Mumbai Bullet Train: महासभेत मोठा निर्णय, शिवसेनेने बुलेट ट्रेनविरोधात आणखी एक हत्यार उपसलं

| Updated on: Dec 23, 2020 | 8:15 PM

ठाणे महानगरपालिकेत बुलेट ट्रेनविरोधात ठराव मंजूर करण्यात आला. |Bullet train project

Mumbai Bullet Train: महासभेत मोठा निर्णय, शिवसेनेने बुलेट ट्रेनविरोधात आणखी एक हत्यार उपसलं
मेट्रो कारशेड विरुद्ध बुलेट ट्रेन, सामना रंगणार?
Follow us on

ठाणे: मेट्रोच्या कांजूरमार्ग येथील कारशेडच्या जागेवरून केंद्र सरकार आणि ठाकरे सरकार यांच्यात वाद सुरू झाल्यानंतर राज्य सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन (Bullet Train) प्रकल्पाला चाप लावण्याचे संकेत दिले होते. याचे प्रत्यंतर आता ठाण्यात येताना दिसत आहे. (Oppose for Bullet train project in Thane)

शिवसेनेने ठाण्यातून जाणाऱ्या बुलेट ट्रेनच्या मार्गाला विरोध केला आहे. ठाणे महानगरपालिकेत बुलेट ट्रेनविरोधात ठराव मंजूर करण्यात आला. ठाणे महानगरपालिकेच्या बुधवारी झालेल्या ऑनलाईन सभेत शीळ- डायघर व इतर गावातून जाणाऱ्या बुलेट ट्रेनच्या जागेचा प्रस्ताव सर्वपक्षीयांनी नामंजूर केल्याची माहिती महापौर नरेश म्हस्के यांनी दिली.

शिवसेनेच्या भूमिकेवर भाजपची टीका

बुलेट ट्रेनच्या प्रस्तावाला विरोध करण्याच्या मुद्द्यावरून भाजपचे गटनेते संजय वाघुले यांनी शिवसेनेवर टीका केली. शिवसेनेची भूमिका दुटप्पी आहे. एकीकडे सेना केंद्रातून इतर प्रकल्पांसाठी कटोऱ्यातून पैसे  मागते आणि दुसरीकडे बुलेट ट्रेनसाठी विरोध दर्शवते. या बुलेट ट्रेनसाठी आमचा पाठिंबा असल्याचे संजय वाघुले यांनी स्पष्ट केले.

बुलेट ट्रेनला आक्षेप का?

अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. मात्र या प्रकल्पाला महाराष्ट्राची जमीन जास्त आणि केवळ चारच स्टेशन महाराष्ट्रात अशी परिस्थिती असल्याचा आरोप आहे. मुंबई, ठाणे, विरार आणि बोईसर ही चार स्टेशन महाराष्ट्रात तर उर्वरीत 8 स्थानकं गुजरातमध्ये प्रस्तावित आहेत. यामध्ये वापी, बिलीमोरा, सुरत, भरुच, वडोदरा, आनंद, अहमदाबाद आणि साबरमती यांचा समावेश असेल. त्यामुळे महाराष्ट्रापेक्षा गुजरातलाच बुलेट ट्रेनचा जास्त फायदा असेल, असा आरोप अनेक पक्षांनी केला आहे.

ठाकरे सरकारचं दुसरं हत्यार, वाढवण बंदर

केंद्राकडून कांजूरमार्ग कारशेडच्या जमिनीवर दावा केल्यानंतर आता ठाकरे सरकारने केंद्राच्या महत्त्वकांक्षी योजनांना विरोध केलाआहे. बुलेट ट्रेन आणि वाढवण बंदराला स्थानिक जनतेचा विरोध आहे. हे प्रकल्प जनतेला मारक असल्याची भूमिका घेत शिवसेनेकडून विरोध होत आहे.

18 डिसेंबरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाढवण बंदर आणि बुलेट ट्रेनला विरोध करणाऱ्या आंदोलकांच्या समितीची भेट घेतली होती. तसेच जर या प्रकल्पांना स्थानिक जनतेचा विरोध असेल तर आपलाही विरोध असेल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यामुळे मोदी आणि ठाकरे सरकार आमने सामने आल्याचं दिसत आहे .

संबंधित बातम्या 

ठाकरे सरकारचे सल्लागार कोण समजत नाही, महाराष्ट्र बुडवायला निघालेत : फडणवीस

मेट्रो कारशेड बुलेट ट्रेनच्या शेजारी हलवा, पर्यावरणप्रेमींच्या प्रस्तावाने भाजपची धाकधूक

Special Report | मेट्रो कारशेड विरुद्ध बुलेट ट्रेन, कोण नाक दाबणार, कुणाचं तोंड उघडणार?

(Oppose for Bullet train project in Thane)