Indapur Murder : इंदापूर तालुक्यातील धक्कादायक घटना; मुलाकडून बापाची डोक्यात दगड घालून हत्या

वडील दारू पिऊन रोज शिवीगाळ करून रात्र-रात्र घराच्या बाहेर काढत असत. वडिलांच्या त्रासाला कंटाळून वडील झोपेत असताना रात्री दोनच्या सुमारास डोक्यात दगड घालून त्यांची हत्या केल्याची कबुली त्याने पोलिसांकडे दिली. याबाबत भिगवण पोलीस ठाण्यात भादवि कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Indapur Murder : इंदापूर तालुक्यातील धक्कादायक घटना; मुलाकडून बापाची डोक्यात दगड घालून हत्या
मुलाकडून बापाची डोक्यात दगड घालून हत्याImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 23, 2022 | 10:56 PM

इंदापूर : बापाच्या त्रासाला कंटाळून डोक्यात दगड घालून मुलानेच बापा (Father)ची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भिगवण जवळील मदनवाडी येथे घडली आहे. डोक्यात दगड घालून मुला (Son)ने बापाची हत्या केली आहे. यासंदर्भात भिगवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राजेंद्र छगन कुंभार असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव असून छगन गजानन कुंभार असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी भिगवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (In Indapur, the son killed his father after getting fed up with his father’s troubles)

वडील दारु पिऊन शिवीगाळ करत घराबाहेर काढायचे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी सव्वा आठच्या सुमारास राजेंद्र छगन कुंभार (रा.मदनवाडी, ता.इंदापूर) हा भिगवण पोलिस ठाण्यात आला. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने माझे वडील छगन गजानन कुंभार यांच्या डोक्यात दगड घालून त्यांची हत्या केली अशी माहिती त्याने पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बारकाईने पाहणी केली व खबर देणारा मुलगा राजेंद्र छगन कुंभार याची सखोल चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच पोलिसांची दिशाभूल करीत होता. परंतु पोलिसी खाक्या दाखवताच त्याने सर्व खरी माहिती पोलिसांसमोर उघड केली.

वडील दारू पिऊन रोज शिवीगाळ करून रात्र-रात्र घराच्या बाहेर काढत असत. वडिलांच्या त्रासाला कंटाळून वडील झोपेत असताना रात्री दोनच्या सुमारास डोक्यात दगड घालून त्यांची हत्या केल्याची कबुली त्याने पोलिसांकडे दिली. याबाबत भिगवण पोलीस ठाण्यात भादवि कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रत्नागिरीतही आईच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या बापाचा मुलाने काटा काढला

रत्नागिरीतही अशाच प्रकारची घटना घडली आहे. आईच्या चारित्र्यावर संशय घेत तू माझा मुलगा नाहीस असे हिणवणाऱ्या बापाचा मुलाने काटा काढला. डोक्यात हातोडा घालून 17 वर्षीय मुलाने बापाची हत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील पुनस गावातील बौद्धवाडी येथे घडली आहे. रविंद्र रावजी कांबळे (40) असे मयत पित्याचे नाव आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलावर भारतीय दंड विधान कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (In Indapur, the son killed his father after getting fed up with his father’s troubles)

इतर बातम्या

फटका चोरट्याला कल्याण रेल्वे पोलिसांनी ठोकल्या बेड्या, महिला प्रवाशांचे मोबाईल चोरायचा

Yavatmal Children Death : यवतमाळमध्ये काळीज चिरणारी घटना, भावाला झोका देत होती चिमुकली अन् सिमेंटचा खांब कोसळला

Non Stop LIVE Update
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.