संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ; राजा ठाकूर यांच्या पत्नीकडून तक्रार दाखल; तक्रारीत काय म्हटलंय?

| Updated on: Feb 22, 2023 | 7:56 AM

मी राऊतांविरोधात मानहानीचा दावा करण्यासाठी आले आहे. माझ्या पतीला राऊत गुंड म्हणाले. म्हणूनच मी तक्रार अर्ज दिला आहे. राऊत यांच्या या विधानाची दखल घेऊन त्याचा तपास करावा.

संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ; राजा ठाकूर यांच्या पत्नीकडून तक्रार दाखल; तक्रारीत काय म्हटलंय?
pooja thakur
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

निखिल चव्हाण, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, ठाणे : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. श्रीकांत शिंदे यांनी मला जीवे मारण्यासाठी राजा ठाकूर यांना सुपारी दिली आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस आयुक्तांना त्याबाबतचं पत्रंही दिलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. राऊत यांच्या या आरोपांमुळे ठाकूर कुटुंबही संतापले आहे. राजा ठाकूर यांच्या पत्नी पूजा ठाकूर यांनी थेट कापूरबावडी पोलीस ठाण्यात जाऊन संजय राऊत यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

पूजा ठाकूर यांनी संजय राऊतांविरोधात मानहानीची तक्रार दाखल केली आहे. पूजा ठाकूर यांनी ठाण्याच्या कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. संजय राऊत यांनी माझ्या पतीला गुंड संबोधित केलं आहे. त्याविरोधात मी पोलीस ठाण्यात अर्ज दिला आहे, असं पूजा ठाकूर यांनी सांगितलं. श्रीकांत शिंदे यांनी राजा ठाकूर यांना मला जीवे मारण्यासाठी सुपारी दिल्याचा आरोप संजय राऊत यांनी काल सकाळी केला होता. त्यामुळे पूजा ठाकूर यांनी ही तक्रार केली आहे.

हे सुद्धा वाचा

मी राऊतांविरोधात मानहानीचा दावा करण्यासाठी आले आहे. माझ्या पतीला राऊत गुंड म्हणाले. म्हणूनच मी तक्रार अर्ज दिला आहे. राऊत यांच्या या विधानाची दखल घेऊन त्याचा तपास करावा. तसेच राऊत यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पोलिसांकडे केली आहे.

पोलिसांचे आभार

राजा ठाकूर हे गुंड आहेत तर इथली जनता बोलेल. भांडूप येथील खासदारांना तसे बोलण्याची गरजच काय? असा सवाल करतानाच पोलिसांनी सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे पोलिसांचे आभारी आहोत, असं त्या म्हणाल्या.

मी शिवसेनेतच

मी या आधी शिवसेनेकडून निवडणूक लढले आहे. तेव्हा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे होते. तेव्हा त्यांनी मला उमेदवारी दिली होती. त्यावेळी माझे मिस्टर समाजसेवक म्हणून चालत होते. आत त्यांना ते गुंड दिसत आहेत. मी अजूनही शिवसेनेत आहे. माझे पती मला समाजकार्यात मदत करत असतात. हीच आमची ओळख आहे. मी राऊतांविरोधात तक्रार केलेली आहे. याबद्दल पोलीस मदत करतीत अशी अपेक्षा आहे, असंही त्या म्हणाल्या.