ठाण्यात आजपासून आठ दिवस ‘राष्ट्रीय जंतनाशक मोहीम’; शालेय विद्यार्थी, बालकांना जंतनाशक गोळयांचे होणार वाटप

ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत आजपासून ते 28 सप्टेंबरपर्यंत ‘‘राष्ट्रीय जंतनाशक मोहिम’’ राबविण्यात येणार आहे. (National Deworming Drive will start from today in Thane Municipal Corporation)

ठाण्यात आजपासून आठ दिवस ‘राष्ट्रीय जंतनाशक मोहीम’; शालेय विद्यार्थी, बालकांना जंतनाशक गोळयांचे होणार वाटप
National Dewarming Drive

ठाणे: ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत आजपासून ते 28 सप्टेंबरपर्यंत ‘‘राष्ट्रीय जंतनाशक मोहिम’’ राबविण्यात येणार आहे. बालकांचे आरोग्य, त्यांची पोषणविषयक स्थिती व जीवनाचा दर्जा सुधारावा यासाठी 1 ते 19 वर्षे वयोगटातील बालकांना जंतनाशक गोळयांचे वाटप करण्यात येणार आहे. तरी या वयोगटातील लाभार्थ्यांनी मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे. या मोहिमेमध्ये सर्व शासकीय अनुदानित शाळा, महापालिका व खासगी अनुदानित शाळा तसेच या वयोगटातील शाळेत न जाणाऱ्या बालकांमध्ये जंतनाशकाचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. (National Deworming Drive will start from today in Thane Municipal Corporation)

जंताचा प्रादुर्भाव हा प्रामुख्याने अस्वच्छता व दूषित मातीच्या संपर्कात आल्यामुळे राऊंड वर्म, व्हिप वर्म व हुक वर्म हया प्रकारातील जंतांचा प्रसार मोठया प्रमाणावर होतो. जंताचा प्रादुर्भाव झालेल्या मुलांमध्ये कुपोषण व रक्तशय होऊन त्यांना कायम थकवा जाणवतो. परिणामी त्यांची शारीरीक वाढ व मानसिक विकास पुर्णतः होत नाही. म्हणून ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात ही जंतनाशक मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येणार आहे.

अंगणवाडी आणि आश्रम शाळेतही गोळ्या देणार

सदर मोहिमेमध्ये 01 ते 19 वर्षे वयोगटातील सर्व मुलामुलींना अल्बेंडाझोल ही एक गोळी देण्यात येणार आहे. 01 ते 06 वर्षे वयोगटातील सर्व लाभार्थ्यांना अंगणवाडीतून तर, 6 ते 19 वर्षे वयोगटातील सर्व लाभार्थ्यांना जंतनाशकाची गोळी सर्व शासकीय अनुदानित शाळा, खाजगी अनुदानित शाळा, आश्रम शाळा तसेच महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये देण्यात येणार आहे.

हे करा

जंतांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांनी उघडयावर शौचास बसू नये, सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा, स्वच्छ पाण्याने फळे, भाज्या धुवाव्यात व मगच खाव्यात. नेहमी स्वच्छ पाणी प्यावे, खाण्याचे पदार्थ झाकून ठेवावेत, नखे स्वच्छ ठेवून नियमित कापावीत. पायात बुट, चप्पल नेहमी घालावे, जेवणाआधी व शौचानंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत आदी उपाय अंमलात आणावेत असे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

नागरिकांना आवाहन

या मोहिमेमध्ये आजपासून ते 28 सप्टेंबर या कालावधीत महापालिकेतील शाळा व अंगणवाडी केंद्रामार्फत जंतनाशक गोळयांचे वाटप करण्यात येणार आहे. या मोहिमेमध्ये नागरिकांनी आपल्या घरातील 1 ते 19 वर्षातील सर्व लाभार्थ्यांना जंतनाशक गोळी अवश्य देण्याचे आवाहन ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. या जंतनाशक मोहिमेमध्ये आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, शिक्षण विभाग, नागरी विकास, महिला व बालविकास विभाग, पंचायत राज मंत्रालय आदी विभागांचा यामध्ये समावेश आहे. (National Deworming Drive will start from today in Thane Municipal Corporation)

 

संबंधित बातम्या:

ठाण्यातील काही भागात येत्या बुधवारी पाणी पुरवठा बंद; ‘या’ भागात पाणी नाही

शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत, खंजीर खुपसून राष्ट्रवादीचा जन्म, उद्धव ठाकरेंचा बिनीचा शिलेदार आक्रमक

आता पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीवर शिवसेनेतच शिमगा? सरनाईक-शिंदे आमने सामने

(National Deworming Drive will start from today in Thane Municipal Corporation)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI