CCTV Video: दोन मित्र बोलत राहीले आणि वरुन मृत्यू कोसळला, एकाचा जागेवर जीव गेला, घटना कॅमेऱ्यात कैद

गोविंद ठाकूर

गोविंद ठाकूर | Edited By: सागर जोशी

Updated on: Mar 23, 2022 | 10:23 PM

ओवारीपाडा भागातील महालक्ष्मी एसआरए सोसायटीमध्ये एक धक्कादायक घटना घडलीय. दोन मित्र एका घराखाली बोलत उभे असताना एकाच्या डोक्यावर फरशी पडल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला!

CCTV Video: दोन मित्र बोलत राहीले आणि वरुन मृत्यू कोसळला, एकाचा जागेवर जीव गेला, घटना कॅमेऱ्यात कैद
दहिसरच्या ओवारीपाडात डोक्यावर फरशी पडल्यानं तरुणाचा मृत्यू
Image Credit source: TV9

मुंबई :  मृत्यू कधी, कुठे आणि कसा येईल ते सांगता येत नाही. वडीलधाऱ्या मंडळींच्या तोंडून हे वाक्य तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. त्याचा प्रत्यय आज मुंबईच्या दहीसरमध्ये (Dahisar) आला. दहीसर पूर्वेच्या ओवारीपाडा (Owaripada) भागातील महालक्ष्मी एसआरए सोसायटीमध्ये एक धक्कादायक घटना घडलीय. दोन मित्र एका घराखाली बोलत उभे असताना एकाच्या डोक्यावर फरशी पडल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला! कल्याण गिरी असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव होतं आणि तो 40 वर्षाचा होता. ही धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद झालीय. दहीसर पोलीस (Dahisar Police) या प्रकरणाचा तपास करत आहेत.

व्हिडीओमध्ये नेमकं काय?

लाल रंगाचा शर्ट घातलेला एक तरुण रस्त्यावरुन जातोय. त्यावेळी त्याला आपला मित्र दिसतो. हिरव्या रंगाचा शर्ट घातलेला व्यक्ती घरातून बाहेर येतो आणि ते दोघे काही क्षण बोलत उभे राहतात. नंतर एकमेकांशी हस्तांदोलन करुन ते जायला निघतात. मात्र, लाल रंगाचा शर्ट घातलेल्या व्यक्तीला पुन्हा काही आठवतं आणि तो मागे वळतो. त्यानंतर ते दोघे पुन्हा बोलत उभे राहतात. अवघे 5 ते 10 सेकंद बोलत थांबलेल्यानंतर अचानकपणे वरुन एक मोठी फरशी हिरव्या रंगाचा शर्ट घातलेल्या व्यक्तीच्या डोक्यावर पडते आणि जमिनीवर कोसळतो. दुसऱ्या व्यक्तीला काय घडलं हे काही क्षण कळतही नाही आणि तो घाबरून बाजूला होतो.

दुसऱ्या व्यक्तीच्या तोंडालाही मार लागल्याचं त्याचा हावभावावरुन जाणवत आहे. कारण तो तोंडाला हात लावून ओरडत असल्याचं या व्हिडीतून कळून येतं. त्याची आरडाओरड ऐकून घरातील अन्य व्यक्ती बाहेर येतात. तसंच लाल रंगाचा शर्ट घातलेला व्यक्ती धावत मुख्य रस्त्यावर जातो आणि काही लोकांना बोलावतो. रडणं आणि आरडाओरड ऐकून काही लोक धावत येतात आणि त्या जमिनीवर पडलेल्या व्यक्तीच्या जवळ येऊन त्याची अवस्था पाहताना व्हिडीओमध्ये दिसून येत आहेत. साधारण दीड मिनिटाचा हा व्हिडीओ हृदय हेलावणारा आहे. 

इतर बातम्या :

CCTV Video: समोरुन सुपरफास्ट एक्स्प्रेस आली अन् त्यानं थेट उडी घेतली, जवानानं जे केलं त्याला ‘धाडस’ म्हणतात

Nandedच्या मालेगावमधील झेडपीच्या शाळेत फ्री-स्टाईल हाणामारी

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI