Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी कल्याण-डोंबिवलीत राज ठाकरेंना दिला मोठा झटका, CM च्या नाराजीवर काय म्हणाले?

Eknath Shinde : "विधानसभेत मिळाले तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये यश मिळेल. कोण पडले कोण आले यापेक्षा विकास महत्वाचा आहे. यापूर्वी देखील आपण अनेक प्रवेश पाहिले आहेत. कार्यकर्त्यांच्या मागे खंबीर उभा राहण्याचे काम नेत्याचे आहे ते काम आम्ही करत आहोत" असं एकनाथ शिंदे म्हणाले

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी कल्याण-डोंबिवलीत राज ठाकरेंना दिला मोठा झटका, CM च्या नाराजीवर काय म्हणाले?
Raj Thackeray-Eknath shinde
| Updated on: Aug 25, 2025 | 12:59 PM

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा झटका दिला आहे. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात मनसेला मोठ खिंडार पडलं आहे. ठाणे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील माजी नगरसेवकांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश होणार आहे. मनसेच्या दोन माजी नगरसेवकांचा शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश होणार आहे. कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रातील शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यांची नावे खालील प्रमाणे आहेत.

राजन मराठे माजी नगरसेविका (म.न.से कल्याण डोंबिवली), ज्योति राजन मराठे माजी नगरसेविका (म.न.से कल्याण डोंबिवली), किशोर कोशिमकर मनसे उप शहर अध्यक्ष, सुरज मराठे मनसे विद्यार्थिसेना, रविंद्र बोबडे मनसे विभाग सचिव, संजय तावडे मनसे उपविभाग, केतन खानविलकर मनसे शाखा अध्यक्ष. सुधीर थोरात एकता मित्र मंडळ मा. अध्यक्ष. सोबत शेकडो पधादिकारी व कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील बाबजी पाटील (माजी नगरसेवक राष्ट्रवादी शरद पवार गट) तसेच ठाणे जिल्हा कॉ. ओ बँक मा. चेअरमन हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

“कल्याण आणि ठाणे दोन्ही महापालिकेत गेली अनेक वर्ष विकासाची कामे झाली. माझ्या अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री कारकिर्दीत महाराष्ट्रात आम्ही टीम म्हणून काम केलं. त्याची पोचपावती विधानसभा निवडणुकीत मिळाली आहे. शेकडो पदाधिकारी यांचे मी मनापासून स्वागत करतो. ज्या ज्या माध्यमातून त्यांना संधी मिळेल, अशा माध्यमातून समाज कार्याचे काम बाबाजी पाटील यांनी केली आहे. कुठल्याही पक्षात ते होते तरीही आमचे जिव्हाळ्याचे नाते सर्वश्रुत आहेत” असं एकनाथ शिंदे म्हणाले.

‘नगरसेवकांना विकास पाहिजे’

“आम्ही कधीही विकासात राजकारण केलेलं नाही. आमचा अजेंडा महाराष्ट्राचा ठाणे आणि MMR चा विकास हा आहे. मुंबई MMR हा महत्वाचा भाग आहे. नगरसेवकांना विकास पाहिजे. या पुढे देखील स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये या विकास कामांचा फायदा होईल” असं एकनाथ शिंदे म्हणाले.

नगरविकास विभागावर मुख्यमंत्र्यांच्या नाराजीवर काय म्हणाले?

“नगर विकास खातं इतरही खाती आहेत महाराष्ट्रात नंबर एकला आहे महाराष्ट्रामध्ये उद्योग येत आहेत, इन्वेस्टमेंट येत आहे. जीडीपी एक नंबर वर आहे. महाराष्ट्र स्टार्टअपमध्ये नंबर एकला आहे. अडीच वर्षाची कारकीर्द आपण पाहिलेली आहे. आता देवेंद्रजींची दुसरी इनिंग सुरू आहे. विकासाच्या मुद्द्याला आम्ही पुढे घेऊन चाललो आहोत. महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी आमची टीम काम करत आहे” असं एकनाथ शिंदे म्हणाले.