‘आयुक्तांनी बदली मागितली, तरी आम्ही सोडणार नाही’, शिवसेना आमदारांकडून केडीएमसी आयुक्तांचा सत्कार

| Updated on: Jun 28, 2021 | 7:42 PM

आयुक्तांनी बदली मागितली तरी आम्ही त्यांना सोडणार नाहीत, असं विधान शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी केलं (Shivsena MLA Vishwanath Bhoir appreciate work of KDMC commissioner Vijay Suryawanshi).

आयुक्तांनी बदली मागितली, तरी आम्ही सोडणार नाही, शिवसेना आमदारांकडून केडीएमसी आयुक्तांचा सत्कार
Follow us on

मुंबई : आयुक्तांनी बदली मागितली तरी आम्ही त्यांना सोडणार नाहीत, असं विधान शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी केलं. कोरोना काळात चांगले काम आणि आंबिवली टेकडीवर केलेल्या वृक्षरोपणाबद्दल आमदार विश्वनाथ भोईर यांनी केडीएमसी आयुक्तांचा सत्कार केला. यावेळी ते बोलत होते. कल्याण उंबर्डे येथे केडीएमसी आणि नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात आमदार भोईर यांच्यासह भाजप खासदार कपिल पाटील आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी उपस्थित होते (Shivsena MLA Vishwanath Bhoir appreciate work of KDMC commissioner Vijay Suryawanshi).

आयुक्तांच्या बदलीची चर्चा सुरु असतानाच आमदारांचं विधान

कोरोना काळात चांगले काम केल्याने केंद्र सरकारकडून केडीएमसीला पुरस्कार मिळाला. आंबिवली टेकडीवर हिरवाई फुलविल्याबद्दल आमदारांनी सत्कार केला. विशेष म्हणजे आयुक्तांच्या बदलीची चर्चा सुरु असताना आमदार भोईर यांनी आम्ही बदली होऊ देणार नाही. त्यांना कुठेही सोडणार नाही, असे विधान विश्वनाथ भोईर यांनी केले (Shivsena MLA Vishwanath Bhoir appreciate work of KDMC commissioner Vijay Suryawanshi).

केडीएमसीकडून ठिकठिकाणी वृक्षरोपण सुरु

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात महापालिकेकडून ठिकठिकाणी वृक्षारोपण सुरु आहे. कल्याण सिटी पार्कमध्ये वृक्षारोपण आणि आंबिवली टेकडीवर हिरवाई फुलविली आहे. कल्याण पश्चिमेतील उंबर्डे परिसरात महापालिका आाणि नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने वृक्षरोपण केले आहे. वृक्षारोपण कार्यक्रमा दरम्यान शिवसेना आमदार भोईर यांनी केडीएमसी आयुक्तांचा सत्कार केला.

भाजप खासदार कपिल पाटील यांची प्रतिक्रिया

दरम्यान, भाजपकडून सुरु असलेल्या लसीकरणाबाबत खासदार कपिल पाटील यांनी यावेळी माहिती दिली. “केंद्र सरकारने जाहीर केले आहे की, 25 टक्के लस खाजगी रुग्णालयातून घ्यावी. त्याचे कौतूक केले पाहिजे. समजा 50 हजार जणांना लस कपिल पाटील फाऊंडेशनतर्फे दिली गेली तर सरकारकडून येणारे डोस सामान्य नागरिकांना उपलब्ध होतील. केंद्र सरकारकडून एका डोसच्या बदल्यात 786 रुपये भरुन ही लस विकत घेतली आहे. त्यापैकी 600 रुपये लसीची किंमत आणि लस देण्यासाठी डॉक्टर नर्सचा खर्च 150 रुपये होतो. मुंबईत तर 1200 रुपये एका डोसचे घेतले जात आहेत. आधी पैसे भरले त्यानंतर लस दिली जात आहे. यात कसलीही कमाई नाही. एक लाख लसीचे डोस विकत घेतले आहे. आतापर्यंत 10 हजार नागरिकांना लसीचे डोस दिले आहेत”, असं कपिल पाटील यावेळी म्हणाले.

हेही वाचा : Special Story | संयमी स्वभाव आणि धडाकेबाज कामगिरी, मराठमोळ्या अधिकाऱ्याची कर्तबगार कहाणी