तटकरे म्हणाले होते, मला नाही तर अदितीला तरी शिवसेनेत घ्या, शिवसेना नेते अनंत गिते यांचा खळबळजनक दावा

एकवेळ मला पक्षात नाही घेतलं तरी चालेल,पण माझी मुलगी अदितीला पक्षात घेऊन उमेदवारी द्या, अशी विनंती सुनील तटकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती”, असा दावा अनंत गिते (Anant Geete Guhagar) यांनी केला.

तटकरे म्हणाले होते, मला नाही तर अदितीला तरी शिवसेनेत घ्या, शिवसेना नेते अनंत गिते यांचा खळबळजनक दावा

रत्नागिरी : शिवसेना नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गिते यांनी खळबळजनक दावा केला आहे. “राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान खासदार सुनील तटकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे पक्षात घेण्याची अनेकदा विनंती केली होती. इतकंच नाही तर एकवेळ मला पक्षात नाही घेतलं तरी चालेल,पण माझी मुलगी अदितीला पक्षात घेऊन उमेदवारी द्या, अशी विनंती सुनील तटकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती”, असा दावा अनंत गिते (Anant Geete Guhagar) यांनी केला.

गुहागरमधील कोतळूक येथील प्रचार सभेच्या दरम्यान अनंत गिते यांनी हा दावा केल्याने, गुहागरमधील राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली आहे.

माजी मंत्री अनंत गिते हे 9 तारखेपासून रायगड लोकसभा मतदारसंघात प्रचार करत आहेत. शिवसेनेचे उमेदवार भास्कर जाधव यांची प्रचारसभा आज कोतळूक इथे पार पडली. यावेळी त्यांनी तटकरे परिवाराबाबत खळबळजनक (Anant Geete Guhagar) दावा केला.

यापूर्वीही सुनील तटकरे हे राष्ट्रवादी सोडण्याची चर्चा होती. मात्र त्यावेळी तटकरेंनी माध्यमांना प्रतिक्रिया देत ही अफवा आणि खोडसाळपणाचं वृत्त असल्याचं म्हटलं होतं. आपण राष्ट्रवादीतच राहून, शरद पवारांवर आपली निष्ठा असल्याचं स्पष्ट केलं होतं.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI