ठाणे-नाशिक महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, 15 किलोमीटरच्या रांगाच रांगा; प्रवाशांचा तीन तासांपासून खोळंबा

ठाणे-नाशिक आणि घोडबंद ते नाशिक महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे. या महामार्गावर 10 ते 15 किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत. (Traffic Jam in Thane)

ठाणे-नाशिक महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, 15 किलोमीटरच्या रांगाच रांगा; प्रवाशांचा तीन तासांपासून खोळंबा
Traffic Jam in Thane

ठाणे: ठाणे-नाशिक आणि घोडबंद ते नाशिक महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे. या महामार्गावर 10 ते 15 किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचा गेल्या तीन तासांपासून वाहतूक कोंडीत खोळंबा झाला आहे. पाऊस आणि चिखल यामुळे प्रवाशांना गाडीत बसून रहावे लागत असल्याने त्यांचा संतापाचा पारा चढला आहे. (Traffic jams on Thane-Nashik highway in thane due to potholes)

ठाणे ते नाशिक आणि घोडबंदर ते नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. या मार्गावर 10 ते 15 किलोमीटरपर्यंत लांबच रांगा लागल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना गेल्या 3 तासापासून वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागले आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने त्यातून गाडी चालवणं प्रवाशाना कठिण होऊन बसलं आहे. त्यामुळेच या महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. एमएमआरडीए प्रशासनाने हा रस्ता बांधला आहे. या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याने त्याचा वाहनधारकांना मोठा फटका बसला आहे.

खड्डे बुजवले तरीही परिस्थिती जैसे थे

दरम्यान, सकाळपासून ठाणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्यानंतरही वाहतूक कोंडी हटवण्यासाठी वाहतूक विभागाचा एकही अधिकारी या ठिकाणी फिरकलेला नाही. त्यामुळे वाहतूक कोंडी कशी सुटणार? असा सवाल केला जात आहे. एमएमआरडीने या महामार्गाचं काँक्रिटीकरण करावं, चांगले रस्ते बनवावेत, पाऊस थांबल्याबरोबर एमएमआरडीएने हे काम हाती घ्यावं, अशी मागणी स्थानिक रहिवाशी करत आहेत. एमएमआरडीएने दोन तीनवेळा या रस्त्यावरील खड्डे बुजवले आहेत. मात्र, परिस्थिती जैसे थे आहे. त्यामुळे रस्त्याचे काँक्रिटीकरण हाच त्यावर एकमेव पर्याय आहे, असंही स्थानिकांचं म्हणणं आहे.

अतिरिक्त आयुक्तांच्या अभियंतांना कामाविषयी सूचना

दरम्यान जुलैमध्येच अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी ठाण्यातील खड्ड्यांची पाहणी केली होती. माजीवडा मानपाडा प्रभाग समिती, तीन हात नाका, टिपटॉप प्लाझा, सेवा रस्ता लुईसवाडी, एलबीएस मार्ग आणि इतर ठिकाणांच्या रस्ते दुरुस्तीच्या कामाची पाहणी केली. तसेच कामाची गती व दर्जा याविषयी अभियंत्यांना सूचना दिल्या होत्या. मात्र, हा महामार्ग एमएमआरडीच्या अंतर्गत येत असल्याने एमएमआरडीएने महामार्गाचं काँक्रीटीकरण करण्याऐवजी केवळ खड्डे बुजवून काम भागवलं. त्यामुळेच पुन्हा या रस्त्यावर खड्डे पडल्याचं सांगितलं जात आहे.

अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण आदेश

दरम्यान, ठाणे महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरु असलेल्या नागला बंदर वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट, पार्किंग प्लाझा कोव्हिड सेंटर तसेच गावदेवी पार्किंग कामाची महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी पाहणी केली होती. विसर्जन घाट व दशक्रिया केंद्राचे काम 5 सप्टेंबर अखेर पूर्ण करण्याचे निर्देश देतानाच सर्वच कामांची गती वाढवून वेळेत प्रकल्प पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. यावेळी नगरसेवक विकास रेपाळे, उप आयुक्त शंकर पाटोळे, मुख्य तांत्रिक अधिकारी प्रवीण पापळकर, कार्यकारी अभियंता मोहन कलाल, चेतन पटेल, विकास ढोले, संजय कदम आदी अधिकारी उपस्थित होते. (Traffic jams on Thane-Nashik highway in thane due to potholes)

 

संबंधित बातम्या:

ठाण्यात ठेकेदारांचे बंड; बिले चुकती करा, नाही तर काम बंद करू; ठेकेदारांचा इशारा

धो डाला! ठाणे, पालघरमध्ये पावसाचं धुमशान; सकाळपासून जोरदार हजेरी

कल्याणचा काटई टोलनाका कायमस्वरुपी बंद करा; मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी

 (Traffic jams on Thane-Nashik highway in thane due to potholes)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI