Rajya Sabha Election: मी माणूस आहे, घोडा नाही, चिंता नसावी; नॉट रिचेबल मनसे आमदाराचं सूचक ट्विट

Rajya Sabha Election: मनसेने हिंदुत्वाचा मुद्दा जोरदार उचल्याने भाजप - मनसे नेत्यांच्या जवळीक वाढल्याचे आपण पाहिले आहे. काही दिवसांपूर्वी मनसेच्या आमदार पाटील यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्या समर्थनार्थ पुढाकार घेतलेला दिसला होता.

Rajya Sabha Election: मी माणूस आहे, घोडा नाही, चिंता नसावी; नॉट रिचेबल मनसे आमदाराचं सूचक ट्विट
मी माणूस आहे, घोडा नाही, चिंता नसावी; नॉट रिचेबल मनसे आमदाराचं सूचक ट्विटImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 05, 2022 | 12:22 PM

ठाणे: राज्यसभा निवडणुकीला (Rajya Sabha Election) अवघे पाचच दिवस बाकी आहेत. त्यामुळे अपक्ष आमदार फुटू नयेत म्हणून सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तर इतर छोट्या पक्षांच्या आमदारांना आपल्याकडे खेचण्याचा शिवसेना (shivsena) आणि भाजपने जोरदार प्रयत्न सुरू केला आहे. एक एक आमदार महत्त्वाचा असल्याने या आमदारांभोवती सर्वच राजकीय पक्षांनी जाळं टाकण्यास सुरुवात केली आहे. त्याचवेळी दुसरीकडे मनसेचे आमदार राजू पाटील हे नॉट रिचेबल झाल्याने चर्चांना उधाण आलं आहे. राजू पाटील (raju patil) गेले कुठे असा सवाल या निमित्ताने केला जात आहे. पाटील स्वत: नॉट रिचेबल झाले की एखाद्या पक्षाच्या सांगण्यावरून ते नॉट रिचेबल झालेत अशीही चर्चा रंगली आहे. गेल्या काही दिवसापासून मनसेने आघाडीवर टीका करतानाच भाजपचे गोडवे गायला सुरुवात केली आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीत मनसे भाजपला मतदान करणार की राजकीय गणितं पाहून आघाडीला मतदान करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील हे नॉट रिचेबल झाल्याने चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर पाटील यांनी स्वत:हून ट्विट करून राज्यसभेच्या निवडणुकीवर भाष्य केलं. पण आपण कुठे आहोत हे त्यांनी स्पष्ट केलं नाही. चिंता नसावी, आमच्यासाठी मा. श्री.राजसाहेबांचा आदेश प्रमाण आहे. आणि मी माणूस आहे, घोडा नाही, असं ट्विट राजू पाटील यांनी केलं आहे.

हे सुद्धा वाचा

काय होती चर्चा?

राज्यसभा निवडणुकीसाठीच्या सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आल्याने छोट्या पक्षांचा आणि अपक्ष आमदारांचाही भाव चांगलाच वाढला आहे. यात आता मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांचंही मत मोलाचे ठरले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी बोलून हे मत भाजप खेचणार की ठाण्यातील शिवसेनेचा बडा नेता पाटलांना गळाला लावणार असा सवाल राज्यकीय वर्तुळात आहे. याबाबत मनसेचे आमदार राजू पाटील यांना संपर्क केला असता झाला नाही. दरम्यान मनसे आमदार राजू पाटील हे नॉट रिचेबल झाले आहेत.

मतदान कुणाला करणार?

मनसेने हिंदुत्वाचा मुद्दा जोरदार उचल्याने भाजप – मनसे नेत्यांच्या जवळीक वाढल्याचे आपण पाहिले आहे. काही दिवसांपूर्वी मनसेच्या आमदार पाटील यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्या समर्थनार्थ पुढाकार घेतलेला दिसला होता. तर दुसरीकडे ठाणे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे नेते राजू पाटील यांचे सुद्धा संबंध चांगले आहेत, असे असेल तरी कल्याण लोकसभेचे खा. डॉ. श्रीकांत शिंदे आणि मनसेचे आमदार पाटील हे कट्टर राजकीय विरोधक असल्याचे दिसून आले आहे. कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेने भाजप आणि मनसेला खिडार पाडलं आहे. राज्यात केडीएमसी ही एकमेव पालिका होती, जिथे दोन आकडी नगरसेवक मनसेचे होते. दरम्यान महापालिका निवडणुक जवळ आली असल्याने शिवसेनेच्या उमेदवाराला मनसे पाठिंबा देण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे भाजपसाठी मनसेचे एक मत मिळू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. अद्याप मनसेने याविषयी भूमिका जाहीर केली नसली तरी भाजपला त्या मताची आशा आहे. दरम्यान, याबाबत मनसेच्या आमदार राजू पाटील यांना संपर्क केला असता झाला नाही, ते नॉट रिचेबल आहेत.त्यामुळं ते कोणाला मतदान करणार हे पाहावे लागेल.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.