गावदेवी वाहनतळ सुविधा लवकरच नागरिकांसाठी खुली होणार : महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा

| Updated on: Mar 24, 2022 | 12:19 AM

ठाणे रेल्वे स्थानक, गावदेवी परिसरात नागरिक रस्त्याच्या कडेला दुचाकी वा चारचाकी वाहने उभी करतात. त्यामुळे या परिसरातील वाहतुकीला अडथळा होऊन सातत्याने कोंडी होत असते. ही समस्या सोडवण्यासाठी ठाणे महापालिकेच्या वतीने ठाणे स्मार्ट सिटी लि. अंतर्गत गावदेवी मैदानात भूमिगत वाहनतळ उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

गावदेवी वाहनतळ सुविधा लवकरच नागरिकांसाठी खुली होणार : महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा
गावदेवी वाहनतळ सुविधा लवकरच नागरिकांसाठी खुली होणार
Follow us on

ठाणे : ठाणे स्मार्ट सिटी लि.अंतर्गत गावदेवी मैदानात उभारण्यात येणाऱ्या भूमिगत वाहनतळा (Underground Parking)चे काम युद्धपातळीवर सुरू आहे. वाहनतळ सुविधा लवकरच नागरिकांसाठी खुली होणार असल्याचे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा (Dr. Vipin Sharma) यांनी बुधवारी सांगितले. यावेळी अतिरिक्त आयुक्त (1) संदीप माळवी, माजी नगरसेवक संजय वाघुले, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, उप आयुक्त अशोक बुरपल्ले, उप आयुक्त आयुक्त मारुती खोडके, उप आयुक्त मनिष जोशी, सहाय्यक आयुक्त शंकर पाटोळे, कार्यकारी अभियंता विकास ढोले, मोहन कलाल, विनोद पवार, वरिष्ठ उद्यान अधिक्षक केदार पाटील आदी अधिकारी उपस्थित होते. (Municipal Commissioner Dr. Vipin Sharma inspects the underground parking lot)

वाहतूक कोंडीची समस्या सुटणार

ठाणे रेल्वे स्थानक, गावदेवी परिसरात नागरिक रस्त्याच्या कडेला दुचाकी वा चारचाकी वाहने उभी करतात. त्यामुळे या परिसरातील वाहतुकीला अडथळा होऊन सातत्याने कोंडी होत असते. ही समस्या सोडवण्यासाठी ठाणे महापालिकेच्या वतीने ठाणे स्मार्ट सिटी लि. अंतर्गत गावदेवी मैदानात भूमिगत वाहनतळ उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

सद्यस्थितीत हे काम प्रगतीपथावर असून बुधवारी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी संपूर्ण प्रकल्पाची पाहणी करून सविस्तर आढावा घेतला. गावदेवी वाहनतळ हे 4 हजार 330 चौरस मीटरचे असून त्यामध्ये 130 चारचाकी वाहने तर 120 दुचाकी वाहने उभी करण्याची सुविधा निर्माण होणार आहे. या वाहनतळमध्ये कार लिफ्ट, विद्युत तसेच इतर किरकोळ कामे अंतिम टप्प्यात असून येत्या महिनाभरात हे काम पूर्ण होऊन वाहनतळ नागरिकांसाठी खुले करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक डॉ. विपिन शर्मा यांनी यावेळी सांगितले.

शहरातील सुशोभीकरण, रंगरंगोटी व स्वच्छता कामाची पाहणी

महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी शहरातील सुशोभीकरण, फुटपाथ दुरुस्ती, रस्ते दुरुस्ती तसेच साफसफाईच्या कामाची पाहणी केली. यावेळी अनधिकृत बॅनर्स, पोस्टर्सची झाडाझडती घेवून रस्त्यावरील अतिक्रमणे तात्काळ हटविण्याचे आदेश त्यांनी संबंधितांना दिले. महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी महापालिका भवन येथून चालतच सुशोभीकरण, खड्डे भरणे, फुटपाथ दुरुस्ती तसेच साफसफाई कामाची पाहणी करण्यास सुरुवात केली. यामध्ये डॉ.अल्मेडा रोड, राम मारुती रोड, गजानन महाराज चौक, शिवाजी पथ, मासुंदा तलाव, गावदेवी, जांभळी नाका, माँ मीनाताई ठाकरे चौक, आझाद नगर नं.2, एलबीएस रोड, जिरीमरी मंदिर परिसर, घोडबंदर रोड तसेच कापूरवाडी नाका आदी ठिकाणांच्या सुशोभीकरण, फुटपाथ दुरुस्ती, रस्ते दुरुस्ती तसेच साफसफाई कामाची पाहणी केली. (Municipal Commissioner Dr. Vipin Sharma inspects the underground parking lot)

इतर बातम्या

Ulhasnagar Crime : उल्हासनगरात कुत्रीसह पिल्लाला झाडाला लटकावून फाशी, प्राणीमित्रांकडून गुन्हा दाखल

फटका चोरट्याला कल्याण रेल्वे पोलिसांनी ठोकल्या बेड्या, महिला प्रवाशांचे मोबाईल चोरायचा