नगरविकास विभागाच्या मनमानीमुळं नगर पालिका, महापालिकांच्या निवडणुका लांबल्या, राजू पाटील यांची टीका

| Updated on: Nov 03, 2021 | 3:43 PM

मनसेचे आमदार राजू पाटील यांनी महापालिका आणि नगरपालिकेच्या निवडणुकीवरुन राज्य सरकारवर टीका केली आहे. राजू पाटील यांनी नगर विकास खात्याच्या भूमिकेमुळे निवडणुका लांबणीवर पडल्याचं म्हटलं.

नगरविकास विभागाच्या मनमानीमुळं नगर पालिका, महापालिकांच्या निवडणुका लांबल्या, राजू पाटील यांची टीका
राजू पाटील
Follow us on

ठाणे(अंबरनाथ): मनसेचे आमदार राजू पाटील यांनी महापालिका आणि नगरपालिकेच्या निवडणुकीवरुन राज्य सरकारवर टीका केली आहे. राजू पाटील यांनी नगर विकास खात्याच्या भूमिकेमुळे निवडणुका लांबणीवर पडल्याचं म्हटलं. प्रशासकाच्या माध्यमातून हवं ते करता येत असल्यानं नगर विकास खात्याकडून मनमानी करण्यात येतेय. विधानसभेच्या पोटनिवडणुका होतात, राजकीय पक्षांचे मेळावे होत असतील तर निवडणुका घ्यायला काय अडचण आहे, असा सवाल राजू पाटील यांनी केलाय.

नगरविकास विभागाच्या मनमानीमुळं निवडणुका लांबणीवर

नगरविकास विभागाने ठरवलं, तर पालिकांच्या निवडणुका लगेच होऊ शकतात, मात्र त्यांच्या मनमानीमुळेच निवडणुका लांबल्या असल्याचा आरोप मनसे आमदार राजू पाटील यांनी केलाय. राजू पाटील हे अंबरनाथमध्ये एका कार्यक्रमासाठी आलेले असताना त्यांनी हा आरोप केला.

अंबरनाथमध्ये दीड वर्षांपासून प्रशासक

अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिकांची निवडणूक एप्रिल 2020 मध्ये होणं अपेक्षित होतं. मात्र कोरोनामुळे निवडणुका न होऊ शकल्यानं गेल्या दीड वर्षांपासून दोन्ही पालिकांवर प्रशासकीय राजवट आहे.

दरम्यानच्या काळात राज्यात, देशात अनेक निवडणुका, पोटनिवडणुका होऊन गेल्या. बंगालसारख्या मोठ्या राज्यात विधानसभा निवडणुकाही झाल्या. तर नुकतीच पंढरपूर, मग देगलूरची पोटनिवडणूक राज्यात झाली. या सगळ्या निवडणुका होऊ शकतात, तर मग अंबरनाथ आणि बदलापूर पालिकेच्या निवडणुका का होत नाही? असा प्रश्न अंबरनाथ आणि बदलापूरकरांना पडला आहे. मनसेचे आमदार राजू पाटील यांना विचारलं असता, या नगरपालिकांचा कारभार नगरविकास खात्याकडे आहे, आणि प्रशासकाच्या माध्यमातून हवं ते काम करता येतं, असा बोध आणि शोध नगरविकास खात्याला लागला आहे, अशी टीका राजू पाटील यांनी केली.

निवडणुका घ्यायला काय हरकत आहे?

आपली मनमानी करण्यासाठी निवडणुका लांबवल्या जात असल्याचा आरोप राजू पाटील यांनी केला. तसंच ठरवलं तर निवडणुका लगेच घेऊ शकता असंही ते म्हणाले. एकीकडे पोटनिवडणूक, राजकीय मेळावे होत असताना नगरपालिकेच्या निवडणुका घ्यायला काय हरकत आहे? असा सवालही राजू पाटील यांनी उपस्थित केला आहे.

इतर बातम्या:

Elections 2022: निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणीची दिल्लीत बैठक, 300 नेते उपस्थित राहणार

कोरोनाची लस घेतलीही नाही आणि घेणारही नाही, इंदोरीकर महाराजांच्या वक्तव्याने नवा वाद

Raju Patil, MNS, Eknath Shinde, Municipal Corporation Election, Ambarnath,