AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ठाण्यात येणारी अवजड वाहतूक रोखणार’, आनंद परांजपे संतापले, वाहतूक कोंडीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे ठाणे शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीचा मोठा त्रास ठाणेकरांना सहन करावा लागत आहे.

'ठाण्यात येणारी अवजड वाहतूक रोखणार', आनंद परांजपे संतापले, वाहतूक कोंडीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आनंद परांजपे
| Edited By: Chetan Patil | Updated on: Sep 23, 2021 | 3:35 PM
Share

ठाणे : रस्त्यावरील खड्ड्यांमुळे ठाणे शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीचा मोठा त्रास ठाणेकरांना सहन करावा लागत आहे. या रस्त्यांच्या दुरुस्तीची जबाबदारी एमएसआरडीसीची असल्याने त्यांनी तत्काळ रस्त्यांची दुरुस्ती करावी, जोपर्यंत रस्त्यांची दुरुस्ती होत नाही, तोपर्यंत शहरातून होणारी अवजड वाहतूक थांबवावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. तसेच या मार्गावरील अवजड वाहतूकही रस्ते दुरुस्ती होईपर्यंत थांबवावी. येत्या आठ दिवसात याबाबत भूमिका न घेतल्यास राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक भूमिका घेऊन ठाण्यात येणारी अवजड वाहतूक बंद पाडेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि ठामपा गटनेते नजीब मुल्ला यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

‘महापौरांचा साचलेल्या पाण्यामध्ये डांबर टाकून खड्डे बुजवायचा प्रयत्न’

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरातील वाहतूक कोंडीमध्ये प्रचंड वाढ होत आहे. त्याविरोधात ठाणेकरांमध्ये आक्रोश आहे. या आक्रोशाला राष्ट्रवादी काँग्रेसने वाचा फोडली आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि ठामपा गटनेते नजीब मुल्ला यांनी पालकमंत्र्यांना निवेदन दिले आहे. या संदर्भात आनंद परांजपे यांनी ठाणे शहरातील रस्त्यांची निगा राखण्याची जबाबदारी एमएसआरडीसीकडून पार पाडली जात नाही. महापौर रात्रीच्या अंधारात गणेशोत्सवाचे विसर्जन होत असताना साचलेल्या पाण्यामध्ये डांबर टाकून खड्डे बुजवायचा प्रयत्न करीत होते, अशा शब्दांत त्यांनी टीका केली.

निवेदनात नेमकं काय म्हटलंय?

“ठाण्याला आज पर्यायी रस्त्याची गरज आहे. कोपरी पूल तयार आहे. त्याच्या दर्जाबाबत ठाणेकरांना देणेघेणे नाही. जर हा पूल तयार झाला आहे तर तो ठाणेकरांसाठी खुला करायला हवाय. ठाण्यात मेट्रोची कामे सुरु आहेत. ठाण्यातील उड्डाणपुलांवर खड्डे आहेत. हे उड्डाणपूल एमएसआरडीसीचे आहेत. ठामपा आणि एमएसआरडीसीमध्ये ताळमेळ नाही. ते एकमेकांकडे बोटे दाखवतात. त्यामुळे ठाणेकरांचे हाल होत आहेत. हायवेची जबाबदारी एसआरडीसीकडे आणि अंतर्गत रस्त्यांची जबाबदारी ठामपाकडे आहे. एमएसआरडीसी खाते शिवसेनेकडे आहे आणि ठामपातही शिवसेनेची सत्ता आहे. ठामपात सेनेला स्पष्ट बहुमत आहे. राष्ट्रवादीची गरज नाही, असे महापौर नरेश म्हस्के यांनी म्हटले होते. त्यामुळे या खड्ड्याांची जबाबदारीही शिवसेनेचीच आहे. कामाचा दर्जा तपासणे ही जबाबदारी शिवसेनेची आहे. त्यामुळे ठाणेकरांना खड्डेमुक्त आणि वाहतूक कोंडीतून मुक्तता देण्याची जबाबदारी शिवसेनेची आहे”, असं निवेदनात म्हटलं आहे.

आंदोलनाचा इशारा

“आम्ही पालकमंत्र्यांना याबाबत विनंती करतो की, त्यांनी स्वत: लक्ष घालून ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून मुक्तता करावी; अन्यथा, मुलुंड टोल नाका, खारीगावा टोल नाका आणि गायमुख या तिन्ही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते रस्त्यावर उतरुन ठाण्यात येणारी अवजड वाहनांची वाहतूक रोखून धरेल. ठाण्यात एकही अवजड वाहन येऊ देणार नाही”, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

‘गेल्या 15 दिवसांपासून ठाणेकर वाहतूक कोंडीमुळे त्रस्त’

“दरम्यान, गेल्या 15 दिवसांपासून ठाणेकर वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झालेले आहेत. ठाणे शहरातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 व 8 हे मुख्य महामार्ग जातात. या मार्गावरुन मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची सतत ये-जा सुरु असते. सद्यस्थितीमध्ये या रस्त्यावर मोठ-मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले आहेत. रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला असून प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. या खड्ड्यांमुळे रस्त्यांवरील अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे. या रस्त्यांची दुरुस्ती करण्याची जबाबदारी एमएसआरडीसीची आहे”, असं राष्ट्रवादीने निवेदनात म्हटलं आहे.

‘कोपरीचा पूल तयार होऊनही वाहतूक सुरु नाही?’

“ठाणे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी फॉरेस्ट हिल रोडचा आणि कोस्टल रोडचा पर्याय निर्माण करण्यात आला होता. फॉरेस्ट हिल रोडचा प्रस्ताव सन 2009 पासून प्रलंबित आहे. तर, मोघर पाडा येथे 4 वर्षांपूर्वी एम. एस. आर. डी. सी.ने पूल बांधण्यासाठी ना हरकत दाखला मागितला होता. त्याची रक्कम आणि ना हरकत दाखला देऊनही त्याचे काम पुढे सरकलेले नाही. तसेच, कोपरीचा पूल तयार होऊनही वाहतूक सुरु झालेली नाही. या सर्व प्रकारामुळे ठाणेकरांच्या मनात संतप्त भावना आहेत. याचा विचार करुन रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम तत्काळ हाती घ्यावे आणि हे काम पूर्ण होईपर्यंत या मार्गावर होणारी अवजड वाहनांची वाहतूक बंद करावी. अन्यथा, मुलुंड टोल नाका, खारीगावा टोल नाका आणि गायमुख या तिन्ही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन करुन ठाण्यात येणारी अवजड वाहनांची वाहतूक रोखून धरेल. ठाण्यात एकही अवजड वाहन येऊ देणार नाही”, असं परांजपे आणि मुल्ला यांनी निवेदनात म्हटलं आहे.

हेही वाचा : ठाणे-नाशिक महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, 15 किलोमीटरच्या रांगाच रांगा; प्रवाशांचा तीन तासांपासून खोळंबा

Follow Us
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा टाकताच...
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
Video | माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यूचा थरार! पहा व्हिडीओ
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
CJP Protest | नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
Viral Video | व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
संध्याकाळी 6 वाजता राहुल गांधींची खासदारांसोबत बैठक,
संध्याकाळी 6 वाजता बैठक, पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनानंतर कॉंग्रेसची पुढील रणनीती काय?
मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत
Suvrat Joshi | मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा...
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा घेणार लोकसभा अध्यक्षांची भेट
आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
Assam Flood | आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
Viral Video | एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल