प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येमागचं खरं कारण आलं समोर, एकाला अटक; पोलिसांचा सर्वात मोठा दावा काय?

ठाकरे गट नेते प्रदीप पूर्णेकर हत्येचं खरं कारण समोर आलं असून, एकाला अटक झालीय. राजकीय आणि सामाजिक वादातून हत्या झाल्याची आरोपीने कबुली दिली. ठाणे पोलिसांनी इतर आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. पूर्णेकर कुटुंबीय आणि शिवसैनिकांनी सर्व आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला असून, पोलीस ठाण्याबाहेर निदर्शने सुरू आहेत.

प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येमागचं खरं कारण आलं समोर, एकाला अटक; पोलिसांचा सर्वात मोठा दावा काय?
Pradip Poornekar
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 30, 2026 | 2:16 PM

ठाकरे गटाचे ठाण्यातील विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणातील खरं कारण समोर आलं आहे. पोलिसांनी या हत्या प्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. या आरोपीनेच हत्येमागचं कारण पोलिसांना सांगितलं आहे. त्यानंतर पोलिसांनी आता त्याच्या इतर सहकाऱ्यांचा तपास सुरू केला आहे. पोलिसांची एक टीम आरोपींना पकडण्यासाठी रवाना झाली आहे. लवकरच या आरोपींना अटक केली जाईल, असा दावा कापूरबावडी पोलिसांनी केला आहे.

ठाण्याचे सह पोलीस आयुक्त ज्ञानेश चव्हाण यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली. प्रदीप पूर्णेकर हत्याकांडातील चारपैकी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. या आरोपींनी पूर्णेकरांवर 5 राऊंड फायरिंग केली होती. राजकीय आणि सामाजिक कारणावरून वाद झाल्याने पूर्णेकर यांची हत्या करण्यात आल्याची कबुली या आरोपीने दिली आहे, अशी माहिती सह पोलीस आयुक्त ज्ञानेश चव्हाण यांनी दिली आहे. तसेच बाकीच्या आरोपींना पकडण्यासाठी टीम रवाना करण्यात आल्या आहेत, लवकरच बाकीचे आरोपी पकडले जातील, असंही चव्हाण यांनी सांगितलं.

Loading...

पोलीस ठाण्याला घेराव

दरम्यान, प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणामुळे ठाण्यात संतापाची लाट उसळली आहे. पूर्णेकर यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्यासाठी संपूर्ण मनोरमा नगर आणि शिवसैनिक कापूरबावडी पोलीस ठाण्याबाहेर जमले आहेत. या रहिवाश्यांनी पोलिस ठाण्याला घेराव घातल्याने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुख्य आरोपीला अटक झालीच पाहिजे. जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही, तोपर्यंत पूर्णेकरांवर अंतिम संस्कार करण्यात येणार नाही. त्यांचा मृतदेह पोलीस ठाण्यात आणला जाईल, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे.

टेन्शन वाढलं

पूर्णेकर समर्थकांना आणि कुटुंबीयांना पोलिसांनी पोलीस ठाण्याच्या गेटवरच अडवले आहे. जोपर्यंत मुख्य आरोपींना अटक करणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा पूर्णेकर कुटुंबीयांनी घेतला आहे. थोड्याच वेळात पूर्णेकर यांचा मृतदेह जेजे रुग्णालयातून ठाण्यात आणण्यात येणार आहे. त्यातच पूर्णेकर यांचा मुलगा राम पूर्णेकर आणि शिवसैनिकांनी कापूरबावडी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केल्याने पोलिसांचे टेन्शन वाढलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us