पूर्णेकर यांच्या पत्नीचं थेट एकनाथ शिंदे यांनाच आवाहन; म्हणाल्या, तिच्या डोक्यावरचा…

प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येने महाराष्ट्र हादरला आहे. पत्नी विजेता पूर्णेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आवाहन करत, मीनाक्षी शिंदे यांच्यावरील हात काढून त्यांना पदावरून हटवण्याची मागणी केली. हत्येचा कट मीनाक्षी शिंदेंनीच रचल्याचा गंभीर आरोप करत, दोषींना फाशीची शिक्षा व्हावी आणि न्याय मिळावा अशी त्यांची मागणी आहे.

पूर्णेकर यांच्या पत्नीचं थेट एकनाथ शिंदे यांनाच आवाहन; म्हणाल्या, तिच्या डोक्यावरचा...
eknath shinde
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 01, 2026 | 3:23 PM

ठाकरे गटाचे ठाण्याचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची दोन दिवसापूर्वी हत्या करण्यात आली. पाच राऊंड फायरिंग करून पूर्णेकर यांची हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे ठाणेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. या प्रकरणातील आरोपींवर कठोरातील कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोपींना फासावर लटकवण्याची मागणी केली आहे. प्रदीप पूर्णेकर यांच्या पत्नीनेही आरोपींना कठोर शिक्षा ठेण्याची मागणी केली आहे. त्यांनी ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. यावेळी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही एक आवाहन केलं आहे.

प्रदीप पूर्णेकर यांच्या पत्नी विजेता पूर्णेकर यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. माझ्या नवऱ्याच्या हत्येचा कट मिनाक्षी शिंदे यांनीच रचला आहे. त्यामुळे मिनाक्षी शिंदे, राजेंद्र शिंदे आणि इतर आरोपींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी. त्यांना फाशी देण्यात यावी, अशी मागणी विजेता पूर्णेकर यांनी केली आहे. माझा नवरा प्रामाणिक होता. त्यांनी लोकांसाठीच आंदोलने केली, असंही त्या म्हणाल्या.

Loading...

ईडीची कारवाई करा

माजी महापौर मिनाक्षी शिंदे घाबरत आहेत. त्यामुळेच त्या समोर येत नाहीत. एकनाथ शिंदे यांनी मिनाक्षी शिंदे यांच्या डोक्यावरील हात काढावा. त्यांचे नगरसेवक पद रद्द करावे. सरकार आणि पोलिसांनी योग्य कारवाई करून आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी विजेता पूर्णेकर यांनी केली आहे. मिनाक्षी शिंदे यांच्याकडे खूप पैसा आहे. त्यांच्यावर ईडीची कारवाई करावी. मिनाक्षी शिंदे खूप खालच्या थराला जाऊन काम करत आहेत. सगळ्यांनाच फाशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

पप्पू शिंदेची चौकशी सुरू

दरम्यान, पूर्णेकर हत्या प्रकरणातील अटकेतील आरोपीची सहपोलीस आयुक्तांकडून कसून चौकशी सुरू आहे. ठाणे गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त पंजाबराव उगले यांच्याकडून पप्पू शिंदेची चौकशी सुरू आहे. ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकात चौकशी सुरू आहे. त्यामुळे पोलिसांच्या हाती काय धागेदोरे लागतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us