Ulhasnagar Crime : उल्हासनगरात कुत्रीसह पिल्लाला झाडाला लटकावून फाशी, प्राणीमित्रांकडून गुन्हा दाखल

उल्हासनगरच्या कॅम्प 5 मधील साईनाथ कॉलनी परिसरात बुधवारी 16 मार्च रोजी रात्री एका कुत्रीला आणि तिच्या पिल्लाला गळफास देऊन झाडाला लटकवण्यात आले. ही बाब पीपल फॉर अॅनिमल संस्थेच्या प्राणीमित्र सृष्टी चुग यांना फोनद्वारे समजली.

Ulhasnagar Crime : उल्हासनगरात कुत्रीसह पिल्लाला झाडाला लटकावून फाशी, प्राणीमित्रांकडून गुन्हा दाखल
टॉफी खाल्ल्यानंतर चार मुलांचा मृत्यूImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Mar 23, 2022 | 11:47 PM

उल्हासनगर : उल्हासनगरात एका कुत्री (Dog)सह तिच्या पिल्ला (Puppy)ला झाडाला लटकावून फाशी देण्यात आल्याचा अतिशय धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. प्राणीमित्रांनी हा प्रकार समोर आणला असून याप्रकरणी उल्हासनगरच्या हिललाईन पोलिस (Hilline Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नसून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. (In Ulhasnagar, a puppy with a dog was hanged from a tree, complain filed by animal friends)

प्राणी मित्रांकडून पोलिसात गुन्हा दाखल

उल्हासनगरच्या कॅम्प 5 मधील साईनाथ कॉलनी परिसरात बुधवारी 16 मार्च रोजी रात्री एका कुत्रीला आणि तिच्या पिल्लाला गळफास देऊन झाडाला लटकवण्यात आले. ही बाब पीपल फॉर अॅनिमल संस्थेच्या प्राणीमित्र सृष्टी चुग यांना फोनद्वारे समजली. त्यानुसार त्यांनी या ठिकाणी धाव घेतली असता त्या ठिकाणी एक कुत्री आणि तिचं लहान पिल्लू मृतावस्थेत आढळून आलं. त्यामुळे त्यांनी तातडीने दोघांचेही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले. या प्रकरणी त्यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार हिललाईन पोलिसांनी आयपीसी 429 आणि प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियमान्वये अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला. याबाबत अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नसून या कुत्रीला आणि तिच्या लहान पिल्लाला निर्दयतेने आणि क्रूरतेने कुणी मारलं? याचा शोध पोलीस घेत आहेत.

याआधी उल्हासनगरमध्ये भरधाव डंपरने पाळीव श्वानाला चिरडले

याआधी एका भरधाव डंपर चालकाने पाळीव श्वानाला चिरडल्याची घटना उल्हासनगरमध्ये सोमवारी घडली. उल्हासनगरच्या कुर्ला कॅम्पमध्ये घडलेली ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. उल्हासनगरच्या कुर्ला कॅम्प परिसरातील कालीमाता मंदिराच्या मागे सागर गरजमल हे वास्तव्याला आहेत. त्यांच्याकडे राणी नावाची रॉटविलर जातीची चार वर्षीय श्वान होती. रविवारी सकाळच्या सुमारास सागर हे राणीला घराबाहेर फिरवत असतानाच अचानक भरधाव वेगात एक डंपर आला आणि त्याने त्याने राणीला धडक देत चाकाखाली चिरडलं. या घटनेत राणीचा जागीच तडफडून मृत्यू झाला. यानंतर सागर यांच्या तक्रारीवरून विठ्ठलवाडी पोलिसांनी डंपरचालक बबलू येरकर याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. (In Ulhasnagar, a puppy with a dog was hanged from a tree, complain filed by animal friends)

इतर बातम्या

Indapur Murder : इंदापूर तालुक्यातील धक्कादायक घटना; मुलाकडून बापाची डोक्यात दगड घालून हत्या

फटका चोरट्याला कल्याण रेल्वे पोलिसांनी ठोकल्या बेड्या, महिला प्रवाशांचे मोबाईल चोरायचा

Non Stop LIVE Update
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.