कास्टिंग काऊच करणाऱ्यांना तात्काळ अटक करा; राज ठाकरेंनी केलं त्या तरुणींचं कौतुक

| Updated on: Aug 02, 2021 | 5:49 PM

कास्टिंग काऊच करणाऱ्यांना तात्काळ अटक करा आणि त्यांना कोणत्याही परिस्थितीत जामीन मिळू देऊ नका, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्याच्या पालीस आयुक्तांकडे केली आहे.

कास्टिंग काऊच करणाऱ्यांना तात्काळ अटक करा; राज ठाकरेंनी केलं त्या तरुणींचं कौतुक
राज ठाकरे, मनसेप्रमुख
Follow us on

ठाणे: कास्टिंग काऊच करणाऱ्यांना तात्काळ अटक करा आणि त्यांना कोणत्याही परिस्थितीत जामीन मिळू देऊ नका, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्याच्या पालीस आयुक्तांकडे केली आहे. तसेच कास्टिंग काऊच विरोधात आवाज उठविणाऱ्या तरुणींचं राज यांनी अभिनंदनही केलं आहे. (raj thackeray reaction on casting couch incidents in thane)

राज ठाकरे यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजित सिंग यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी कास्टिंग काऊच करणाऱ्या आरोपींना त्वरीत अटक करा. त्यांना कोणत्याही परिस्थितीत जामीन मिळू नयेत अशी कलमे लावा, अशी मागणी राज यांनी केली. तसेच ‘कास्टिंग काऊच’च्या जाळ्यात अडकलेल्या तरुणींनी धाडसाने पुढे येऊन आवाज उठविल्याबद्दल त्यांनी या तरुणींचे अभिनंदनही केलं आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

एका नवोदित अभिनेत्रीला डायरेक्टरने मुख्य भूमिका देण्याच्या बदल्यात शरीर सुखाची मागणी केली होती. या मुलींनी मनसेकडे या कास्टिंग डायरेक्टरची तक्रार केली होती. त्याची दखल घेत मनसे कार्यकर्त्यांनी सापळा रचून या डायरेक्टरला चोप दिला होता. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी फेसबुक लाईव्ह करत या प्रकरणाची माहिती दिली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सापळा रचत ठाण्याचा घोडबंदर रोडवरील फॉर्म हाऊसवर संबंधित निर्मात्यांना घेरलं. त्यानंतर त्यांना चांगलाच चोप देत तरुणीची सुटका केली होती.

“मनसेचे उपाध्यक्ष पदमनाथ राणे यांना आज एक मुलीचा फोन आला. एका कास्टिंग डायरेक्टरने तिला लीड रोलसाठी गोरेगावमध्ये एका मॉलमध्ये भेटायला सांगितलं. तसेच लखनऊमधून निर्माते येणार आहेत त्यांना खुश करावा लागेल, असं सांगितलं. तिने सगळे पुरावे दिले. त्यानंतर आमच्या महिला रणरागिणींनी त्या कास्टिंग डायरेक्टरला मॉल ते ठाणे घोडबंदर रोडपर्यंत ट्रॅप केलं. ज्या गाडीत त्या मुलीला कास्टिंग डायरेक्टर घेऊन जात होता त्याला मनसे सैनिकांनी ट्रॅप केलं”, असं अमेय खोपकर यांनी सांगितलं.

निर्मात्यांनी त्रास दिल्यास संपर्क साधा

“निर्मात्यांनी एका फार्महाउसला गाडी थांबविली. त्यांनी रस्त्यात दारुही घेतली. तिथे पोहोचल्यानंतर 4 निर्माते होते. बिरालाल यादव, राहुल यादव, कंचन यादव, जयजेश यादव अशी त्यांची नावे होते. मनसे सैनिकांनी त्यांना चोप दिला आणि पोलिसांच्या हवाले केला. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ अपलोड करत आहोत. त्यात एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी देखील आहे. अजून जर कुणाला या लोकांपासून त्रास झाला असेल तर त्यांनी लगेच आम्हाला संपर्क करावा’, असं आवाहन खोपकर यांनी केलं आहे. (raj thackeray reaction on casting couch incidents in thane)

 

संबंधित बातम्या:

VIDEO : नवोदित अभिनेत्रीकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या निर्मात्यांना मनसेचा चोप

पोलीस कॉन्स्टेबल असल्याचा माज? तरुणाला मरेपर्यंत मारलं, नंतर फेकून दिलं, मारहाणीचा व्हिडीओ समोर

(raj thackeray reaction on casting couch incidents in thane)