभेद्य ठेवला. कल्याण-डोंबिवलीत एकूण 122 नगरसेवक बसतात. इथे 21 नगरसेवक आधीच बिनविरोध निवडून आलेत. यात 15 भाजपचे आणि सहा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे होते. काल निकाल जाहीर झाला. त्यात केडीएमसीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे 54 तर भाजपचे 50 नगरसेवक निवडून आले. केडीएमसीमध्ये युती नव्हती. दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढले.
आता कालच निकाल लागला. त्यानंतर KDMC मध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. उद्धव ठाकरे शिवसेनेच नवनिर्वाचीत नगरसेवक मधुर म्हात्रे थेट आज खासदार श्रीकांत शिंदे यांच्या भेटीला पोहोचले. KDMC निवडणुकीतील विजयी उबाठाचे नगरसेवक मधुर म्हात्रे यांची खासदार श्रीकांत शिंदेंसोबत भेट झाली. भेटीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. मधुर म्हात्रे यांनी भाजपचे माजी उपमहापौर विक्की तरे यांचा पराभव करत विजय मिळवला. फोटो व्हायरल होताच संभाव्य राजकीय हालचालींवर तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
Maharashtra Election Results 2026 : अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात चर्चा...
Maharashtra Municipal Election Results 2026 : नितेश राणे यांनी पुन्हा ठाकरे बंधुंना डिवचलंय..
प्रखर विरोधक म्हणून काम करणार - अंकित सुनील प्रभू
Mumbai Election Result 2026 : लोकांनी डोळे उघडले पाहिजेत - शर्मिला ठाकरे
पिंपरी चिंचवडमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष, आकडे बहुतमापेक्षाही अधिक
सोलापूरच्या निवडणुकीत पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर करून भाजपचा विजय : अमोल बापू शिंदे यांची टीका
आदित्य ठाकरेंनी फोन केलेला
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत विजय झालेल्या उमेदवारांना आदित्य ठाकरे यांनी फोन करून शुभेच्छा दिल्या. कल्याण पश्चिमेतील पॅनल क्रमांक 6 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं संपूर्ण पॅनल विजयी झालं. या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील माजी महापौर वैजयंती ताई घोलप आणि तीन वेळा नगरसेवक असलेले संजय पाटील अशा दिग्गज नगरसेवकांविरोधात लढून यश मिळवलं. ठाकरे गटाच्या विजयी उमेदवारांना आदित्य ठाकरे यांनी व्हिडिओ कॉल करत शुभेच्छा दिल्या. या पॅनल मधून ठाकरे गटाचे निवडून आलेल्या संकेश भोईर यांचे आदित्य ठाकरेंनी खास शब्दांत अभिनंदन केले. पॅनल 6 मधील विजयामुळे कल्याण पश्चिमेत ठाकरे गटाचे बळ अधिक मजबूत झाले आहे.
शिंदे गट व भाजपकडून जोरदार बॅनरबाजी
कल्याण–डोंबिवलीत महायुतीला शंभरपेक्षा अधिक जागांवर विजय. निकालानंतर शिवसेना शिंदे गट व भाजपकडून जोरदार बॅनरबाजी. शिंदे गटाच्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, एकनाथ व श्रीकांत शिंदेंचे फोटो. “दिघे साहेबांचा ठाणे जिल्हा – शिवसेनेचा बालेकिल्ला” असा मजकूर ठळकपणे लिहिला आहे. तर दुसरीकडे भाजपकडून प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांचे मोठे बॅनर लावण्यात आले आहेत.