भाजप सरकारने मंजूर केलेल्या कामांचं ठाकरे सरकारकडून उद्घाटन, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटलांचा निशाणा

| Updated on: Sep 05, 2021 | 12:43 AM

हाविकास आघाडी  सरकारच्या काळात कल्याण शहारासाठी कोणताही निधी मंजूर झाला नाही. भाजप सरकारच्या काळात झालेल्या कामांचे उद्घाटन सुरु आहे. ही नागरिकांची फसवणूक आहे, अशी घणाघाती टीका केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी राज्य सरकारवर केली आहे.

भाजप सरकारने मंजूर केलेल्या कामांचं ठाकरे सरकारकडून उद्घाटन, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटलांचा निशाणा
भाजप सरकारने मंजूर केलेल्या कामांचं ठाकरे सरकारकडून उद्घाटन, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटलांचा निशाणा
Follow us on

कल्याण (ठाणे) : महाविकास आघाडी  सरकारच्या काळात कल्याण शहारासाठी कोणताही निधी मंजूर झाला नाही. भाजप सरकारच्या काळात झालेल्या कामांचे उद्घाटन सुरु आहे. ही नागरिकांची फसवणूक आहे, अशी घणाघाती टीका केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी राज्य सरकारवर केली आहे. माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या निधीतून तयार करण्यात आलेल्या उद्यानाच्या लोकार्पण कार्यक्रमात कपिल पाटील कल्याणमध्ये आले होते.

कल्याण पश्चिमेकडील गांधारी परिसरात माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या आमदार निधीतून तयार करण्यात आलेल्या एका उद्यानाचे लोकार्पण केंद्रीय राज्यमंत्री कपिल यांच्या हस्ते झाले. यावेळी पत्रकारांशी बोलताना मंत्री कपिल यांनी काही मुद्द्यांवर आपली प्रतिक्रिया दिली .

मंदा म्हात्रेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया

भाजप नेत्या मंदा म्हात्रे यांनी आपल्या पक्षात महिलांना योग्य सन्मान मिळत नसल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या या वक्तव्यावर कपिल पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. मंदा म्हात्रे यांची काय समस्या आहे हे मी सांगू शकत नाही मात्र मोदी सरकारने 11 महिलांना मंत्रिपद दिले आहे. याआधी इतक्या प्रमाणात महिला कधी केंद्रीय मंत्री मंडळात नव्हत्या. एवढ्या मोठ्या प्रमाणात महिलांचा सन्मान मोदींनी केला म्हणेज भाजपनेच केला, असं कपिल पाटील म्हणाले.

‘सरकारकडून नागरिकांची फसवणूक’

या सरकारकडून कल्याण पश्चिम विधानसभेसाठी कोणताही निधी मंजूर झालेला नाही. भिवंडी ते कल्याण मेट्रोचा टेंडर सुद्धा काढण्यात आला नाही. भाजप सरकारच्या काळातील सर्व कामांचं आता उद्घाटनं होत आहेत. सरकारकडून ही नागरिकांची फसवणूक आहे, अशी टीका कपिल पाटील यांनी केली.

शिवसेना पदाधिकाऱ्याच्या वादग्रस्त पोस्टवर कपिल पाटील यांचा पलटवार

महागाईवर शिवसेनेचे कल्याण महानगरप्रमुख विजय साळवी यांनी एक वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर केली आहे. यामध्ये त्यांनी अपशब्दांचा वापर केला आहे. “ज्यांना लोकसभेत निवडून दिले त्यांना 2024 मध्ये त्यांची जागा दाखवून द्या, अशा आशयाची पोस्ट त्यांनी केली आहे. यावर बोलताना मंत्री पाटील यांनी जो ज्या संस्कृतीतून येतो त्याची भाषा तशीच असते. ही पोस्ट खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह सर्वच खासदारांना लागू होते. आम्हाला बोलायचं आहे तर थेट बोलावं”, असा पलटवार त्यांनी केला.

मंदाताई काय म्हणाल्या होत्या?

एका कार्यक्रमात आमदार मंदाताई म्हात्रे यांनी मनातील खदखद व्यक्त केली होती. विशेष म्हणजे महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्यासमोरच त्यांनी मनातील सल बोलून दाखवली. राजकारणात स्वपक्षीय नेत्यांकडूनच महिलांना डावलल जातं. दोनदा निवडून येऊनही मला आजही संघर्ष करावं लागतोय. आजही महिलांना राजकारणात काम करताना संघर्ष करावा लागतो. एखादी स्त्री चांगलं काम करायला लागली की पुरुष नेते पंख छाटायला सुरुवात करतात. आज ही महिलांची कामे झाकून टाकण्याचं काम केलं जातं. मला तिकीट दिलं किंवा नाही दिलं तरी मी लढणार, असा निर्धार त्यांनी यावेळी बोलून दाखवला.

आपल्याच पक्षातील माणसं, जर एखादी स्त्री चांगलं काम करायला लागली, तर मग त्याला भीती निर्माण होते, मग भीती निर्माण झाल्यावर फोटो टाकायचं नाही, कार्यक्रमाला बोलवायचं नाही, अशी जेव्हा भीती निर्माण होते, तेव्हा समजायचं आपलं कार्य चांगलं आहे. लक्षात घ्या महिलांनो. ज्यावेळी तुमचा फोटो टाकायचा असेल तेव्हा त्यांच्या मनात भीती निर्माण झाली तर समजायचं तुमच्या कार्याने धडकी निर्माण झाली आहे. काम करताना, कुठलीही भीती बाळगायची नाही, फळाची अपेक्षा बाळगायची नाही, आपण आपलं काम करत राहायचं, असं मंदा म्हात्रे म्हणाल्या.

हेही वाचा :

फायर ब्रँड नेत्या मंदा म्हात्रे म्हणाल्या, भाजपात सन्मान मिळत नाही, चंद्रकांतदादा म्हणाले, संवाद साधू

पुढच्या वर्षीपासून मध्य रेल्वेवरील प्रवास होणार अधिक सुस्साट; पाचव्या आणि सहाव्या लेनचे काम अंतिम टप्प्यात