AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत, खंजीर खुपसून राष्ट्रवादीचा जन्म, उद्धव ठाकरेंचा बिनीचा शिलेदार आक्रमक

श्रीवर्धन तालुक्यात सरपंच आणि उपसरपंच पक्ष प्रवेश सोहळा होता. यावेळी शिवसेना नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांशी जाहीर बोलताना, त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीबाबत भाष्य केलं. 

शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत, खंजीर खुपसून राष्ट्रवादीचा जन्म, उद्धव ठाकरेंचा बिनीचा शिलेदार आक्रमक
Anant Geete_Sharad Pawar
| Edited By: | Updated on: Sep 21, 2021 | 9:55 AM
Share

रायगड : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे आमचे नेते होऊ शकत नाहीत. महाविकास आघाडी (Maha Vikas Aaghadi) ही केवळ तडजोड आहे. राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे, असा हल्लाबोल शिवसेना नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते (Anant Geete) यांनी केला. ते रायगडमध्ये (Raigad) बोलत होते.

श्रीवर्धन तालुक्यात सरपंच आणि उपसरपंच पक्ष प्रवेश सोहळा होता. यावेळी अनंत गीते उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांशी जाहीर बोलताना, त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीबाबत भाष्य केलं.

कोणीही कुठलाही नेता जगाने त्याला कितीही उपाध्या देवो, जाणता राजा बोलो. तो आमचा गुरु होऊ शकत नाही. आमचा गुरु फक्त बाळासाहेब ठाकरेच. आघाडीचे नेते आघाडी सांभाळतील आपल्याला ग्रामपचांयत, पचांयत समिती, जिल्हा परिषद सांभाळायची आहे, असं अनंत गीते म्हणाले.

उद्या आघाडी तुटलीच तर आपण सुनील तटकरेंकडे जायचे का, आपण आपल्याच घरी येणार. म्हणून आपल्याला आपला पक्ष बळकट करायचा आहे, आघाडी नाही, असंही अनंत गीतेंनी नमूद केलं.

अनंत गीते नेमकं काय म्हणाले?

मी शिवसेनेचा नेता म्हणून बोलतोय. शिवसेना काय आहे हेच फक्त सांगणार आहे. राज्यात आपलं सरकार आहे. आपलं कशासाठी म्हणायचं तर मुख्यमंत्री आपले आहेत. पण बाकी काँग्रेस-राष्ट्रवादी आपले नव्हेत. आघाडीचं सरकार आहे. शिवसेनेचं नाही. सरकार आघाडी सांभाळेल. सत्ता आघाडीचे नेते सांभाळतील. तुमची-माझी जबाबदारी गाव सांभाळायची आहे. आपलं गाव सांभाळात असताना आघाडीचा विचार करायचा नाही. आम्हाला फक्त शिवसेनेचा विचार करायचा आहे.

दोन्ही काँग्रेस हे कधी एकमेकांचे तोंड बघत नव्हते. यांची विचारांची सांगड बसत नव्हती. एक मतं नव्हती. दोन काँग्रेस एका विचाराची होऊ शकत नाही, तर शिवसेना काँग्रेस एकविचाराची कदापी होऊ शकणार नाही. ते दोन एक होऊ शकत नाहीत , मुळात राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालेला आहे. दोन काँग्रेस एकत्र येऊ शकत नाहीत, तर आम्ही त्यांच्या विचाराचे होणे कदापी शक्य नाही, असं अनंत गीते म्हणाले.

कोण आहेत अनंत गीते?

अनंत गीते हे रायगडमधील शिवसेनेचे बडे नेते आहेत. 2014 मध्ये मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्ये ते केंद्रीय अवजड उद्योगमंत्री होते. मात्र 2019 च्या निवडणुकीत तत्कालिन शिवसेनेचे एकमेव केंद्रीय मंत्री असलेले अनंत गीते पराभूत झाले होते. रायगड लोकसभा मतदारसंघातून अनंत गीते निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र, राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी अनंत गीते यांचा पराभव केला.

अनंत गीते यांनी रायगड लोकसभा मतदारसंघातून 2009 आणि 2014 साली विजय मिळवला होता. 2014 साली अनंत गीते यांनी राष्ट्रवादीचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना पराभूत केले होते. त्यावेळी अनंत गीते हे केवळ 2100 मतांनी विजयी झाले होते. मात्र 2019 मध्ये सुनील तटकरे यांनीच अनंत गीते यांना पराभूत करुन, गेल्यावेळीच्या पराभवाचा वचपा काढला.

VIDEO : शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत : अनंत गीते

संबंधित बातम्या  

शिवसेनेचे एकमेव केंद्रीय मंत्री पराभूत

तटकरे म्हणाले होते, मला नाही तर अदितीला तरी शिवसेनेत घ्या, शिवसेना नेते अनंत गिते यांचा खळबळजनक दावा

2014 च्या पराभवाचा वचपा काढला, सुनील तटकरेंची अनंत गीतेंवर मात

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.