kalwa landslide: कळव्यात घरांवर दरड कोसळली, सहा घरे जमीनदोस्त; 25 कुटुंबाना सुरक्षितस्थळी हलवले

| Updated on: Aug 08, 2021 | 10:49 AM

कळवा पूर्व येथील इंदिरानगरातील माँ काली चाळीवर काल रात्री दरड कोसळली. (Landslide damages 6 houses in Maharashtra's Kalwa East)

kalwa landslide: कळव्यात घरांवर दरड कोसळली, सहा घरे जमीनदोस्त; 25 कुटुंबाना सुरक्षितस्थळी हलवले
सांकेतिक फोटो
Follow us on

ठाणे: कळवा पूर्व येथील इंदिरानगरातील माँ काली चाळीवर काल रात्री दरड कोसळली. त्यात सहा घरांचे नुकसान झालं आहे. तर 25 घरातील कुटुंबांचं तातडीने स्थलांतर करण्यात आलं आहे. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. (Landslide damages 6 houses in Maharashtra’s Kalwa East)

कळवा पूर्व भागातील इंदिरानगरमधील माँ काली चाळ येथील घरांवर दरड कोसळून सहा घरांचे नुकसान झाले आहे. काल रात्रीच्या वेळी ही घटना घडली. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी 20 ते 25 जणांना गोलाई नगर येथील ठाणे महापालिका शाळेत हलविले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. या घटनेनंतर मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. मातीचा ढिगारा उपसण्यात येत आहे. डोंगराळ भागात ही वस्ती असल्याने या परिसरात आणखी दरड कोसळण्याची शक्यता तर नाही ना? याचीही तपासणी करण्यात येत आहे. याच परिसराच्या काही अंतरावर घोलाईनगर भागात दरड कोसळून 5 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला होता. त्यानंतर पालिकेने ठाण्यातील डोंगरपट्यांमधील भागात नोटिसा देखील बजावल्या होत्या.

पुनर्वसन करण्याची मागणी

भूमाफियांमुळे अशी घरे डोंगर भागात उभारण्याचे काम होत आहे. त्यांच्यावर पहिली कारवाई करावी, अशी मागणी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. त्याच बरोबर पालकमंत्री एकनाथ शिंदेंसह विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी देखील या भागात पाहणी केली होती. तर दुसरीकडे राज्य सरकारने डोंगराळ भागात राहणाऱ्या नागरिकांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी या भागातील नागरिक करत आहेत. एखाद्याचा जीव गेल्यावरच सरकारला जाग येणार आहे का?, असा संतप्त सवालही या नागरिकांनी केला आहे.

दुर्घटना सुरूच

या आधी महाड तालुक्यातील तळीये आणि चेंबूरच्या लाल डोंगर परिसरात दरड कोसळून मोठी दुर्घटना झाली होती. पावसाळ्यात डोंगराची जमीन खचून दरड कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे नागरिकांना सावध राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. तसेच दरड प्रवण क्षेत्राची पाहणीही शासनाकडून केली जात आहे. (Landslide damages 6 houses in Maharashtra’s Kalwa East)

 

संबंधित बातम्या:

रायगड आणि साताऱ्यात भीषण दुर्घटना, दरडी कोसळून 50 पेक्षा अधिक मृत्यू

Raigad Taliye Landslide: रायगडमध्ये दरडीखाली 80-85 लोक दबल्याची भीती, 19 तासानंतरही मदत नाही, मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; दरेकर संतापले

VIDEO : Raigad Taliye Landslide | महाडमध्ये तळीये गावात 35 घरांवर दरड कोसळली, 32 जणांचा मृत्यू

(Landslide damages 6 houses in Maharashtra’s Kalwa East)